"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १९५:
 
'अभिव्यक्ती स्वातंत्र्य' हा हल्ली चर्चेचा आणि वादाचा विषय झाला आहे. अशीच काहीशी परिस्थिती १९३४ साली होती. त्यावेळी डॉ. आंबेडकरांनी र.धों. कर्वेंची कोर्टात बाजू मांडताना जे विचार व्यक्त केले होते, ते आजही तंतोतंत लागू पडतात. 'समाजस्वास्थ' या कर्व्यांच्या मासिकाविरुद्धचा हा ऐतिहासिक खटला होता. विसाव्या शतकाच्या प्रारंभापासून रघुनाथ धोंडो कर्वे यांनी महाराष्ट्रात सुरू केलेल्या कार्यामुळे ते पहिल्यापासूनच रुढीवाद्यांच्या टीकेचे लक्ष्य ठरले होते. त्यांचा विषयच तसा होता. ते लैंगिक ज्ञानाबद्दल ते बोलायचे, लिहायचे. जे प्रश्न आजही हलक्या आवाजात बोलले जातात, कर्वे ते त्या काळात मुक्तपणे बोलायचे. प्रामुख्याने लैगिक विषयांना वाहिलेलं त्यांचं 'समाजस्वास्थ्य' हे मासिक सगळ्या बंधनांना झुगारत वैयक्तिक प्रश्नांना सार्वजनिकरीत्या उत्तर देत. त्यासोबतच नैतिकच्या, अश्लीलतेच्या मुद्द्यांवर नवी आधुनिक भूमिका घेत प्रकाशित होत असे. र. धों. कर्वे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर १९३४ मध्ये हा खटला हरले. कर्व्यांना २०० रूपयांचा दंड झाला. पण समाजाच्या वर्तमान आणि भविष्यावर परिणाम करणारे हे असे न्यायालयीन खटले हे विजय-पराभवाच्याही पलीकडचे असतात.<ref>https://www.bbc.com/marathi/india-42236452</ref>
 
शहापूर तालुक्यातील किन्हवली येथील व्यापारी असलेले चंदुलाला सरूपचंद शहा यांच्याविरुद्ध १९३०च्या इंडियन पिनल कोडच्या कायद्याखाली बेकायदा शस्त्रे आणि स्फोटके बाळगल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाला होता. शेवटी हे प्रकरण ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात सुरू असताना शहा यांचे वकील प्रभाकर रेगे यांनी या गुन्ह्यातून तुम्हाला सोडवणे आपणास शक्य नसल्याचे सांगितल्याने शहा हादरून गेले होते. यातून आपली सहीसलामत कोण सुटका करेल, असा प्रश्न त्यांना पडला होता. यावर उपाय म्हणून तुम्ही दादरच्या िहदू कॉलनीमध्ये राहणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या निष्णात वकिलांना जाऊन भेटा, असा सल्ला रेगे यांनी दिली. चंदुलाल शेठ म्हणजे लोक त्यांना दादा म्हणायचे, त्या दादांनी बाबासाहेबांची दादरच्या घरी भेट घेतली. त्यावेळी आपल्या एकूणच नियमित कामात व्यग्र असलेल्या डॉ. आंबेडकरांनी ‘काय काम आहे हे फक्त दोन मिनिटात सांगा. अधिक वेळ माझ्यापाशी नाही’ असे सांगताच शहा यांनी दोनच मिनिटात आपल्यावरील दाखल असलेल्या गुन्ह्याची माहिती बाबासाहेबांना सांगितली. पुढची तारीख कोणती आहे हे विचारत डॉ. आंबेडकरांनी न्यायालयात यायची ग्वाही दिली. दिलेल्या शब्दाप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी ठाणे येथे सत्र न्यायालयात शस्त्र कायद्याप्रकरणी न्यायाधीशांसमोर अवघी दोनच मिनिटे खटल्यानुसार युक्तिवाद केला. या युक्तिवादानंतर न्यायाधीशांकडून चंदुलाल शेठ यांना आरोपातून निर्दोष सोडवण्यात आले. ते केवळ डॉ. बाबासाहेबांच्या वकिली बाण्यामुळे! "मानधन केवळ ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट" शहा यांनी बाबासाहेबांना फीविषयी विचाराताच त्यांनी केवळ ठाणे-दादर रेल्वेचे तिकीट काढून देण्यास सांगितले. सन १९३० ते १९३८ या कालावधीत शहापूर येथील कनिष्ठ स्तर न्यायालयात वकील म्हणून अनेक केसेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवल्या होत्या. शहा यांच्या गुन्ह्याबाबत त्यांचे पुत्र कीर्तीकुमार शहा आजही वडिलांनी सांगितलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या गोष्टी सांगत शहापूरवासीयांना मार्गदर्शन करत असतात. "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खुर्ची अजूनही ठेवली आहे जपून" वाशिंद येथील नाना मलबारी यांच्या घरी डॉ. आंबेडकर आले असताना ते ज्या लाकडी खुर्चीवर बसले होते ती खुर्ची त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली आहे. आता ती खुर्ची कासने येथील विहारात मलबारी यांनी दान केलेली आहे.<ref>http://prahaar.in/%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B2/</ref>
 
== जातीप्रथा-अस्पृश्यतेचा विरोध व सामाजिक सुधार ==