"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ५१३:
[[चित्र:Dr. Babasaheb Ambedkar, chairman of the Drafting Committee, presenting the final draft of the Indian Constitution to Dr. Rajendra Prasad on 25 November, 1949.jpg|thumb|right|300px|घटनाकार [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] [[भारताचे संविधान]] संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. [[राजेंद्र प्रसाद]] यांना सूपुर्द करतांना, [[२६ नोव्हेंबर]], [[इ.स. १९४९|१९४९]]]]
 
अद्वितीय विद्वान व कायदेपंडित म्हणून आंबेडकरांची ओळख होती. त्यामुळे त्यांच्यावर मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून संविधानाच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली होती. तसेच त्यांनी मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्यांक उपसमिती, सल्लागार समिती, ध्वज समिती, संघराज्य घटना समिती या समित्यांचे सदस्य म्हणूनही कार्य केले.<ref>{{Cite book|title=भारताची राज्यघटना आणि प्रशासन|last=कोळंबे|first=रंजन|publisher=भगीरथ प्रकाशन|year=जानेवारी २०१९, द्वितीय आवृत्ती|isbn=|location=पुणे|pages=१३|language=मराठी}}</ref><ref>https://www.loksatta.com/lekha-news/the-formation-of-the-constitution-guidelines-and-dr-ambedkar-1225205/</ref> भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असल्यामुळे आंबेडकरांना "भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार" किंवा "भारतीय संविधानाचे निर्माते" म्हटले जाते.<ref>https://hindi.theprint.in/opinion/why-dr-ambedkar-is-called-the-creator-of-indian-constitution/100030/</ref><ref>https://aajtak.intoday.in/education/story/constitution-day-samvidhan-divas-26-november-dr-bhim-rao-ambedkar-tedu-1-1140319.html</ref>
 
संविधान सभेमध्ये मसुदा समितीचे सदस्य टी.टी. कृष्णम्माचारी यांनी असे म्हटले की, {{Quote|text="संविधान सभेने मसुदा समितीवर सात सदस्य नियुक्त केले होते. त्यापैकी एकाने या सभागृहाचा राजीनामा दिला आणि त्याची जागा दुसऱ्याने घेतली. एकाचा मृत्यू झाला आणि ती जागा रिक्तच राहिली. एक सदस्य अमेरिकेत निघून गेला आणि ती जागा भरली गेलीच नाही, आणि एक अन्य सभासद राज्याच्या राजकारणात गुंतून पडले आणि त्यामुळे तेवढी पोकळी निर्माण झाली. एक किंवा दोन व्यक्ती दिल्लीपासून बरेच लांब होते आणि त्यांची प्रकृती त्यांना उपस्थित राहण्याची अनुमती देत नव्हती. म्हणून सरतेशेवटी असे घडले की, संविधानाचा मसुदा तयार करण्याचे उत्तरदायित्व एकट्या डॉ. आंबेडकरांवर आले. कदाचित सभागृहाला या वास्तवाची जाणीव असावी. डॉ. आंबेडकरांनी ही जबाबदारी, हे कार्य अत्यंत योग्यपणे पार पडले, यात मला तीळमात्रही शंका नाही. म्हणून आम्ही त्यांचे ऋणी आहोत."<ref>{{Cite web|url=https://indianexpress.com/article/opinion/columns/ambedkar-constitution-narendra-modi-govt-2851111/|title=Denying Ambedkar his due|date=14 June 2016|accessdate=6 April 2019}}</ref><ref>{{Cite web|url=http://164.100.47.194/loksabha/writereaddata/cadebatefiles/C05111948.html|title=Constituent Assembly of India Debates|website=164.100.47.194|accessdate=6 April 2019}}</ref>}}