"सदस्य:Sandesh9822/धूळपाटी/डॉ. बाबासाहेब आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन |
||
ओळ १२६:
== सुरुवातीचे जीवन ==
[[चित्र:Young Ambedkar.gif|thumb|right|तरुण डॉ. आंबेडकर]]
मालोजीराव हे रामजींचे वडील व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आजोबा होते. मालोजी इंग्लिश राजसत्तेच्या सैन्यात शिपाई म्हणून भरती झाले होते. सैन्यातील नोकरीमुळे मालोजीराव सैनिकी शाळेत शिक्षण घेऊ शकले. त्यांनी रामानंद पंथाची दीक्षा घेतली होती. त्यामुळे मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारात शुद्ध विचाराला व शुद्ध आचाराला महत्त्वाचे स्थान होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांना तीन मुलगे व एक मुलगी अशी चार अपत्ये होती. दोन मुलांनंतर मुलगीचा मिराबाई यांचा जन्म झाला होता. तर इ.स. १८४८ च्या सुमारास जन्मलेले [[रामजी सकपाळ|रामजी]] हे मालोजीरावांचे चौथे अपत्य होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> मालोजीरावांचा पहिला मुलगा घरदार त्यागून संन्यासी झाला. दुसरा मुलगा इंग्रजी सैन्यातच नोकरीस लागला. तिसरा मुलगा रामजींनी सैनिकी शाळेत शिक्षण घेतले व पुढे ते नॉर्मलची परीक्षाही उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३२|language=मराठी}}</ref> शिक्षण सुरु असताना रामजी इ.स. १८६६ च्या सुमारात वयाच्या १८व्या वर्षी इंग्रजी सैन्याच्या १०६ सॅपर्स अँड मायनर्स तुकडीत शिपाई म्हणून भरती झाले. रामजी १९ वर्षाचे असताना त्यांचा विवाह १३ वर्षीय [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाईंशी]] झाला. भीमाबाईंचे वडील मुरबाडचे राहणार् होते व ते इंग्रजी सैन्यात [[सुभेदार]] या पदावर होते.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> रामजी हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांची संत कबीराचे दोहे, ज्ञानेश्वर, नामदेव, चोखोबा, एकनाथ, तुकाराम इत्यादी संतांचे अभंग पाठ केले होते. ते रोज ज्ञानेश्वरी पाचव सकाळी स्त्रोते व भुपाळ्याही म्हणत. सैन्यात शिपाई असताना सैनिकी शाळेत त्यांचे इंग्रजी शिक्षण सुरु झाले व त्यांनी इंग्रजी उत्तमरित्या आत्मसात केली. यामुळे ते नॉर्मल स्कूलच्या (मॅट्रिकच्या) परीक्षेत उत्तीर्ण झाले.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३३|language=मराठी}}</ref> मॅट्रिक परीक्षा उतीर्ण झाल्यामुळे त्यांची शिपाई पदाची नोकरी सुचली व त्यांना सैनिकी शाळेत म्हणजेच 'नॉर्मल स्कूल'मध्ये शिक्षक पदाच्या नोकरीची पदोन्नती मिळाली.<ref>{{Cite book|title=महामानव डॉ. भीमराव रामजी आंबेडकर|last=गायकवाड 'राजवंश'|first=डॉ. ज्ञानराज काशिनाथ|publisher=रिया प्रकाशन|year=ऑगस्ट २०१६, सहावी आवृत्ती|isbn=|location=कोल्हापूर|pages=३४|language=मराठी}}</ref>
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म [[एप्रिल १४|१४ एप्रिल]] [[इ.स. १८९१|१८९१]] रोजी सध्याच्या [[मध्य प्रदेश]] राज्यातील [[इंदूर जिल्हा|इंदूर]] जिल्ह्यामधील [[महू]] (आता [[डॉ. आंबेडकर नगर]]) या गावी व लष्करी छावणीत झाला. आंबेडकरांचे पूर्वज भारतीय ब्रिटिश सैन्यात कार्यरत होते. भीमरावांचे आजोबा मालोजी सकपाळ हे भारतीय ब्रिटिश सैन्यात शिपाई होते; वडील रामजी सकपाळ हेही ब्रिटिश सैन्यात 'सुभेदार' व 'सैनिकी शिक्षक' या पदांवर कार्यरत होते. रामजींनी [[मराठी]] व [[इंग्रजी]] भाषेचे यथाविधी शिक्षणही घेतले होते. रामजी सकपाळ [[महू]] येथील सैन्य छावणीत सैन्यात कार्यरत होते. भीमराव हे रामजी सकपाळ व आई [[भीमाबाई रामजी सकपाळ|भीमाबाई]] यांचे १४वे व अंतिम अपत्य होते. बाळाचे नाव 'भिवा' असे ठेवण्यात आले, तसेच त्यांची भीम, भीमा व भीमराव ही नावेही प्रचलित झाली. [[आंबेडकर कुटुंब|आंबेडकरांचे कुटुंब]] हे त्याकाळी [[अस्पृश्य]] ([[दलित]]) गणल्या गेलेल्या [[महार]] जातीचे होते आणि महाराष्ट्रातील [[रत्नागिरी जिल्हा|रत्नागिरी]] जिल्ह्याच्या [[मंडणगड]] तालुक्यातील [[आंबडवे]] या गावचे होते. ('आंबडवे' या गावचा 'अंबावडे' असा चूकिचा उल्लेख अनेक ठिकाणी केला गेलेला आहे.<ref>{{स्रोत बातमी|url=https://www.loksatta.com/pune-news/about-name-of-ambadve-village-1227278/|title=आंबडवे नाव योग्यच – खासदार अमर साबळे|date=2016-04-14|work=Loksatta|access-date=2018-03-14|language=mr-IN}}</ref><ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.loksatta.com/kgtocollege-news/international-standard-educational-complex-at-original-village-of-dr-babasaheb-ambedkar-446635/lite/|title=डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शैक्षणिक संकुल – Loksatta|website=www.loksatta.com|access-date=2018-03-14}}</ref><ref>{{स्रोत बातमी|url=https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-ambedkars-teacher-family-saving-memories-of-ambedkar-5489831-NOR.html|title=आंबेडकर गुरुजींचं कुटुंब जपतंय सामाजिक वसा, कुटुंबानं सांभाळल्या ‘त्या’ आठवणी|date=2016-12-26|work=marathibhaskar|access-date=2018-03-14|language=mr}}</ref>) अस्पृश्य असल्यामुळे त्यांच्यासोबत नेहमी सामाजिक-आर्थिक भेदभाव केला गेला. इ.स. १८९४ मध्ये रामजी सकपाळ निवृत्त झाले आणि दोन वर्षानंतर हे कुटुंब [[सातारा]] येथे गेले. त्यांच्या या स्थानांतरानंतर थोड्या कालावधीत [[इ.स. १८९६]] मधे मस्तकशूळ या आजाराने आंबेडकरांच्या आईचे निधन झाले, त्यावेळी आंबेडकर ५ वर्षाचे होते. त्यानंतर बालक भीमाचे व अन्य मुलांची संगोपन त्यांच्या मीरा आत्यांनी केले आणि कठीण परिस्थितीत ते जगले. आंबेडकरांच्या १४ भावंडापैकी ७ जणांचे निधन बालपणीच झाले होते. तीन मुलगे - बलराम, आनंदराव आणि भीमराव आणि तीन मुली - मंजुळा, येसू आणि तुळसा हे ७ जण जगले. त्यांच्या भाऊ-बहिणींपैकी फक्त आंबेडकरच शालेय परीक्षा उत्तीर्ण होऊन हायस्कूलमध्ये गेले. भीमराव वयाने लहान असल्यामुळे कॅम्प दापोली येथील शाळेत त्यास प्रवेश देता न आल्याने घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख करून द्यावी लागली.
|