"दिनू रणदिवे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १:
'''दिनू रणदिवे''' (वय: ९४ वर्ष) हे एक पत्रकार आहेत. ते पत्रकारितेतील लोकशाही मूल्ये, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, दलित, आदिवासी व श्रमिकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडले आहेत.
दिनू रणदिवे यांनी पत्रकारितेत महत्त्वाचे योगदान दिले आहे. ते १९५५ मध्ये समाजवादी पक्षाने छेडलेल्या [[गोवा मुक्ती संग्राम]]ातही सक्रिय होते. नंतर [[संयुक्त महाराष्ट्र चळवळ]]ीतही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला तसेच या लढ्यात त्यांनी डांगे, [[आचार्य अत्रे]] यांच्या बरोबर कारावासही भोगला. संयुक्त महाराष्ट्र समितीने १९५६ साली ‘संयुक्त महाराष्ट्र पत्रिका’ नावाचे अनियतकालिक सुरू केले. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात येथूनच झाली होती. नंतर ‘[[महाराष्ट्र टाइम्स]]’मध्ये रणदिवे रूजू झाले व महाराष्ट्र टाइम्सचे मुख्य वार्ताहर म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम केले. १५ सप्टेंबर १९८५ साली ते निवृत्त झाले तोईपर्यंत त्यांनी वार्तांकनातील महत्त्वाचे मापदंड घालून दिले. १९७२ मध्ये रणदिवेंनी केलेले बांग्लादेश मुक्ती लढ्याचे वार्तांकनही गाजले होते. त्यांनी संयुक्त ''महाराष्ट्र पत्रिका'' व ''लोकमित्र'' या नियतकालिकाचे संपादन त्यांनी केले आहे. ते सेबिस्टियन डिसोझा मुंबई मिररमध्ये फोटो एडिटर होते. मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यावेळी त्यांनी धाडसाने छायाचित्रण करून पाकिस्तानी दहशतवादी [[अजमल कसाब]]ला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते, जो या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा ठरला. त्यापूर्वी त्यांनी फ्रेंच वृत्तसंस्था एएफपीसाठीही काम केले होते. २००२ मधील गुजरात दंगलीचं वास्तव सुद्धा त्यांनी माध्यमांमध्ये आणले होते.<ref>https://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/mumbai-press-club-awards-dinu-ranadive-sebastian-dsouza-jointly-honoured-with-lifetime-achievement-awards/articleshow/69931849.cms</ref>
==पुरस्कार==
त्यांना मुंबई प्रेस क्लबचा [[जीवनगौरव पुरस्कार]] प्रदान करण्यात आला आहे.
|