"डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १०२:
[[इ.स. १८९६]] मध्ये रामजींनी आपल्या परिवारासह [[दापोली]] सोडली व ते [[सातारा]] येथे एका साधारण घरात राहिले, आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात ते राहू लागले. त्यावेळी भीमरावाचे वय पाच वर्षाचे झाले होते. हे वय त्यास शाळेत प्रवेश देण्यास योग्य होते. रामजींनी [[इ.स. १८९६]] च्या नोव्हेंबर महिन्यात सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले. [[इ.स. १८९८]] साली रामजींनी जीजाबाई नावाच्या विधवेसोबत दुसरे लग्न केले. भीमरावाचे मूळ गाव कोकणातील [[आंबडवे]] व मूळ आडनाव ''सकपाळ'' होते. साताऱ्यातील कॅम्प स्कूल मधील मराठी शिक्षण पूर्ण केल्यानंतर साताऱ्यातीलच सातारा हायस्कूल या इंग्रजी सरकारी हायस्कूल मध्ये भीमरावाचे नाव दाखल केले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४२|language=मराठी}}</ref> [[कोकण]]ामधील लोक पूर्वी आपले आडनाव आपल्या गावाच्या नावावरून ठेवत असे व त्यात शेवटी ([[उपसर्ग (संस्कृत व्याकरण)|उपसर्ग]]) ''कर'' शब्द जोडण्याचा प्रघात असे. त्यामुळेच बाबासाहेबांचे आडनाव "सकपाळ" असतांना त्यांचे वडील [[रामजी सकपाळ|रामजी आंबेडकर]] यांनी [[सातारा|साताऱ्यातील]] गव्हर्नमेंट हायस्कूल (आताचे [[प्रतापसिंह हायस्कूल]]) मध्ये "आंबडवेकर" असे आडनाव ७ नोव्हेंबर १९०० रोजी नोंदवले. (''अंबावडेकर'' हा चूकीचा उल्लेख<ref>{{स्रोत बातमी|url=https://m.divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) साताऱ्याच्या या शाळेत भीमरावांना शिकवण्यासाठी कृष्णा केशव आंबेडकर नावाचे [[देवरुखे ब्राह्मण]] शिक्षक होते. शाळेच्या दप्तरात नोंदवलेले भीमरावांचे 'आंबडवेकर' हे आडनाव उच्चारताना त्यांना ते आडमिडे वाटत असे म्हणून माझे 'आंबेडकर' हे नाव तू धारण कर, त्यांनी असे भीमरावांना सुचविले. तेव्हा त्यावर भीमरावांनी होकार दिला आणि तशी नोंद शाळेत झाली. तेव्हापासून त्यांचे आडनाव 'आंबडवेकर'चे '[[आंबेडकर]]' असे झाले. नोव्हेंबर १९०४ मध्ये भीमरावांनी इंग्रजी चौथीची परीक्षा पास केली व यावर्षीच रामजी सकपाळ [[मुंबई]]ला सहपरिवार गेले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४|language=मराठी}}</ref>
डिसेंबर १९०४ मध्ये रामजी सकपाळ [[मुंबई]]ला सहपरिवार आले व तेथील 'लोअर परळ' भागातील 'डबक चाळ' नावाच्या एका इमारतीच्या एका खोलीत राहू लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४४|language=मराठी}}</ref> [[मुंबई]]मधे भीमराव हे [[एल्फिन्स्टन रोड|एल्फिन्स्टन रस्त्यावरील]] सरकारी शाळेत जाऊ लागले, एल्फिन्स्टन हायस्कूलमधे जाणारे ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/1900s.html|title=1900s|last=Pritchett|first=Frances|website=www.columbia.edu|access-date=2018-03-14}}</ref> [[कबीर पंथ]]ीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू साहित्याची ओळख करून दिली. रामजी बाबांना इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करातील पदाचा वापर करावा लागला. शाळेत प्रवेश मिळाला तरी भीमरावांना इतर विद्यार्थ्यांपासून वेगळे बसावे लागे आणि शिक्षकांचे साहाय्य मिळत नसे. त्यांना वर्गात बसण्याची परवानगी नव्हती. जेव्हा त्यांना तहान लागत असे, तेव्हा शाळेतील पाणी पिण्याच्या भांड्याला किंवा [[पेला|पेल्याला]] स्पर्श करण्याची त्यांना परवानगी नव्हती. तेव्हा एखादा उच्च जातीतील व्यक्ती उंचीवरून त्यांच्या ओंजळीवर पाणी ओतत असे. आंबेडकरांसाठी हे कार्य सहसा शालेय शिपायाद्वारे केले जात असे आणि जर शिपाई उपलब्ध नसेल तर त्यांना दिवसभर पाण्याविनाच रहावे लागत असे; नंतर त्यांनी आपल्या लेखनात या घटनेचे "शिपाई नाही, तर पाणी नाही" असे वर्णन केले आहे. शाळेत असतानाच [[इ.स. १९०६]] मध्ये १४-१५ वर्षीय भीमरावांचे लग्न [[दापोली]]च्या भिकू वलंगकर यांची ९-१० वर्षीय कन्या रामीबाई उर्फ [[रमाबाई आंबेडकर|रमाबाई]] यांच्याशी झाले. एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये शिकत असताना भीमरावांना वर्गातील स्पृश्य जातींच्या मुलांपासून दूर बसावे लागे. हायस्कूलमधील अनेक शिक्षक त्यांच्याशी तिरस्काराने वागत असत. आंबेडकर हे आपल्या विद्यार्थी जीवनात दररोज १८ तास अभ्यास करत असत.<ref>{{स्रोत पुस्तक|title=B.R. AMBEDKAR: Saviour of the Masses|last=Kapadiya|first=Payal|publisher=Wisha Wozzawriter published by Puffin|year=2012|isbn=|location=Mumbai|pages=14}}</ref> [[इ.स. १९०७]] साली तरूण भीमराव एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये मॅट्रिकची परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=४९-५०|language=मराठी}}</ref> मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर भीमराव आंबेडकरांच्या ज्ञातिबांधवांनी [[कृष्णाजी अर्जुन केळुसकर]] गुरूजी यांच्या अध्यक्षेखाली सभा भरवून भिवा रामजी आंबेडकरांचे कौतुक केले. एखाद्या अस्पृश्य मुलाने असे यश मिळविणे एवढे दुर्मिळ होते की, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी तेव्हा एक जाहिर सभा भरवण्यात आली. यावेळी केळुसकर गुरुजींनी स्वतः लिहिलेल्या मराठी बुद्धचरित्राची एक प्रत भीमरावांना भेट म्हणून दिली. हे पुस्तक वाचल्यानंतर त्यांना पहिल्यांदाच [[गौतम बुद्ध|बुद्धांच्या]] शिकवणूकींची माहिती कळाली व बुद्धाकडे वळले.<ref>{{Cite book|title=डॉ. आंबेडकरी हितशत्रुंच्या जाणिवा|last=लोखंडे|first=भाऊ|publisher=परिजात प्रकाशन|year=२०१२|isbn=|location=कोल्हापुर|pages=१२२|language=मराठी}}</ref><ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५० व ७७|language=मराठी}}</ref> आर्थिक अडचणीमुळे रामजी सकपाळ भीमरावांना महाविद्यालयीन शिक्षण देऊ शकतील, अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे केळुसकर गुरुजींनी मुंबईमध्ये महाराज सयाजीराव गायकवाड यांचेशी भीमरावांची भेट घालून दिली. भीमरावांची हुशारी पाहून महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी महाराजांनी त्यांना दरमहा रु. २५ ची शिष्यवृत्ती देण्याचे मंजूर केले. त्यानंतर ३ जानेवारी [[इ.स. १९०८]] रोजी भीमरावांनी [[एल्फिन्स्टन महाविद्यालय]]ात प्रवेश घेतला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=५१|language=मराठी}}</ref> पुढे चार वर्षांनी इ.स. १९१२ मध्ये त्यांनी त्याच मुंबई विद्यापीठाची [[राज्यशास्त्र]] आणि [[अर्थशास्त्र]] विषय घेऊन बी.ए. ची पदवी संपादन केली आणि बडोदा संस्थानात नेकरीसाठी रूजू झाले. याच वर्षी १२ जानेवारी २०१२ रोजी त्यांना पहिला मुलगा [[यशवंत आंबेडकर|यशवंत]] झाला. त्याच सुमारात [[२ फेब्रुवारी]], [[इ.स. १९१३]] मध्ये त्यांचे आजारी वडील रामजींचे मुंबईमध्ये निधन झाले. पुढे चार महिन्यांनी बरोडा नरेशांकडून प्रति महिने २५ रूपये शिष्यवृत्ती घेऊन अमेरीकेतील [[कोलंबिया विद्यापीठ]]ात उच्च शिक्षण घेण्यासाठी त्यांनी प्रयाण केले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|author=Frances Pritchett |दुवा=http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html |शीर्षक=youth |प्रकाशक=Columbia.edu |accessdate=17 July 2010| archiveurl= http://web.archive.org/web/20100625044711/http://www.columbia.edu/itc/mealac/pritchett/00ambedkar/timeline/graphics/youth.html| archivedate= 25 June 2010 | deadurl= no}}</ref>
==संदर्भ==
|