"सम्राट अशोक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
ओळ ४१:
'''चक्रवर्ती सम्राट अशोक''' (जन्म: [[इ.स.पू. ३०४]] - मृत्यू [[इ.स.पू. २३२]]) हे [[मौर्य|मौर्य घराण्यातील]] महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांनी अखंड भारतावर [[इ.स.पू. २७२]] - [[इ.स.पू. २३२]] दरम्यान राज्य केले. आपल्या सुमारे ४० वर्षांच्या विस्तृत राज्यकाळात त्यांनी पश्चिमेकडे [[अफगाणिस्तान]] व थोडा [[इराण]], पूर्वेकडे [[आसाम]] तर दक्षिणेकडे [[म्हैसूर]]पर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला. चक्रवर्ती सम्राट अशोक हे जगातील सर्वात महान आणि शक्तिशाली सम्राटांमध्ये अगदी शिर्ष स्थानावर आहेत. सम्राट अशोकांना भारताच्या इतिहासात ही सर्वात महान सम्राट म्हणून स्थान दिले आहे[[प्राचीन भारताची रूपरेषा|. प्राचीन]] भारताच्या परंपरेत चक्रवर्ती सम्राटांची पदवी ज्यांनी जनमानसावर तसेच भारताच्या मोठ्या भूभागावर राज्य केले अशाच महान सम्राटांना दिली जाते. सम्राट अशोकांना ‘चक्रवर्ती सम्राट’ असे म्हणतात, चक्रवर्ती सम्राट म्हणजे ‘सम्राटांचा सम्राट’. जगाच्या इतिहासात असे अनेक सम्राट होउन गेले ज्यांचे उल्लेख प्राचीन ग्रंथांमध्ये आहेत परंतु त्यांच्या अस्तित्वाबाबतची साशंकता आहे. असे मानतात की प्राचीन चक्रवर्ती सम्राटांच्या पंक्तीतील सम्राट अशोक हेच असे पहिले आणि शेवटचे महान चक्रवर्ती सम्राट झाले त्यानंतर कोणीही त्या तोडीचा राज्यकर्ता भारतात झाला नाही. सम्राट अशोकांनी अखंड भारताच्या बहुतांशी भागावर राज्य केले. आजचा [[पाकिस्तान]], [[अफगाणिस्तान]] पूर्वेकडे [[बांग्लादेश]] ते दक्षिणेकडे [[केरळ]] पर्यंत तसेच [[नेपाळ]], [[भूतान]] [[इराण]], [[ताजिकिस्तान]] आणि [[तुर्कमेनिस्तान]] या देशांमध्ये अशोकांच्या साम्राज्याच्या सीमा होत्या. अत्यंत शूर असे सम्राट अशोक आपल्या आयुष्यात एक ही युद्ध हरले नाहीत. कलिंगाच्या युद्धातील महासंहारानंतर [[कलिंग]] काबीज झाला, जे कोणत्याही मौर्य राज्यकर्त्यास पूर्वी जमले नव्हते. त्यांच्या राज्याचे केंद्रस्थान ज्याला [[बिहार]] म्हणतात तो मगध होता, व आज पटणा म्हणून ओळखली जाणारी [[पाटलीपुत्र]] ही त्यांची राजधानी होती. काही इतिहासकारांच्या मते यात साशंकता आहे. [[कलिंगचे युद्ध|कलिंगाच्या युद्धात]] झालेल्या मनुष्यहानी पाहून त्यांनी प्रचलित वैदिक परंपरा झुगारून हिंसेचा त्याग केला आणि मानवतावादी [[बौद्ध धर्म]]ाचा स्वीकार केला व नंतरच्या आयुष्यात त्यांनी स्वतःला [[बौद्ध]] धर्माच्या प्रसारास समर्पित केले. सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म संपूर्ण [[आशिया खंड]]ात तसेच इतर प्रत्येक खंडात पसरवला होता. अशोकांच्या संदर्भातील अनेक शिलालेख भारताच्या काना कोपऱ्यात सापडतात त्यामुळे अशोकांबाबतची उपलब्ध ऐतिहासिक माहिती भारताच्या प्राचीन काळातल्या कोणत्याही ऐतिहासिक व्यक्तीपेक्षा अधिक आहे. सम्राट अशोक [[सत्य]], [[अहिंसा]], [[प्रेम]], सहिष्णूता आणि शाकाहारी जीवनप्रणीली यांचे थोर पुरस्कर्ते होते म्हणूनच एक अतिशय परोपकारी प्रशासक अशीच इतिहासात त्यांची ओळख झाली आहे. अशोकाने आपल्या प्रजाजनांना व प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या शीलालेखातून काही राजाज्ञा दिलेल्या आहेत. अशोकाचे शिलालेख हे मौर्य इतिहासाचे महत्त्वाचे साधन म्हणून ओळखले जाते. सर्वप्रथम ब्रिटिश अभ्यासक जेम्स प्रिन्सेप यांना अशोकाचे शिलालेख वाचता आले. ते अनेक भाषांचे अभ्यासक होते. अशोकाचे [[शिलालेख]] हे ब्राह्ममी,खरोष्टी आणि अरेमाइक या तीन लिपींमध्ये आढळलेले आहेत. त्यातील अनेक अभिलेख हे [[ब्राम्ही लिपी|ब्राम्ही]] लिपीतील असून ते जेम्स प्रिन्सेप यांनी वाचले, त्यातूनच या चक्रवर्ती सम्राटाच्या आयुष्याची आणि एकूणच मौर्य साम्राज्या विषयीची सखोल माहिती हीअभ्यासकांना मिळालेली आहे अशोकाने आपल्या शिलालेखामध्ये स्वतःला 'देवानाम प्रिय' असे संबोधले आहे. कलिंग युद्ध कलिंग युद्धानंतर त्याचे झालेले मनपरिवर्तन, त्याने स्वीकार केलेल्या बौद्धधर्म, बौद्ध धर्माची तत्वे आणि एकूणच धर्मप्रसाराचे कार्य महामात्र यांची नेमणूक या सर्व घटनांचा उल्लेख हा शिलालेखात आलेला आहे. [[सम्राट अशोक]] हा या काळातील भारतातील पहिला चक्रवर्ती राजा होय सम्राट याचा अर्थ ज्याचा रथ घोडा चारी दिशांना कुणीही अडवू शकत नाही असा पराक्रमी शासक व विजेता होय सम्राट अशोकाने प्रशासकीय संदर्भाने अनेक महत्त्वपूर्ण बदल केले प्रशासनामध्ये महामांत्रा हे पद निर्माण करून धर्मप्रसाराला उत्तेजन दिले आपल्या मुलांनादेखील धर्मप्रसारासाठी त्यांनी देशाबाहेर जाण्यासाठी प्रेरणा दिली प्रजा कल्याणाचे हेतूने अनेक उपक्रम हाती घेतले अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या रस्त्याच्या दुतर्फा झाडी लावून लोकांना आवश्यक त्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला
अशोकानंतर राज्याला ोग्य उत्तराधिकारी न लाभल्यामुळे [[मौर्य साम्राज्य|मौर्य]] साम्राज्याचा र्‍हास घडून आला विशाल आणि एकछत्री केंद्रीकृत राज्य उभारण्याचा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावर सर्वप्रथम मौर्य सम्राट यांनी केला यामध्ये चंद्रगुप्त आणि सम्राट अशोक यांची कार्य कीर्तन ही खूप महत्त्वपूर्ण राहिलेली आहे
माधव कोंडविलकर आपले पुस्तक ‘देवांचा प्रिय राजा प्रियदर्शी सम्राट अशोक’ मध्ये म्हणतात की, ''‘‘काही बाबतीत चक्रवर्ती सम्राट अशोकांची तुलना, [[अलेक्झांडर द ग्रेट]], [[ऑगस्टस|ऑगस्टस सीझर]], चेंगीजखान, [[तैमूर]], [[रशिया]]चा पहिला [[पीटर द ग्रेट|पीटर]] किंवा पहिला [[नेपोलियन]] यांच्याशी केली जाऊ शकते; पण [[अलेक्झांडर]]सारखा सम्राट् अशोक अति-महत्त्वाकांक्षी नव्हता. ऑगस्टस सीझरसारखा तो एक आदर्श शासनकर्ता होता; पण आपण हुकूमशहा म्हणून ओळखलं जावं असं जे सीझरला वाटायचं तसं अशोकाला कधीच वाटलं नाही. आपली तशी ओळख व्हावी अशी त्याची कधीच इच्छा नव्हती. अशोक एक सामर्थ्यवान सेनापती होता; पण आपल्या पराक्रमाबद्दल, विजयाबद्दल पहिला [[नेपोलियन]] जसा सदैव असंतुष्ट असायचा तसं अशोकाचा बाबतीत नव्हतं. प्रजाजनांनी आपल्यावर प्रेम करावं, असं त्याला मनापासून वाटत असे. चेंगीसखान, [[तैमूर]] आणि रशियाच्या पहिल्या [[पीटर द ग्रेट|पीटर]]ने त्यांच्या प्रजेवर जशी दहशत बसवली होती, तशी दहशत सम्राट अशोकने कधीच बसवली नाही. मनाचा मोठेपणा किंवा उमदेपणा, मनातला शुद्ध भाव, स्वभावातला प्रामाणिकपणा, स्वत:च्या प्रतिष्ठेबद्दलप्रतिष्ठेबद्दलची किंवा मानमरातबाबद्दलच्या स्पष्ट स्वच्छ कल्पना आणि मनातलं सर्वांबद्दलचं प्रेम या अशोकाच्या, इतरांपेक्षा वेगळेपणाने जाणवणाऱ्या वैशिष्ट्यांमुळे त्याला [[गौतम बुद्ध|गौतम बुद्धांच्या]] किंवा [[येशू|येशू ख्रिस्ताच्या]] पंक्तीत नेऊन बसवले होते.’’''
 
== बालपण व सुरुवातीची कारकीर्द ==