"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ६८:
आंबेडकर हे देशातील कोट्यवधी दलितांना [[सामाजिक न्याय]] मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होते. स्पृश्य तसेच सवर्णांच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल आणि अस्पृश्यांना ते समतेची वागणूक देकील या आशेवर ते सतत प्रयत्नशील होते. [[हिंदू]] धर्मात अस्पृश्यांना समतेची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी लढा दिला. इ.स. १९२७ मध्ये महाडचा सत्याग्रह केली त्यानंतर पाच वर्षापासून [[नाशिक]]च्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंबेडकरांचे अनुयायी सत्याग्रहाचा लढा चालवीत होते. पण तेव्हा बहुतांश हिंदूना अस्पृश्य मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते. त्यांना [[दलित]] वा [[अस्पृश्य]] जनता ही नेहमी कुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की आंबेडकरांचा काळाराम मंदिराच्या सत्याग्रह हा समतेसाठी केलेला लढा अयशस्वी झाला; अस्पृश्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश कायम नाकारला. शेवटी सनातन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून आंबेडकरानी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. 'ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही' असा निर्धार करून आंबेडकरांनी धर्मांतराचा विचार केला. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल लक्षणीय होता. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या [[हिंदू]] धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर आंबेडकरांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली - पर्यायी धर्म निवडायचा कुठला? त्यांना भेदभीव नसलेला व जातविरहीत धर्म हवा होता. पुढे [[१३ ऑक्टोबर]][[इ.स. १९३५]] रोजी [[येवला]] येथे परिषद भरली, त्यात भारताच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य आले होतो. १०,००० वर जनसमुदाय येवले नगरी आला होता. आंबेडकरांचे येवला परिषदेस आगमन झाले व [[अमृत धोंडिबा रणखांबे]] यांनी त्यांचे स्वागत केले. या सभेत आंबेडकरांचे प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे भाषण सुरू झाले. ते म्हणाले, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?" आंबेडकर पुढे म्हणतात,<br /> <span style="color: green">
<blockquote>मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.</blockquote> <br /> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेचे हिंदू समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. परिवर्तनवादी विचारवंतांनी या घोषणेचे स्वागत केले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://archive.is/wJ65n|title=eSakal|date=2013-08-21|work=archive.is|access-date=2018-03-14}}</ref> ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळली. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता, तो आता या घोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. धर्मांतराच्या गर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहचला. भाषणाच्या शेवटी आंबेडकर अस्पृश्यांना सांगतात की, "आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरू होत आहे. आम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेव्हा यांचा देव आणि हे आम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले, तेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मूल्ये नाकारणार्यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागू या."
== धर्मविषयक दृष्टिकोन व धर्मचिकित्सा* ==
धर्मांतराच्या घोषणेनंतर आंबेडकर हिंदू धर्माचा त्याग करून दुसऱ्या कुठल्यातरी धर्मात प्रवेश करणार याची बातमी सर्व धर्मीयांपर्यंत गेली. जगातील विविध धर्मगुरु व धर्मप्रसारकांनी आंबेडकरांना व त्यांच्या अनुयायांना आपल्या धर्मात आणावे यासाठी अनेक प्रयत्न केले. धर्मगुरूंकडून आंबेडकरांचे निवासस्थान राजगृहावर देश विदेशांतून अनेक पत्रे व तारा आल्या.
=== शीख धर्माची चाचपणी ===
१३ व १४ एप्रिल १९३६ रोजी [[अमृतसर]] येथे शीख मिशनरी परिषद भरली होती. देशभरातून आलेले अस्पृश्य वर्गाचे लोक या परिषदेस हजर झाले. आंबेडकरही आपल्या मोजक्या कार्यकर्त्यांसकट इथे हजर होते. सेवानिवृत्त न्यायाधीश सरदार बहाद्दुर हुकूमसिंग हे या परिषदेचे अध्यक्ष होते. या परिषदेत केरळचे अस्पृश्य समाजाचे नेते डॉ. कुदीर व इतर काहींनी शीख धर्माचा जाहीर आणि विधिवत स्वीकार केला. या परिषदेत आंबेडकरांचे एक भाषण झाले, त्यात ते म्हणाले की, "हिंदूंनी जातीयवादाच्या अमानवी कृत्यांनी माझ्या बांधवांच्या कित्येक पिढ्यांवर गुलामाचे, दारिद्र्याचे व पराकोटीचे वेदनामय जीवन लादले, अत्यंत घृणास्पद नि खालच्या दर्जाची वागणूक दिली. या धर्मात समतेचा असलेला अभाव मानवी जीवनास हानिकारक आहे. त्या मानाने [[शीख धर्म|शीख धर्मातील]] समतेची तत्त्वे समाजाला एकसंघ ठेवण्यात व उत्कर्ष करण्यास अत्यंत अनुकूल व प्रगतिप्रवर्तक आहेत. त्यामुळे मला शीख धर्म मनातून आवडू लागला आहे." हिंदू धर्माचा त्याग करणे निश्चित झाले आहे. धर्मांतर करण्याचा निर्णय अढळ आहे, फक्त तो केव्हा करायचे हे अजून ठरायचे आहे. शीख धर्माकडील त्यांचा विशेष झुकाव होता. पण जो कुठला धर्म स्वीकारायचा त्याचा खोलवर अभ्यास करून, मानवी मूल्यास असलेली पोषकता तपासून सर्व शंकाकुशंकांचे निराकरण झाल्यानंतरच धर्मांतर करायचे असे मत आंबेडकरांचे होते. आपले चिरंजीव [[यशवंत आंबेडकर]] व पुतण्या मुकंद यांना बाबासाहेबानी अमृतसर येथील गुरुद्वारात वास्तव्यास पाठविले. या वास्तव्याच्या काळात गुरुद्वारातील शीख बांधवांनी या दोन तरुणांचे मोठे आदरातिथ्य केले. दोन महिन्यानंतर ही मुले परत आली. मुलगा व पुतण्या यांनी दिलेल्या वृत्तांताचा हा सकारात्मक परिपाक होता. १८ सप्टेंबर १९३६ रोजी बाबासाहेबांनी शीख धर्माचा अभ्यास करण्यासाठी काही तरूण कार्यकर्त्यांना अमृतसरला गेले.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.sikh24.com/2014/06/26/letters-dr-ambedkar-and-sikh-leadership-of-1930s/#.WtMFvohubIU|title=Letters: Dr. Ambedkar and Sikh Leadership of 1930s {{!}} Sikh24.com|last=Singh|first=H|website=www.sikh24.com|language=en-US|access-date=2018-04-15}}</ref> ही तुकडी अमृतसरला पोहचून तिने शीख धर्माचा अभ्यास सुरू केला. दरम्यान काळात झालेल्या पत्रव्यवहारात शीख धर्माचे गुणगाण गाणारी अनेक पत्रे बाबासाहेबांना मिळाली. उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रांत बाबासाहेबांनी या सर्व तरुणांचे अभिनंदन केले व धर्माचा अभ्यास करण्यास शुभेच्छा दिल्या. याच दरम्यान या तेरा सदस्यांवर शीख धर्माचा मोठा इतका प्रभाव पडला की त्या सर्वांनी बाबासाहेबांची परवानगी न घेता शीख धर्माची दीक्षा घेऊन टाकली. आंबेडकरांनी त्यांना धर्माच्या अभ्यासासाठी पाठवले होते. धर्म स्वीकारण्याचा निर्णय अजून व्हायचा होता. ते सर्व सदस्य आंबेडकरी दलित चळवळीतून बाहेर फेकले गेले. पुढे शीख मिशनचे नेते व आंबेडकर यांच्यातील मतभेद वाढले. त्यांचा [[शीख धर्म]] स्वीकारण्याचा विचार मागे पडला.
===ख्रिश्चन धर्म===
ख्रिश्चनांचे धर्मगुरू बिशप ब्रेन्टन थॉबर्न ब्रॅडले व मुंबईच्या मेथॉडिस्ट एपिस्कोपल चर्चचे बिशप या दोघांनी आंबेडकरांना [[ख्रिश्चन धर्म]] स्वीकारून आपल्या अस्पृश्य बांधवांचा उद्धार करून घ्यावा अशी विनंती केली. यावेळी त्यांनी त्यांच्या धर्मात आधीपासूनच कसा अस्पृश्य समाज धर्मांतरित होऊन मोठ्या सन्मानाने जगत आहे याचे दाखले दिले. ख्रिश्चन मिशनऱ्यांकडे असलेल्या अमाप पैशांचा कसा दलितांच्या उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करण्यात येईल याचीही कल्पना दिली. {{संदर्भ हवा}}
=== इस्लाम ===
विधिमंडळाचे एक मुसलमान सदस्य गौबा यांनी आंबेडकरांना तार करत [[इस्लाम]] मध्ये येण्याचे आवाहन केले. त्यावेळी [[निजाम]]ाच्या राज्यातून काही मुस्लिम धर्मगुरू आंबेडकरांना भेटण्यासाठी आले. बाबासाहेबांनी इस्लाम स्वीकारल्यास हैद्राबादच्या निजामांकडून पैशांच्या सुविधांची बरसात केली जाईल हे सांगण्यात आले. त्याच बरोबर अस्पृश्यांनी [[इस्लाम]] स्वीकारल्यास त्यांच्या केसालाही हात लावण्यास हिंदूंचा कसा थरकाप उडेल हे सुद्धा आंबेडकरांना ठासून सांगण्यात आले. अस्पृश्यांना हिंदूंच्या छळातून मुक्त करण्याचा खरेतर हा सोपा मार्ग होता. पण आंबेडकरांना अस्पृश्यांची फक्त हिंदूपासून मुक्ती करावयाची नव्हती तर त्यांना समतेची वागणूक मिळवून देण्याबरोबरच सर्व आघाड्यावर स्त्री व पुरुष यांचा वैयक्तिक पातळीवरही मोठा बदल घडवून आणावयाचा होता. शैक्षणिक क्रांती घडवून आणावयाची होती. बौद्धिक पातळीवर मजल मारायची होती. आंबेडकरांना निजामाच्या प्रलोभनांना नकार दिला व इस्लामचा मार्ग नाकारला.{{संदर्भ हवा}}
=== बौद्ध धर्म ===
बौद्ध धम्माच्या बनारस येथील महाबोधी संस्थेच्या कार्यवाहकांनी आंबेडकरांना तार केली. "भारतात जन्मलेल्या, जातिभेद न मानणाऱ्या, सर्वांना समान समजणाऱ्या आमच्या बौद्ध धम्मात आपण व आपले अनुयायी आल्यास तुम्हा सर्वांचा उत्कर्ष होईल. मानवी मूल्ये जोपासणारा आमचा बौद्ध धम्म उभ्या जगात पसरला आहे. भूतलावरील प्रत्येक कानाकोपऱ्यात आमच्या बौद्ध धम्माचे अनुयायी आहेत. आशिया खंडातील बहुसंख्य लोक बौद्ध धर्मीय आहेत. ईश्वराला महत्त्व न देणारा व समस्त मानव जातीला स्वातंत्र्य, समता व बंधूत्व शिकविणारा आमचा [[बौद्ध धम्म]] तुमचा तेजोमय भविष्य घडवून आणेल. तळागाळातल्या लोकांच्या प्रती करुणा बाळगणारा बौद्ध धम्म तुम्हा सर्वांचा इतिहास रचेल" अशा प्रकारचा एकंदरीत संदेश आंबेडकरांना मिळाला.
==संदर्भ==
|