'''थॉट्स ऑन पाकिस्तान''' ([[मराठी]]: पाकिस्तानावरील विचार) हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे बहुचर्चित पुस्तक आहे. हे राजकीय पुस्तक [[इ.स. १९४५१९४०]] मध्ये प्रकाशित झाले. या वेलीवेळी [[भारताची फाळणी|भारताच्या फाळणी]]वरुन संपूर्ण देशात अस्वस्थता होती. या पुस्तकाने या समस्येचे योग्य समाधान प्रस्तुत करण्याच्या दिशेमध्ये आपली महत्वपूर्ण भूमिका निभावली.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.forwardpress.in/2017/02/baba-sahab-dr-ambedkar-ka-srijnatmak-sahity/|शीर्षक=बाबा साहेब डा. आंबेडकर का सृजनात्मक साहित्य|date=2017-02-10|work=फॉरवर्ड प्रेस|access-date=2018-03-26|language=hi-IN}}</ref> याची दुसरी आवृत्ती [[इ.स. १९४५]] च्या फेब्रुवारी महिन्यात '''पाकिस्तान ऑर पार्टिशन ऑफ इंडिया''' या नावाने प्रकाशित करण्यात आली. या पुस्तकाच्या संबंधात डॉ. आंबेडकर लिहितात कि, ‘‘पुस्तकाच्या नावावरून असे वाटते की जसे [[पाकिस्तान]] विषयी एक सामान्य रूपरेषा बनवली आहे परंतु यात याशिवाय इतरही खूप काही आहे. हे भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाच्या सांप्रदायिक पैलूंची एक विश्लेषणात्मक प्रस्तुती आहे. याचा उद्देश पाकिस्तानाच्या क.ख.ग. वर प्रकाश टाकणे सुद्धा आहे. या ग्रंथाला भारतीय इतिहास आणि भारतीय राजकारणाची एक झांकी म्हटले जाऊ शकते.’’<ref>{{स्रोत पुस्तक|url=https://books.google.co.in/books?id=7cIajgEACAAJ&dq=thoughts+on+pakistan&hl=en&sa=X&ved=0ahUKEwiMhs2ntYnaAhXINY8KHZnhAv4Q6AEIKDAA|शीर्षक=Thoughts on Pakistan|last=Ambedkar|first=B. R.|date=2015-08-08|publisher=Bibliolife DBA of Bibilio Bazaar II LLC|isbn=9781298498441|language=en}}</ref>