"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १६०:
 
'इंडिया अँड चायना' या पुस्तकाचा लेखक फिलीफ स्प्रॅट यांनाही आंबेडकरांच्या सहकार्यामुळे २८ नोव्हेंबर १९२७ रोजी न्यायालयाद्वारे दोषमुक्त करण्यात आले. बॅरिस्टर आंबेडकरांची यशस्वी वकिलांमध्ये गणना होऊ लागली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१२७|language=मराठी}}</ref>
 
== जातीअंताचा लढा व अस्पृश्यता निर्मूलन ==
 
[[File:Dr. Babasaheb Ambedkar delivering a speech 2.jpg|thumb|300px|right|एका सभेत भाषण करताना आंबेडकर]]
 
भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. त्याच वेळी जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांचे विचार, सिद्धांत आणि प्रत्यक्ष चळवळ या माध्यमातून त्यांनी भरीव कार्य केले आहे. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे.<ref>https://www.bbc.com/marathi/india-43756471</ref> सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार ह्या बाबतीत आंबेडकर पथप्रदर्शक होते. आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.<ref>https://m.thewirehindi.com/article/waiting-for-a-visa-br-ambedkar-koregaon-maharashtra/30384</ref> [[इ.स. १९३५]]-३६ या कालावधी दरम्यान लिहिलेल्या [[वेटिंग फॉर अ व्हिझा]] या आपल्या आत्मकथेत डॉ. आंबेडकरांनी [[अस्पृश्यता|अस्पृश्यतेसंबंधी]] त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|last1=Ambedkar|first1=Dr. B.R.|शीर्षक=Waiting for a Visa|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|website=http://www.columbia.edu|publisher=Columbia University|accessdate=15 April 2015}}</ref><ref>{{स्रोत पुस्तक|last1=Moon|first1=Vasant|शीर्षक=Dr. Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol. 12|date=1993|publisher=Bombay: Education Department, Government of Maharashtra|location=Mumbai|accessdate=15 April 2015}}</ref> हे आत्मचरित्रपर पुस्तक [[कोलंबिया विद्यापीठ]]ात ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_waiting.html|शीर्षक=Waiting for a Visa, by Dr. B. R. Ambedkar|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-26}}</ref>
 
=== साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष ===
इंग्रज सरकारकडून भारतातील अस्पृश्य समाजाला राजकीय व सामाजिक स्वरुपाचे हक्क इ.स. १९१९ पर्यंत मिळालेले नव्हते. पण ज्यावेळी साउथबेरी अध्यक्ष असलेली मताधिकार समिती जेव्हा मुंबई प्रांतात आली, तेव्हा सिडनहॅम महाविद्यालयात प्राध्यापक असताना आंबेडकरांनी २७ जानेवारी १९१९ रोजी अस्पृश्यांचा प्रतिनिधी म्हणून [[माँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९|गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट १९१९]] बाबत साऊथबरो मताधिकार समितीसमोर साक्ष दिली व समितीला आपल्या मागण्यांचे पन्नास पृष्ठांचे छापील निवेदनही सादर केले. त्यात त्यांनी 'अस्पृश्यांना मतदानाचा हक्क पाहिजे, त्यांना निवडणुकीस उभे राहता पाले पाहिजे, त्यांच्या मतदारांना स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, अस्पृश्यांचे अस्पृश्य प्रतिनीधी अस्पृश्य मतदारांनीच निवडले पाहिजेत आणि अस्पृश्यांच्या मतदारसंघात अस्पृश्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा दिल्या पाहिजेच,' यासारख्या मागण्या केल्या होत्या.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०० व १०१|language=मराठी}}</ref> तसेच त्यांनी सांगितल्याप्रमाणे अस्पृश्यवर्गीय समाजसेवक व पुढारी सभा घेऊन आपल्सा मागण्यांचा पाठपुरावा करणारे ठराव पास करून इंग्रजी सरकारकडे पाठवू लागले. समाजप्रबोधनाची ही चळवळ नेटाने सुरु ठेवण्यासाठी चळवळीला मदत करणारे एखादे वृत्तपत्र सुरू करावे असे आंबेडकरांना वाटू लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१|language=मराठी}}</ref>
=== 'मूकनायक' पाक्षिकातून अस्पृश्यांच्या अन्यायाला वाचा ===
आंबेडकरांचे समाजकार्य सुरु असताना मुंबईत कोल्हापुरचे राजे [[शाहू महाराज]] हे आपणहोऊन आंबेडकरांना भेटले. त्यांनी आंबेडकरांना वृत्तपत्र काढण्यासाठी अडीच हजार रुपयांची मदत केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०१ व १०२|language=मराठी}}</ref> आंबेडकरांनी [[इ.स. १९२०]] साली मुंबईत '[[मूकनायक]]' नावाचे पाक्षिक सुरू केले व पांडुरंग नंदराम भटकर यांना पाक्षिकाचे संपादक नेमले. मूकनायक पाक्षिकाचा पहिला अंक ३१ जानेवारी १९२० रोजी प्रकाशीत करण्यात आला. पहिल्या अंकातील 'मनोगत' नावाचा अग्रलेख आंबेडकरांनी लिहिला होता. त्यांनी आपल्या लेखांतून बहिष्कृत अस्पृश्य समाजावर होत असलेल्या अन्यायावर प्रकाश टाकून त्या समाजाच्या उन्नतीसाठी सरकारला काही उपाययोजना सुचवल्या. अस्पृश्यांचा उद्धार होण्यासाठी त्यांनी सत्ता व सत्ता मिळवणे गरजेचे आहे असे आंबेडकरांना वाटत होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=१०२|language=मराठी}}</ref> आंबेडकर ५ जुलै १९२० मध्ये आपले अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्यासाठी इंग्लडमध्ये गेले असता तेथे त्यांनी भारतमंत्री [[:en:Edwin Montagu|ई.एस. माँटेग्यू]] यांची भेट घेतली आणि अस्पृश्यांच्या हितांविषयी चर्चा केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=११०|language=मराठी}}</ref>
 
 
==संदर्भ==