"सुजात आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ ८:
 
== राजकीय कारकीर्द ==
२७ मे २०१८ रोजी आझाद मैदानावर सुजात आंबेडकर यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेशी खुला संवाद साधला. त्यांच्या भाषणाला उपस्थितांनी प्रतिसाद दिला. या एल्गार मार्चच्या निमित्ताने आंबेडकर घराण्याची चौथी पिढी सामाजिक क्षेत्रात उतरली. एल्गार मार्चमध्ये सुजात यांचे दोन मिनिटांचे भाषण होते. पण, ते चमकदार अन् प्रभावी ठरले. त्यांनी शुद्ध भाषेत आणि नम्रतेने भाषण केले. सुजात म्हणाले, "वर्षातल्या दोन गोष्टी घ्या. एक कोरेगाव भीमाची आणि दुसरी टाटा इन्स्टिट्यूटमधील शिष्यवृत्ती बंदची. या दोन्ही घटना तळातल्या समुदायाने व्यवस्थेला प्रश्न करू नयेत, यासाठी घडवल्या गेल्या आहेत. आपण सक्षम होऊ नये, असे षडयंत्र देशात रचले जात आहे’, असा गंभीर आरोप त्याने केला. मिलिंद एकबोटे यांना अटक झाली, तोच गुन्हा संभाजी भिडे यांनीसुद्धा केलाय. आम्ही सर्व पुरावे दिलेत. पण, दोन महिने २६ दिवस उलटूही भिडे यांची अटक जाणीवपूर्वक टाळली जात आहे, असा आरोप त्याने केला. ‘या राज्यात न्याय समान नाही. त्यामुळे आता हे सरकार बदललेच पाहिजे’," असे आवाहन त्याने उपस्थितांना केले. त्याच्या आवाहनाला उपस्थितांनी दादही दिली.<ref>https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MUM-HDLN-launch-of-prakash-ambedkars-son-sujath-5838382-NOR.html</ref>   
 
महाराष्ट्रातील २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत [[प्रकाश आंबेडकर]] अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून उभे राहिले होते. वडीलांच्या प्रचार करण्यासाठी सुजातने महिनाभर सोलापूर मतदारसंघात प्रचारकार्य केले होते.<ref>https://m.lokmat.com/solapur/prakash-ambedkar-will-contest-solapur-i-will-stay-thirty-days-sujath-ambedkar/</ref>
 
== संदर्भ ==