"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ १३६:
३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे ग्रेज-इन मध्येही प्रवेश घेऊन बॅरिस्टरीचा अभ्यास सुरु केला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९|language=मराठी}}</ref> ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई. दिवसभर पुरेल इतके साहित्य ते एकदाच आपल्या बसण्याच्या ठिकाणी ठेवत. त्यांचा अभ्यास अखंड चाले. दुपापरच्या वेळी थोडेसे खाण्यासाठीच ते जागेवरुन थोडा वेळ आपल्या जागेवरुन उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत. राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हतेच. सतत अभ्यास करणे, हेच त्यांचे ध्येय होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९-७०|language=मराठी}}</ref> वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध 'प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया' (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी. च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील 'मास्टर ऑफ सायन्स' (एम.एस्सी.) ही पदवी प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७०-७१|language=मराठी}}</ref> २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संख्येने त्यांना 'बॅरिस्टर-ॲट-लॉ' (बार-ॲट-लॉ) ही कायद्याची उच्चतम पदवी प्रदान केली; आंबेडकर वकील बनले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१|language=मराठी}}</ref> त्यानंतर '[[द प्रोब्लम ऑफ रुपी]]' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.) च्या पदवीसाठी ऑक्टोबर [[इ.स. १९२२|१९२२]] मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करुन [[जर्मनी]]च्या [[बॉन विद्यापीठ]]ाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करुन ते जर्मनी] येथे गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्यांना [[जर्मन भाषा]]ही शिकलेले होते. तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. परंतु त्यांना हे अध्ययन मध्येचे सोडून ताबडतोब लंडनला यावे लागले. कारण त्यांचे शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवले होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१|language=मराठी}}</ref> आंबेडकर लंडनला परतले, १९२३ च्या मार्च महिन्यात परीक्षकांनी स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे पुनर्लेखन करण्याचे सांगितले होते, कारण प्रबंधात आंबेडकरांनी भारतातील ब्रिटिश साम्राज्याच्या धोरणांवर टीका केली होती. पुनर्रचनेस तीन-चार महिन्यांचा कालावधी लागणार होता. यादरम्यान त्यांच्याजवळील पैसे संपत चालले होते म्हणून त्यांनी भारतात जाऊन तेथूनच प्रबंध करण्याचे ठरवले. त्यांनी बॉन विद्यापीठाला सादर करण्यासाठी प्रबंध लिहिण्याचा प्रयत्न सोडून दिला. आंबेडकर लंडनहून बोटीने भारताकडे निघाले व ३ एप्रिल १९२३ रोजी ते मुंबईला पोहोचले. इ.स. १९२३ च्या ऑगस्ट मध्ये आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखानाची पद्धत बदलली व पुनह प्रबंध विद्यापीठाला पाठवून दिला. विद्यापीठाने तो प्रबंध मान्य करत इ.स. १९२३ च्या नोव्हेंबर मध्ये त्यांना डी.एस्सी. ची पदवी प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७२|language=मराठी}}</ref> लंडनच्या 'पी.एस. किंग अँड कंपनी' प्रकाशन संस्थेने 'द प्रोब्लम ऑफ रुपी' हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरुपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला डी.एस्सी. पदवीचे मार्गदर्शक असलेले अर्थशास्त्रज्ञ डॉ. एडविन कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडीलांस अर्पण केला होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७३|language=मराठी}}</ref> या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात [[कायदेपंडित]] म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=८५|language=मराठी}}</ref> इंग्लंडमध्ये शिकत असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तो आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना दररोज २४ तासांपैकी २१ तास अभ्यास करावा लागला.<ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=३१|language=मराठी}}</ref>
== जातिसंस्था विषयक सिद्धान्त ==
{{मुख्य|कास्ट्स इन इंडिया}}
अमेरीकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये १९१६ साली डॉ. ए.ए. गोल्डनविझर यांनी [[मानववंशशास्त्र]] विषयक परिसंवादात भाग घेण्यासाठी भीमराव आंबेडकरांना बोलविले. त्यांनी आपला विषय ठरवला - '[[कास्ट्स इन इंडिया|भारतातील जाती, त्यांचा उगम, विकास आणि वास्तविकता]]'. तेव्हा आंबेडकर हे केवळ २५ वर्षांचे होते.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=६|language=मराठी}}</ref> तरुण आंबेडकरांनी या आपल्या शोध पुस्तिकेत जातिसंस्था विषयक खालिल सिद्धान्त मांडले.
<blockquote>
वर्ग आणि जात तसे मानायचे झाले, तर निकटवर्ती होत. कालांतराने ते अलग होतात. बंदिस्त केलेली, गोठवलेला वर्ग म्हणजे ‘जात’.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/txt_ambedkar_castes.html|title=Castes in India: Their Mechanism, Genesis, and Development, by Dr. B. R. Ambedkar|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-04-01}}</ref><ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=६|language=मराठी}}</ref>
</blockquote>
जातिसंस्था मनूने निर्माण केली हे डॉ. आंबेडकरांना मान्य नव्हते. आंबेडकरांच्या मतानुसार, 'मनूने जातीचा कायदा सांगितला नाही. तो ते करू शकता नव्हता. मनूपूर्वी कित्येक वर्षे जातिसंस्था अस्तित्वात होत्या. स्मृतिकार मनूने अस्तित्वात असलेल्या कायद्यांची संहिता बनवून, त्याला तात्त्विक आणि धार्मिक अधिष्ठान प्राप्त करून दिले.'<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=६ व ७|language=मराठी}}</ref>
[[जानेवारी ४|४ जानेवारी]], १९२८ च्या टाईम्स ऑफ इंडियात इंदूर संस्थानात अनुसूचित जातींना मिळणाऱ्या वाईट वागणुकीबद्दल वृत्तांत आला होता. त्याची तुलना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १८ व्या शतकातील [[पेशवाई]]तील रिजनाच्या स्थितीशी केली.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=७|language=मराठी}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://ccnmtl.columbia.edu/projects/mmt/ambedkar/web/section_2.html|title=Section 2 [Why social reform is necessary for political reform]|website=ccnmtl.columbia.edu|language=en|access-date=2018-04-01}}</ref>
आंबेडकरांनी '[[जात]]' या संकल्पनेची चिकित्सा करून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. <blockquote>जात ही 'श्रमविभागणी' वरही अवलंबून नाही आणि 'नैसर्गिक कल वा योग्यतेवरही' अवलंबून नाही. व्यक्तीची कामे जात आधीच तयार करते. कुळ कुवतीच्या आधारे नव्हे तर, जन्मानुसार किंवा आई-वडीलांच्या सामाजिक स्थानानुसार ठरते.<ref>{{Cite book|title=युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर|last=राणे|first=दिनेश|publisher=ज्ञानगंगा अँड को. पब्लिकेशन|year=|isbn=|location=दिल्ली|pages=७ व ८|language=मराठी}}</ref><ref>Castes in India: Their Mechanism, Genesis and Development, B. R.
Ambedkar</ref>
</blockquote>
==संदर्भ==
|