"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर/१" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ ६३:
हे कायदे मंजूर होणे म्हणजे कायद्याच्या इतिहासातली एक क्रांतिकारक घटना होती. या कायद्यांनी भारतीय स्त्रियांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडण्यास सुरुवात झाली. या कायद्यांनी स्त्री-पुरुषांच्या दर्जात कायद्याने समानता प्रस्थापित केली. बाबासाहेबांनी भारताचे कायदेमंत्री पदाचा राजीनामा देताना हिंदू कोड बिलाविषयी असे म्हटले होते की, “समाजातल्या वर्गावर्गातली असमानता, स्त्री-पुरुष यांच्यातली असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन, आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करणे आणि शेणाच्या ढिगारावर राजमहाल बांधण्यासारखे होय.”
== धर्मांतराची घोषणा* ==
[[चित्र:Ambedkar speech at Yeola.png|thumb|येवले येथे धर्मांतराची घोषणा करताना बाबासाहेब आंबेडकर, १३ ऑक्टोबर १९३५.]]
आंबेडकर हे देशातील कोट्यवधी दलितांना [[सामाजिक न्याय]] मिळवून देण्यासाठी संघर्ष करत होते. स्पृश्य तसेच सवर्णांच्या मनात कधी तरी अस्पृश्यांबद्दल सद्भावना जागृत होईल आणि अस्पृश्यांना ते समतेची वागणूक देकील या आशेवर ते सतत प्रयत्नशील होते. [[हिंदू]] धर्मात अस्पृश्यांना समतेची वागणूक मिळावी यासाठी त्यांनी लढा दिला. इ.स. १९२७ मध्ये महाडचा सत्याग्रह केली त्यानंतर पाच वर्षापासून [[नाशिक]]च्या काळाराम मंदिरात प्रवेश मिळावा म्हणून आंबेडकरांचे अनुयायी सत्याग्रहाचा लढा चालवीत होते. पण तेव्हा बहुतांश हिंदूना अस्पृश्य मानवाच्या बरोबरीचे वाटत नव्हते. त्यांना [[दलित]] वा [[अस्पृश्य]] जनता ही नेहमी कुत्र्यामांजरापेक्षाही खालच्या दर्जाची वाटे. याचा एकंदरीत परिणाम असा झाला की आंबेडकरांचा काळाराम मंदिराच्या सत्याग्रह हा समतेसाठी केलेला लढा अयशस्वी झाला; अस्पृश्यांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेश कायम नाकारला. शेवटी सनातन्यांच्या अमानवी वृत्तीला कंटाळून आंबेडकरानी हिंदू धर्माचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. 'ज्या धर्मात आम्हाला कुत्र्याचीही किंमत नाही त्या धर्मात आता आपण राहायचे नाही' असा निर्धार करून आंबेडकरांनी धर्मांतराचा विचार केला. त्यांच्या कार्यकर्त्यांकडून सकारात्मक व नकारात्मक अशा दोन्ही प्रतिक्रिया येऊ लागल्या. पण धर्मत्यागाच्या बाजूने आलेला कल लक्षणीय होता. आपल्या समाजातील मोठा जनसमुदाय या [[हिंदू]] धर्माचा त्याग करण्यास तयार आहे हे कळल्यावर आंबेडकरांवर दुसरी जबाबदारी येऊन पडली - पर्यायी धर्म निवडायचा कुठला? त्यांना भेदभीव नसलेला व जातविरहीत धर्म हवा होता. पुढे [[१३ ऑक्टोबर]][[इ.स. १९३५]] रोजी [[येवला]] येथे परिषद भरली, त्यात भारताच्या कानाकोपऱ्यातून अस्पृश्य आले होतो. १०,००० वर जनसमुदाय येवले नगरी आला होता. आंबेडकरांचे येवला परिषदेस आगमन झाले व [[अमृत धोंडिबा रणखांबे]] यांनी त्यांचे स्वागत केले. या सभेत आंबेडकरांचे प्रभावी आणि हिंदू धर्माचा समाचार घेणारे भाषण सुरू झाले. ते म्हणाले, “मागच्या पाच वर्षापासून आपण सर्वानी मोठ्या कष्टाने काळाराम मंदिराची चळवळ चालविली. पैसा आणि वेळ खर्ची घालून चालविलेला हा पाच वर्षाचा झगडा व्यर्थ गेला. हिंदूच्या पाषाणहृदयाला पाझर येणे अशक्यप्राय आहे, हे आता पक्के झाले आहे. काळारामाच्या निमित्ताने माणूसकीचे अधिकार मिळविण्यासाठी चालविलेली ही चळवळ निष्फळ ठरली. अशा या निर्दय व अमानुष धर्मापासून फारकत घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण हिंदू आहोत केवळ याच कारणास्तव आपल्यावर हे अस्पृश्यत्व लादण्यात आले आहे. तेच जर आपण दुसऱ्या धर्माचे असतो तर हिंदू आपल्यावर अस्पृश्यत्व लादू शकले असते काय? हा धर्म सोडून एखाद्या दुसऱ्या धर्मात जावे असे तुम्हाला वाटत नाही काय?" आंबेडकर पुढे म्हणतात,<br /> <span style="color: green">
<blockquote>मी अस्पृश्य जातीत जन्माला आलो ते माझ्या हाती नव्हते. हिंदू म्हणून मी जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही.</blockquote> <br /> डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराच्या घोषणेचे हिंदू समाजव्यवस्थेला दिलेला मोठा धक्का होता. परिवर्तनवादी विचारवंतांनी या घोषणेचे स्वागत केले.<ref>{{स्रोत बातमी|url=http://archive.is/wJ65n|title=eSakal|date=2013-08-21|work=archive.is|access-date=2018-03-14}}</ref> ही भीमगर्जना ऐकून अस्पृश्य लोकांमध्ये एक उत्साहाची लाट उसळली. जो अस्पृश्य काल या परिषदेस येताना हिंदूचा गुलाम होता, लादलेल्या द्रारिद्र्याचा बळी होता, तो आता या घोषणेने मनोमनी या सर्व गुलामीतून मुक्त झाला होता. धर्मांतराच्या गर्जनेतून एक निर्णायक संदेश अस्पृश्यांपर्यंत पोहचला. भाषणाच्या शेवटी आंबेडकर अस्पृश्यांना सांगतात की, "आता हा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह बंद करा. पाच वर्ष आपण खूप खटाटोप केली. हिंदूंच्या हृदयात आपल्यासाठी अजिबात स्थान नाही तेव्हा आता हा धर्म सोडून आपण नव्या धर्मात जाणार आहोत. एक नवे पर्व सुरू होत आहे. आम्हांला देवाच्या दर्शनासाठी वा भक्तिभावासाठी म्हणून हा प्रवेश पाहिजे होता असे नव्हे तर समानतेचा अधिकार म्हणून हा प्रवेश हवा होता. जेव्हा यांचा देव आणि हे आम्हांला प्रवेश देऊन समान मानण्यास मागच्या पाच वर्षात मोठ्या एकीने आमच्या विरोधात लढले, तेव्हा आता आम्हीही निर्णायक वळणावर आलोत. मानवी मूल्ये नाकारणार्यांना नाकारण्याच्या निर्णयावर आलोत. जातिभेद मानणारा असा हा यांचा देवही नको व त्याचा धर्मही नको. आपल्या वाटा आपणच शोधू या. अन आता नव्या धर्मात जाण्याच्या तयारीला लागू या."
==संदर्भ==
|