"रूपा कुळकर्णी-बोधी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: '''रुपा कुलकर्णी-बोधी''' (जन्म 1945) ह्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
(काही फरक नाही)

१२:१६, २८ फेब्रुवारी २०२० ची आवृत्ती

रुपा कुलकर्णी-बोधी (जन्म 1945) ह्या एक मराठी सामाजिक कार्यकर्त्या, लेखिका व निवृत्त प्राध्यापिका आहेत.[१]

रुपा कुलकर्णी यांचा जन्म १९४५ मध्ये एका ब्राह्मण कुटुंबात झाला. तत्कालीन नागपूर विद्यापीठात त्या संस्कृतच्या प्राध्यापक होत्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रभाव आहे यामुळे त्यांनी १९९२ मध्ये वयाच्या ४७ वर्षी हिंदू धर्माचा त्याग करत बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर त्यांनी बौद्ध संकल्पनेशी संबंधित 'बोधी' हे आडनाव स्वीकारले. त्यांनी सांगितले की, "मी घरेलू कामगारांबरोबर काम करायला सुरुवात केली होती. ते अशा जातींतून येतात, ज्यांना खालची जात मानली जाते. त्यांची परिस्थिती अंत्यत बिकट असते. त्यामुळे मला माझी जात एक ओझं, एक कलंक वाटायला लागली होती म्हणून ती सोडणंच मला योग्य वाटलं." त्यांच्यामते वृत्तवाहिन्या, वृत्तपत्र आणि फिल्म इंडस्ट्रीच नाही तर टीव्हीवर येणाऱ्या मालिकांमध्येही जातीच्या आधारावर वेगळे राहण्याच्या संस्कृतीला प्रोत्साहन दिले जाते.[२]

  1. ^ https://www.bbc.com/marathi/india-43620153
  2. ^ https://www.bbc.com/marathi/india-43620153