"डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
दुवे
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ १:
'''डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ग्रंथसंपदा व इतर लेखन''' हे विपूल प्रमाणात आहे. त्यांच्या लेखन साहित्यात त्यांनी लिहिलेली [[ग्रंथ|ग्रंथ-पुस्तके]], [[प्रबंध]], लेख, भाषणे, स्फुटलेख, पत्रे, [[वृत्तपत्र|वर्तमानपत्रे]] इत्यादींचा समावेश होतो. भारतातील कोणत्याही राजकीय नेत्याने केले नाही एवढे अधिक लेखन [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी केलेले आहे. पूर्ण झालेले एकूण २२ [[ग्रंथ]] आणि [[पुस्तक|पुस्तिका]], १० अपूर्ण राहिलेले ग्रंथ, १० निवेदने किंवा साक्षीपुरावे, १० [[प्रबंध|शोधनिबंध]], लेख आणि परिक्षणे हा एवढा संग्रह आंबेडकरांच्या [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]] लेखनाचा आहे. आंबेडकर हे बहुमुखी प्रतिभाशाली होते. ते [[मराठी भाषा|मराठी]], संस्कृत, पाली, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच, जर्मन, गुजराती, बंगाली, कन्नड व पारसी या भाषा जाणणारे विद्वान होते. आंबेडकरांचे बहुतांश लेखन हे इंग्रजीत, काही मराठीत आणि बाकी इतर भाषेतील आहे. त्यांनी आपल्या लेखनातून धर्मसुधारणा व समाजसुधारणा याकडे प्रामुख्याने लक्ष दिले. महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांच्या भाषण व लेखन साहित्याचे आतापर्यंत एकूण २२ खंड प्रकाशित केले आहे, अजून खूप बरेचशे लेखन प्रकाशीत आहे. त्यांच्या संपूर्ण साहित्याला एकूण ४२ खंड देखील अपूरे पडतील असे आंबेडकरांच्या ग्रंथावर काम करणाऱ्या प्रकाशन समितीचे म्हणने आहे. मल्याळम भाषेत बाबासाहेबांच्या साहित्याचे ४० खंडावर प्रकाशीत झाली आहे.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी काव्य, कथा, नाटक इत्यादी प्रकारच्या साहित्याची कोणतीही रचना केली नाही, परंतु त्यांच्या लेखणीतून विपुल साहित्याचे सृजन झाले आहे. त्यांचे साहित्य मूळात इंग्रजी भाषेतील सखोल अध्ययन व चिंतनानंतर तयार झाले आहे. बाबासाहेबांचे साहित्य जेवढे त्यांच्या वेळी प्रासंगिक होते, त्यापेक्षाही कैक अधिक वर्तमानात प्रासंगिक आहे. आज बाबासाहेबांचे साहित्य व विचार भारतातच नाही तर संपूर्ण जगामध्ये संशोधनाचा विषय बनले आहे. त्यांच्या बद्दल सतत नवीन माहिती मिळत आहे. लोक त्यांच्या जीवनाशी पूर्णपणे परीचित आहेत, पण सध्या त्यांच्या साहित्याशी आणि विचारांशी कमी परिचीत झाले आहेत.