"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १७२:
=== 'मूकनायक' पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा ===
आंबेडकरांचे समाजकार्य सुरु असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे [[शाहू महाराज]] हे आपणहोऊन आंबेडकरांना भेटले. त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१ व १०२|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी [[इ.स. १९२०]] साली मुंबईत '[[मूकनायक]]' नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशीत करण्यात आला. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता व सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२|language=मराठी}}</ref> आंबेडकर ५ जुलै १९२० मध्ये आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री [[:en:Edwin Montagu|ई.एस. माँटेग्यू]] यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=११०|language=मराठी}}</ref>
 
 
=== अस्पृश्यांच्या परिषदांमधील सहभाग ===
आंबेडकरांच्या आदेशानुसार त्यांचे अनुयायी व अस्पृश्य लोक ठिकठिकाणी सभा घेऊन व आंदोलन करून आपल्या राजकीय हक्कांच्या मागण्या इंग्रज सरकारकडे करु लागले. त्यांचाच भाग म्हणून १९२० मध्ये कोल्हापूर जवळील माणगाव आणि नागपूर येथे अस्पृश्यांच्या दोन परिषदा पार पडल्या. कोल्हापूर संस्थानातील [[माणगाव]] या गावात २१ मार्च व २२ मार्च १९२० रोजी दक्षिण महाराष्ट्र दलित परिषदेचे पहिले अधिवेशन झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष आंबेडकर होते तर शाहू महाराजांची विशेष उपस्थिती होती. आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अस्पृश्यांच्या उद्धारासाठी त्यांच्या सामाजित हक्कांचे व राजकीय हक्कांचे समर्थन केले. अस्पृश्यांच्या उद्धाराचे व समाजसुधारणेचे कार्य करीत असलेल्या राजर्षी शाहू महाराजांचाही गौरव आंबेडकरांनी केला. तर शाहू महाराजांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकरांविषयी विश्वास व्यक्त केला की "डॉ. आंबेडकर आपल्या अस्पृश्य समाजाचा उद्धार करतील आणि आपल्या देशाचाही उद्धार करतील. ते फक्त अस्पृश्यांचेच नव्हे तर देशाचेही थोर राष्ट्रीय नेते होतील. त्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समाजाने अवश्य आपला उद्धार करून घ्यावा. तसे घडले तर सर्वांचेचो कल्याण होईल."<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२ व १०३|language=मराठी}}</ref>
 
इ.स. १९२० च्या ३०, ३१ मे आणि १ जून या तीन दिवसांत नागपूर येथे शाहू महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद' झाली. आंबेडकर आपल्या अनुयायांसह या परिषदेत सहभागी झाले. आंबेडकरांनी या परिषदेमध्ये समाजसेवक [[विठ्ठल रामजी शिंदे]] यांचा निषेध करणारा ठराव पास करुन घेतला. अस्पृश्यांना इंग्रजी सरकारकडून राजकीय व सामाजिक हक्क कशा स्वरुपात मिळावेत, याविषयी आंबेडकर व शिंदे यांच्यात मतभेद होते. इंग्रज सरकारने अस्पृश्यांना स्पृश्यांच्या माध्यमातून राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे शिंदेंचे मत होते तर त्याच्या उलट इंग्रज सरकारने अस्पृश्यांना अगदी थेट राजकीय व सामाजिक हक्क द्यावेत, असे आंबेडकरांचे मत होते. अस्पृश्यांचे राजकीय व सामाजिक हक्क स्पृश्यांच्या किंवा अन्य कोणाच्याही मर्जीवर अवलंबून असू नयेत, असा आंबेडकरांचा दृष्टीकोन होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०३|language=मराठी}}</ref>
 
इ.स. १९२६ च्या मे महिन्यात सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील रहिमतपुर येथे आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली 'सातारा जिल्हा महार परिषदे'चे अधिवेशन झाले. त्यांनी आपल्या भाषणात महार वतनाविषयी सविस्तर माहिती सांगितली. तसेच अस्पृश्य समाजाला ब्राह्मणी विचारसरणीच्या लोकांपासून सावध राहण्यास सांगितले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२५ व १२६|language=मराठी}}</ref>
 
=== बहिष्कृत हितकारिणी सभेतर्फे बहिष्कृतांचा विकास ===
आंबेडकरांनी अस्पृश्य व मागासवर्गीय समाजाच्या उत्थानासाठी ९ मार्च १९२४ रोजी दामोदर हॉलमध्ये समाजसेवा करीत असलेल्या सहकाऱ्यांची बैठक घेऊन '[[बहिष्कृत हितकारिणी सभा]]' नावाची संस्था स्थापना करण्याचा निर्णय घेतला. आंबेडकर २० जूलै १९२४ रोजी '[[बहिष्कृत हितकारिणी सभा]]' संस्था स्थापना केली व स्वतः त्या संस्थेचे अध्यक्ष झाले. संस्थेचे ध्येय व कार्य सुचित करण्यासाठी "शिका, संघटित व्हा व सघर्ष करा" हे तीन क्रियावाचक व आज्ञावाचक शब्द स्वीकारण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२१, १२३ व १२४|language=मराठी}}</ref> सामाजिक व राजकीयदृष्ट्या तळागाळात फेकल्या गेलेल्यांना भारतीय समाजातील इतरांच्या बरोबर आणणे, हे ह्या सभेचे ध्येय होते. अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेऊन, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. अस्पृश्यांना समाजाबाहेर ठेऊन, त्यांना नागरी, धार्मिक वा राजकीय हक्क देण्यात आले नव्हते. त्यांच्या अधिकारांप्रती त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करणे हा उद्देश होता. आंबेडकरांनी सायमन कमिशनकडे एक पत्र सादर केले व त्यात त्यांनी मागासवर्गीयांसाठी नामनिर्देशन तत्त्वावर जागा आरक्षित ठेवण्यासंबंधी मागणी केली. तसेच भूदल, नौदल व पोलीस खात्यात मागासवर्गीयांची भरती करण्यासंबंधीचीही मागणी केली होती. सभेमार्फत अस्पृश्यांच्या कल्याणासाठी शाळा, वसतिगृहे व ग्रंथालये सुरू करण्यात आली.<ref>{{Cite book|title=समाजशास्त्र (इयत्ता १२ वी)|last=लेखक मंडळ|first=महाराष्ट्र|publisher=महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ|year=२०१३|isbn=|location=पुणे|pages=१४२|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|title=Dr. Ambedkar Life And Mission|last=keer|first=Dhanajay|publisher=Popular Prakashan|year=1995|isbn=|location=|pages=62}}</ref> बहिष्कृत हितकारिणी सभा या संस्थेमधील पदाधिकाऱ्यांत अस्पृश्य व स्पृश्य समाजाच्या लोकांना स्थान देण्यात आले होते. जे स्पृश्य समाजाचे लोक जातीयतेचे व अस्पृश्यतेचे अच्चाटन करु इच्छितात त्यांचे सहकार्य अवश्य घ्यावे, असा आंबेडकरांचा विचार होता. बहिष्कृत हितकारणी सभेने अस्पृश्यांमध्ये शिक्षण प्रसार करणे, वाचनालये सुरु करणे, विद्यार्थी वसतीगृहे काढले इत्यादी कर्तव्ये स्वीकारली. या संस्थेमार्फत सोलापूर (१९२५ मध्ये), जळगाव, पनवेल, अहमदाबाद, ठाणे अशा अनेक ठिकाणी वसतीगृहे सुरु करण्यात आली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२१, १२३, १२४ व १२६|language=मराठी}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?redir_esc=y&id=Wx218EFVU8MC&q=Shahu+meets+ambedkar#v=snippet&q=Shahu%20food&f=false|title=Dalit Movement in India and Its Leaders, 1857-1956|last=Kshīrasāgara|first=Rāmacandra|date=1994|publisher=M.D. Publications Pvt. Ltd.|year=|isbn=9788185880433|location=|pages=135|language=en}}</ref> १० व ११ एप्रिल १९२५ रोजी बहिष्कृत हितकाकारणी सभेच्या सहकार्याने बेळगाव जिल्ह्यातील निपाणी या गावी 'मुंबई इलाखा प्रांतिय बहिष्कृत परिषद' या संस्थेने आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरे अधिवेशन आयोजित केले होते. आंबेडकरांनी 'सामाजिक सुधारणांसाठी तयार व्हा' असा संदेश देणारे भाषण केले. त्यावर प्रभावित होऊन अस्पृश्यांनी बेळगाव येथे मुलांचे वसतीगृह सुरु केले. पुढे इ.स. १९२९ मध्ये हे वसतीगृह धारवाडला हलवण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२४ व १२५|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी बहिष्कृत हितकाकारणी सभेतर्फे मुंबई राज्य सरकारकडे मागणी केली होती, की मुंबई राज्य सरकारकतर्फे मुंबई राज्य कायदेमंडळावर (विधिमंडळावर) सदस्य म्हणून अस्पृश्य समाजाचे दोन प्रतिनिधी नेमण्यात यावेत. त्यांची ही मागणी मान्य करुन १९२६ च्या डिसेंबर मध्ये मुंबई कायदेमंडळावर आंबेडकर व पुरुषोत्तम सोळंकी यांना नेमण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref>
 
=== कोरेगाव येथील विजयस्तंभास भेट ===
[[File:Dr. Babasaheb Ambedkar and his followers at Vijaystambha of Bhima Koregaon (Pune, Maharashtra).jpg|thumb|300px|right|१ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे कार्यकर्ते भीमा-कोरेगाव येथील 'विजयस्तंभ' येथे युद्ध जिंकलेल्या शूर महार रेजिमेंटच्या सैनिकांना अभिवादन करण्यासाठी आले असतानाचे छायाचित्र. छायाचित्रात पुष्पहार घातलेले बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या डाव्या हाताला शिवराम जानबा कांबळे व इतर कार्यकर्ते.]]
 
१ जानेवारी १८२७ रोजी पुणे जिल्ह्यातील [[कोरेगाव भिमा|भीमा कोरेगाव]] येथील विजयस्तंभाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत मानवंदना देऊन त्यावर्षी स्मृतिदिन साजरा केला. त्यावेळी [[महार रेजिमेंट|महार बटालियनच्या]] शौर्याचे कौतुक आंबेडकरांनी केले. बाबासाहेबांच्या भेटीनंतर त्यांच्या अनुयायांनी मोठ्या प्रमाणात या विजयस्तंभाला भेट देण्यास सुरुवात केली. १ जानेवारी १८१८ रोजी भीमा कोरेगाव येथे [[कोरेगावची लढाई|ब्रिटिश आणि पेशव्यांमध्ये लढाई]] झाली होती. या लढाईत ब्रिटिशांकडून बहुतांश दलित समाजाचे [[महार]] सैनिक लढले होते. महार लोक आपल्यावर होत असलेल्या अन्यायाचा विरोध म्हणून [[पेशवे|पेशव्यांच्या]] ब्राह्मणी प्रशासनाविरुद्ध ब्रिटिश सैन्याचा भाग म्हणून लढले. अस्पृश्य जातीतील ज्या महार सैनिकांनी समतेच्या, न्यायाच्या हक्कासाठी या लढाईत प्राणांची आहुती दिली. त्यांच्या व त्या दिवसाच्या स्मृतिप्रीत्यर्थ व महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून ब्रिटिशांनी भीमा नदीच्या तीरावर कोरेगाव येथे एक भव्य ऐतिहासिक असा विजयस्तंभ उभारला आहे. आंबेडकरांनी कोरेगावला दलित स्वाभीमानाचे प्रतीक बनवले. २५ डिसेंबर १९२७ रोजी [[महाड]] येथे दिलेल्या भाषणात आंबेडकर अस्पृश्यांना उद्देशून म्हणतात की, "''तूम्ही शूर विरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे. भिमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत. तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरींची संतान नसून सिंहाचे छावे आहात''."<ref>https://www.bbc.com/hindi/india-42542280</ref><ref>https://www.bbc.com/hindi/amp/india-42598739</ref><ref> https://m.lokmat.com/pune/dr-babasaheb-ambedkar-gave-salute-vijaystambha-bhima-koregoan/amp/</ref><ref>https://www.bbc.com/marathi/amp/india-42554568</ref>