"रामायण महाभारताची जैन संस्करणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १३:
 
==जैन महाभारते==
पुन्नाटसंघीय दिगंबर संप्रदायाचे आचार्य जिनसेन यांनी लिहिलेल्या 'हरिवंशपुराणात वर्णन केलेल्या कृष्ण आणि जरासंध यांच्या लढाईचेच विस्तृत वर्णन जैन महाभारतात आहे.
 
कृष्णाचे वडील वसुदेव अतिशय देखणे होते. त्यांच्या पत्नी-देवकीने आठ मुलांना जन्म दिला; पहिल्या सहा मुलांच्या जागी एका व्यापाऱ्याच्या पत्नीने सहा मृत मुले ठेवली. सातव्या आणि आठव्या मुलांना गुराख्यांनी नेले आणि गुराखी म्हणूनच वाढवले. वसुदेव शेवटी जैन मुनी बनले. कृष्णाच्या चुलत भावाला त्यांच्या लग्नाच्या जेवणासाठी मारल्या गेलेल्या पशूंच्या किंकाळ्या सहन झाल्या नाहीत, म्हणून तेही जैन मुनी झाले, व पुढे २४वे तीर्थंकर म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
महाभारताच्या जैन संस्करणानुसार शंभर कौरवांनी पाच पांडवांविरुद्ध युद्ध घोषित केले. या युद्धासाठी पांडवांनी कृष्णाची मदत मागितली. पांडवांनी जरासंधाशी लढण्यासाठी कृष्णाला मदत करावी, या अटीवर कृष्णाने मदत करणे कबूल केले. कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये कृष्णाने जरासंधावर सुदर्शन चक्र फेकले. पण नेमिनाथ मध्येच उभे असल्याने चक्र जरासंधाच्या आणि नेमिनाथांच्या आजूबाजूला फिरून परत कृष्णाच्या बोटावर येऊन बसले. कृष्णाने दुसऱ्यांदा जरासंधावर सुदर्शन चक्र फेकून त्याचा वध केला. शेवटी कृष्णाने पांडवांना मदत करून कृष्णाने कौरवांचा पराभव केला.
 
यावरून दिसते की रामायण-महाभारताची जैन संस्करणे वाल्मिकी-व्यासरचित रामायण-महाभारतांपेक्षा वेगळी आहेत. सगळा भर पात्रांच्या जैन मुनी बनण्यावर आणि अहिंसेच्या पालनावर आहे.
 
 
 
 
(अपूर्ण)