"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १६२:
इ.स. १९१७ च्या जुलै महिन्यात आंबेडकर मुंबईला परत आले. नोकरी करून पैसा साठवण्याचा आणि चार वर्षांच्या आत पुन्हा लंडनला जाण्याचा निर्धार त्यांनी केला. [[बडोदा संस्थान|बडोदा संस्थानच्या]] करारान्वे त्यांनी बडोद्यात दरमहा एकशे पन्नास रुपयांची नोकरीचा स्वीकार केला. आंबेडकरांना महारांचे 'मिलिटरी सेक्रेटरी' म्हणून नेमण्यात आले. मात्र आपल्या कार्यालयात अन्य सहकारी व कर्मचारी अस्पृश्य असल्याने आंबेडकरांचा सतत अपमान करत. आंबेडकर गायकवाडांना याबाबतचे निवेदनही दिले होते, मात्र गायकवाड यावर काही बोलले नाही. अस्पृश्य असल्यामुळे [[वडोदरा|बडोद्यात]] कुठेही आंबेडकरांना जागा मिळाली नाही त्यामुळे नोकरी सोडण्याचा निर्णय त्यांनी घेतला व १९१७ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईला परतले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६५ व ६६|language=मराठी}}</ref> दोन पारशी विद्यार्थांना त्यांच्या घरी जाऊन शिकविण्याचे काम मिळाले, ज्याचे दोन्ही विद्यार्थ्यांकडून त्यांना दरमहा ₹१०० मिळत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६|language=मराठी}}</ref> जोडीला त्यांनी 'स्टॉक्स अँड शेअर्स ॲडव्हायझर्स' नावाची कंपनी सुरु केली, जी व्यापाऱ्यांना आणि व्यापारी संस्थांना सल्ले देत असे. मात्र ही कंपनी महार व्यक्तीची आहे असे समजल्यावर लोकांचे सल्ले घेण्यास येणे बंद झाले व आंबेडकरांना आपली कंपनी बंद करावी लागली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६|language=मराठी}}</ref> 'दावर्स कॉलेज ऑफ कॉमर्स' या व्यापारविषय शिक्षण सल्ले देणाऱ्या महाविद्यालयामध्ये अर्थशास्त्र, बँकेचे व्यवहार आणि व्यापारी कायदे हे विषय शिकवण्यासाठी प्राध्यापक म्हणून आंबेडकरांना दरमहा पन्नास रुपये वेतनावर नियुक्त करण्यात आले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६६ व ६७|language=मराठी}}</ref> हे पन्नास रुपये व दोन शिकवण्याचे शंभर रुपये असे मिळून दीडशे रुपये त्यांना दरमहा मिळे, परंतु घरखर्च व अपूर्ण शिक्षणासाठी साठवणूकीसाठी ही मिळकत त्यांच्यासाठी अपुर्ण होती. ते अर्थशास्त्रीय प्रश्नांवर लेख लिहून वर्तमानपत्रांकडे प्रसिद्धीसाठी पाठवत यातून त्यांना अत्यल्प आर्थिक मदत होई. तिसरा उपाय म्हणून आंबेडकरांनी '[[कास्ट्स इन इंडिया]]' व '[[स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमीडिज]]' आपले दोन प्रबंध पुस्तकस्वरुपाने प्रसिद्ध केले. यातूनही त्यांना पैसा जमा करण्याइतपत अर्थ प्राप्ती झाली नाही. या अवस्थेत सुद्धा ते मुंबईतील विविध ग्रंथालयात जात आणि लंडनच्या अभ्यासास उपयुक्त अशा ग्रंथांचे वाचन करत व टिपणे काढत.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६७|language=मराठी}}</ref> पुढे 'सिडनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स' या मुंबईतील सरकारी महाविद्यालयात 'राजकीय अर्थशास्त्र' विषयाच्या प्राध्यापकाची जागा दोन वर्षांकरीता रिकामी झालेल्या जागेवर शासनाने १० नोव्हेंबर १९१८ रोजी डॉ. आंबेडकरांची नेमणूक केली. त्यांना या नोकरीचा पगार दरमहा ४५० रुपये मिळे.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६७ व ६८|language=मराठी}}</ref> याचदरम्यान इ.स. १९१८ मध्ये त्यांचे मोठे भाऊ आनंदराव यांचे निधन झाले आणि संपूर्ण कुटुंबाची घरखर्याची जबाबदारी एकट्या आंबेडकरांवर आली. प्राध्यापक आंबेडकरांच्या अर्थशास्त्रावरील व्याख्यानांनी (लेक्चर्स) त्यांचे विद्यार्थी प्रभावित होत असत. ते विद्यार्थीप्रिय प्राध्यापक बनले. त्यांचे लेक्चर्स ऐकण्यासाठी अन्य महाविद्यालयांचेही विद्यार्थी वर्गात येऊन बसत असत. आंबेडकर सिडनहॅम महाविद्यालयाच्या ग्रंथालयातील प्रामुख्याने अर्थशास्त्रावरील ग्रंथ वाचत असत व टिपणे काढत असत. आंबेडकर घरखर्चासाठी शंभर रुपये देत व बाकीचे पैसे पुढील शिक्षणासाठी जमा करुन ठेवत असत. ११ मार्च १९२० रोजी त्यांची प्राध्यापकाची नोकरी संपली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६८|language=मराठी}}</ref> सामाजिक कार्याच्या माध्यमातून आंबेडकरांचा कोल्हापूर संस्थानचे [[शाहू महाराज|राजर्षी शाहू महाराज]] यांच्याशी परिचय झाला होता. त्यामुळे जेव्हा आंबेडकर पुढील शिक्षणासाठी लंडनल्या जाण्याच्या तयारीला लागले तेव्हा त्यांना शाहू महाराजांनी दीड हजार रुपये सहकार्य म्हणून दिले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६८ व ६९|language=मराठी}}</ref> ५ जुलै १९२० रोजी 'सिटी ऑफ एक्टिटर' या बोटीने आंबेडकर लंडनकडे रवाना झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९|language=मराठी}}</ref>
 
३० सप्टेंबर १९२० रोजी आंबेडकरांनी लंडन स्कूल इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये प्रवेश घेतला. त्याचप्रमाणे ग्रेज-इन मध्येही प्रवेश घेऊन बॅरिस्टरीचा अभ्यास सुरु केला.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९|language=मराठी}}</ref> ते सकाळी सहा वाजता ग्रंथालयात जात, ग्रंथालयात सर्वप्रथम त्यांचाच प्रवेश होई. दिवसभर पुरेल इतके साहित्य ते एकदाच आपल्या बसण्याच्या ठिकाणी ठेवत. त्यांचा अभ्यास अखंड चाले. दुपापरच्या वेळी थोडेसे खाण्यासाठीच ते जागेवरुन थोडा वेळ आपल्या जागेवरुन उठत असत. ग्रंथालय सायंकाळी बंद होत असताना ते सर्वात शेवटी बाहेर पडत असत. राहण्याच्या ठिकाणीही ते जेवणानंतर रात्री मध्यरात्रीपर्यंत अभ्यास करत असत. खाणे, आराम करणे, झोप घेणे किंवा मनोरंजनासाठी वेळे देणे; हे सर्व त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हतेच. सतत अभ्यास करणे, हेच त्यांचे ध्येय होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=६९-७०|language=मराठी}}</ref> वर्षभरात आंबेडकरांनी त्यांचा शोधप्रबंध 'प्रॉव्हिन्शियल डीसेंट्रलायझेशन ऑफ इम्पिरियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया' (ब्रिटिश भारतातील साम्राज्यीय अर्थव्यवस्थेचे प्रांतीय विकेंद्रीकरण) तयार केला आणि जून १९२१ मध्ये एम.एस्सी. च्या पदवीसाठी लंडन विद्यापीठात सादर केला. विद्यापीठाने प्रंबंध स्वीकारून २० जून १९२१ रोजी त्यांना अर्थशास्त्रातील 'मास्टर ऑफ सायन्स' (एम.एस्सी.) ही पदवी प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७०-७१|language=मराठी}}</ref> २८ जून १९२२ रोजी ग्रेज-इन संख्येने त्यांना 'बॅरिस्टर-ॲट-लॉ' (बार-ॲट-लॉ) ही वकिलीची पदवी प्रदान केली. आंबेडकर बॅरिस्टर बनले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१|language=मराठी}}</ref> त्यानंतर '[[द प्रोब्लम ऑफ रुपी]]' (रुपयाचा प्रश्न) हा अर्थशास्त्रीय प्रबंध तयार करून 'डॉक्टर ऑफ सायन्स' (डी.एस्सी.) च्या पदवीसाठी ऑक्टोबर [[इ.स. १९२२|१९२२]] मध्ये लंडन विद्यापीठात सादर केला. त्यांनतर, अर्थशास्त्रावर संशोधनात्मक लेखन करुन [[जर्मनी]]च्या [[बॉन विद्यापीठ]]ाचीही डॉक्टरेट पदवी मिळवावी हा विचार करुन ते जर्मनी] येथे गेले आणि बॉन विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. त्यांना [[जर्मन भाषा]]ही शिकलेले होते. तेथे तीन महिने राहून त्यांनी प्रबंधलेखनाची तयारी केली. परंतु त्यांना हे अध्ययन मध्येचे सोडून ताबडतोब लंडनला यावे लागले. कारण त्यांचे शिक्षक एडविन कॅनन यांनी डी.एस्सी. पदवी संदर्भात लंडनला येण्यासंबंधीचे पत्र त्यांना पाठवले होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७१|language=मराठी}}</ref> आंबेडकर लंडनला परतले, १९२३ च्या मार्च महिन्यात परीक्षकांनी स्वतःच्या अपेक्षेप्रमाणे पुनर्लेखन करण्याचे सांगितले होते. आंबेडकरांनी आपले निष्कर्ष न बदलता लिखानाची पद्धत बदलली व पुनह प्रबंध विद्यापीठात सादर केला. इ.स. १९२३ च्या नोव्हेंबर मध्ये विद्यापीठाने त्यांना डी.एस्सी. ची पदवी प्रदान केली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७२|language=मराठी}}</ref> लंजनच्या 'पी.एस. किंग अँड कंपनी' प्रकाशन संस्थेने 'द प्रोब्लम ऑफ रुपी' हा प्रबंध इ.स. १९२३ च्या डिसेंबर मध्ये ग्रंथरुपाने प्रसिद्ध केला. या ग्रंथाला डी.एस्सी. पदवीचे मार्गदर्शक असलेले अर्थशास्त्रज्ञ डॉ. एडविन कॅनन यांनी प्रस्तावना लिहिली होती. हा प्रबंध आंबेडकरांनी आपल्या आई-वडीलांस अर्पण केला होता.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=७३|language=मराठी}}</ref> या संशोधनांमुळे तसेच ग्रंथलेखनामुळे अर्थशास्त्र व राज्यशास्त्र ज्ञानशाखांतील तज्ज्ञ व्यक्ती तसेच निष्णात [[कायदेपंडित]] म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओळखले जाऊ लागले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=८५|language=मराठी}}</ref> लंडन विद्यापीठातील शिक्षण पूर्ण करुन ३ एप्रिल १८२३ रोजी आले होते. विद्यार्थी दशेत इंग्लंडमध्ये असताना ज्या अभ्यासक्रमाला ८ वर्षे लागतात तोच आंबेडकरांनी २ वर्षे ३ महिण्यात यशस्वी तऱ्हेने पूर्ण केला होता. यासाठी त्यांना २४ तासांपैकी २१ तास दररोज अभ्यास करावा लागला.<ref>{{Cite book|title=माझी आत्मकथा|last=आंबेडकर|first=डॉ. बाबासाहेब|publisher=कौशल्य प्रकाशन|year=२०१४|isbn=|location=औरंगाबाद|pages=३१|language=मराठी}}</ref>
 
== जातिसंस्था विषयक सिद्धान्त ==