"सिक्कीम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Unicodifying to convert "#REDIRECT [[" "#पुनर्निर्देशन ", replaced: #REDIRECT [[ → #पुनर्निर्देशन [[ using AWB |
सिक्किम ला असणारे पुनर्निर्देशन हटविले खूणपताका: पुनर्निर्देशन हटविले कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर ! |
||
ओळ १:
{{माहितीचौकट राज्य IN
| राज्य_नाव = सिक्कीम
| स्थापना_दिनांक = १६ मे १९७५
| चित्र_नकाशा = India Sikkim locator map.svg
| राजधानी_शहर = [[गंगटोक]]
| अक्षांश = 27.33
| रेखांश = 88.62
| सर्वात_मोठे_शहर = [[गंगटोक]]
| सर्वात_मोठे_मेट्रो_शहर =
| जनगणना_वर्ष = २०११
| लोकसंख्या_संख्या = ६,१०,५५७
| लोकसंख्या_क्रमवारी_क्रमांक = २८
| लोकसंख्या_घनता = ७६.१७
| क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ७,०९६
| क्षेत्रफळ_क्रमवारी_क्रमांक = २७
| जिल्हे_संख्या = ४
| राज्यपाल_नाव = [[श्रीनिवास दादासाहेब पाटील]]
| मुख्यमंत्री_नाव = [[प्रेमसिंग तमांग]]
| सभापती_नाव =
| सभापती_पद_नाव =
| कायदेमंडळ_प्रकार = विधानसभा
| कायदेमंडळ_जागा_संख्या = ३२
| उच्च_न्यायालय = [[सिक्कीम उच्च न्यायालय]]
| लोकसभा = १
| राज्यभाषा = [[नेपाळी भाषा|नेपाळी]]
| राज्य_संकेतनाम = IN-SK
| संकेतस्थळ = sikkim.nic.in/
| राज्यचिन्ह =
| तळटिपा =
}}
'''सिक्कीम''' हे [[भारत|भारतातील]] देशाच्या [[ईशान्य भारत|ईशान्य]] भागातील एक [[भारताची राज्ये आणि प्रदेश|राज्य]] आहे. [[हिमालय]] पर्वतरांगेमध्ये वसलेल्या सिक्कीमच्या दक्षिणेला भारताचे [[पश्चिम बंगाल]] हे राज्य, पूर्वेस [[भूतान]], पश्चिमेस [[नेपाळ]] तर उत्तरेस [[चीन]] देशाचा [[तिबेट स्वायत्त प्रदेश]] आहेत. आकाराने [[गोवा|गोव्याखालोखाल]] दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लहान राज्य असलेले सिक्कीम येथील निसर्ग सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. [[कांचनगंगा]] हे जगातील तिसरे सर्वात उंच पर्वतशिखर सिक्कीम व नेपाळच्या सीमेवर आहे.
सिक्कीममधील बहुसंख्य जनता नेपाळी वंशाची असून [[बौद्ध धर्म|बौद्ध]] हा येथील प्रमुख धर्म आहे.
==प्रास्ताविक==
[[चित्र:Gururinpochen.jpg|thumb|200px|गुरु रिनपोचे यांची ३५ मी. उंच मूर्ती सिक्किम]]
एकीकडे कांचनगंगासारखी बर्फाच्छादित हिमशिखरे आणि दुसरीकडे वसंतात डोळ्यांचे पारणे फेडायला लावणारी फुलणारी विविध प्रकारची फुले अशा दोन्ही टोकाच्या गोष्टी सिक्कीममध्ये आहेत. नेपाळ, तिबेट, भूतान आणि बंगाल असे चारही दिशांनी बंदिस्त असे सिक्कीम हे हिमालयाच्या कुशीत असलेले एक छोटे राज्य आहे.
==इतिहास==
सिक्कीममध्ये सतराव्या शतकापर्यंत नामग्याल राजघराण्याची एकसत्ताक पद्धत रूढ होती. राजा तेनसिंग नामग्यालने युकसोम येथून राजधानी हलवून रबदानसे येथे नेली. पण नेपाळ व भूतान यांच्याकडून सतत होणार्या स्वार्यांनी या छोट्या राज्याची व रबदानसेची वाताहात झाली. ब्रिटिश काळात सिक्कीमचे तत्कालीन हिंदुस्थानच्या मदतीने नेपाळशी युद्ध झाले. त्या वेळी सिक्कीमने ब्रिटिश इंडिया व नेपाळशी अनुक्रमे सुगौली, तितालीया करार करून हस्तगत केलेला भाग परत मिळवला. स्वातंत्र्यानंतर १९८४ पर्यंत सिक्कीम भारताचे संरक्षित क्षेत्र बनले. सिक्कीमच्या संरक्षण,परराष्ट्र,आणि दळणवळणाची जबाबदारी सरकारने स्वीकारली. भारताबरोबर घनिष्ठ संबंध असावेत अशी इच्छा सिक्कीमने १९८४ मध्ये व्यक्त केली. त्यानुसार सिक्कीमला सहयोगी राज्य घोषीत करण्यात आले.यामुळेही सिक्कीमच्या आकंक्षा पुर्ण झाल्या नाहीत. म्हणून १९७५ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधींच्या राजवटीत सार्वमत घेऊन सिक्कीम भारतीय संघराज्यात सामील झाले. तदनंतर सिक्कीम हे भारतातील एक राज्य म्हणून गणले जाऊ लागले. सिक्कीम हे तीन दिशांनी वेगवेगळ्या सीमांनी बंदिस्त असल्याने अतिसंवेदनशील आहे, त्यामुळे भारतीय लष्कराचे तेथे वर्चस्व आहे.
==भूगोल==
डोंगराळ भाग असल्याने सतत दरड कोसळणे, पावसाने रस्ते वाहून जाणे, अलीकडेच झालेला भूकंप वगैरे आपत्तींना सिक्कीम येथील रहिवाशांना सामोरे जावे लागतेच. त्यातून मार्ग काढणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. त्यासाठी आपल्या सैन्याचीच शाखा, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आहेच. तेथील सर्व रस्त्यांची व्यवस्था पाहणे हे त्यांचेच काम. डोंगराळ भागामुळे सिक्कीममध्ये रेल्वेची सोय होणे दुरापास्त आहे.
==सिक्कीमला जाणे==
राजधानी गंगटोक येथे बागडोगराहून कारने किंवा हेलिकॉप्टरने जाता येते, पण हेलिकॉप्टरची सेवा दिवसातून एकदाच असते. शिवाय एका वेळेला फक्त चारच माणसे जाऊ शकतात. त्यामुळे प्रायव्हेट टॅक्सीज, बसेस यांची भरपूर वर्दळ असते. कोलकाता येथून सिलीगुडी किंवा जलपायगुडीपर्यंत रेल्वेने जाता येते. पुढे बस किंवा टॅक्सीने सिक्कीमला पोहोचता येते. मोठ्या अवजड वाहनांना, आणि दुसर्या राज्यातील टुरिस्ट वाहनांना सकाळी ९ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत गंगटोकमधे अजिबात प्रवेश नसतो.
सिक्कीमच्या पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण भागातली अनुक्रमे गंगटोक, गेझिंग, मंगन, नामची ही प्रमुख शहरे आहेत. गंगटोक ही राजधानी असल्याने ते शहर प्रमुख कचेर्या, शाळा, कॉलेजेस, इत्यादींमुळे जास्त वहिवाटीचे व दाटीवाटीचे आहे. डोंगराळ भागामुळे रस्ते खूपच अरुंद आणि चढ-उताराचे, त्यामुळे ट्रॅफिकचे नियम अगदी कडक आहेत, ते कसोशीने पाळले जातात.
==धर्म==
उत्तर तिबेटमधील तिबेटी, शिवाय नेपाळी लोक फार पूर्वीपासून सिक्कीममध्ये वास्तव्य करून आहेत. इंग्लिश, हिंदी, लेपचा, लिंबू नेपाळी, भूतिया या भाषा प्रामुख्याने व्यवहारात वापरल्या जातात. व्यापाराची बहुतेक धुरा आपल्याकडील मारवाडी लोकांनी सांभाळली आहे. हिंदू व बौद्ध धर्म प्रामुख्याने अस्तित्वात आहे. ख्रिश्चन धर्म फारच थोड्या प्रमाणात आहे. रुमटेक ही सर्वात जुनी मॉनेस्ट्री आहे. नव्या रुमटेकला सोन्याचा स्तूप आहे. पश्चिमेस रुमटेकप्रमाणे पेमियांगत्से मोनेस्ट्री त्याच काळातली आहे. येथे झाडाच्या ढोलीतून कोरलेले धम्मचक्र नक्कीच पाहण्यासारखे आहे. लहान मुले लामा होण्याचे प्रशिक्षण घेण्यासाठी मोनेस्ट्रीमध्येच राहतात.
==प्रेक्षणीय स्थळे==
===कांचनगंगा===
ज्याला आपण [[कांचनगंगा]] म्हणून ओळखतो ते जगप्रसिद्ध कांग चेन जुंगा हे हिमशिखर सिक्कीमच्या पश्चिम भागात आहे. ८४५० मी. उंचीचे हे शिखर जगातील तिसर्या क्रमांकाचे शिखर आहे. तिथले रहिवासी कांचनगंगाला सोने, चांदी, विविध रत्ने, शिवाय धान्य, पवित्र ग्रंथ यांचा खजिना असल्यासारखे पवित्र मानतात. येथे गिर्यारोहणाची क्वचितच परवानगी दिली जाते. गंगटोक येथून कांचनगंगाचे छानपैकी दर्शन होते, पण ती अवाढव्य बर्फाची भिंतच वाटते.
पश्चिमेस पेलिंग गावापासून कांचनगंगा अवघ्या ५० किमी. अंतरावर असल्याने आपल्याला संपूर्ण पर्वताचे दर्शन दिवसभर होते. .जवळ जाऊन पाहिल्यास शिखरापर्यंत नजर ठरूच शकत नाही. सकाळी सूर्योदयाच्या वेळेस बर्फाच्छादित पर्वतावर पडणारी कोवळी किरणे कांचनगंगा हे नाव सार्थ ठरवतात. दिवसभर आपल्याला कांचनगंगाचे सौंदर्य वेगवेगळ्या अंगाने अनुभवता येते. सूर्योदयावेळी कोवळ्या किरणांमुळे वेगळीच सोनेरी छटा संपूर्ण डोंगरच सोन्याचा करते, तर दुपारी धारदार तलवारीप्रमाणे संपूर्ण डोंगर चमकत असतो आणि रात्री लखलखत्या तार्यांच्या मंद प्रकाशात पांढर्याशुभ्र क्षीरसागरासारखा दिसतो. असे हे वेगवेगळे रूप दिवसभर पाहत राहिलो तरी मनाचे समाधान होत नाही. थोड्या उंच जागेवरून कांचनगंगाच्या आसपास असणारी काब्रू, सिमवो, कुंभकर्ण, पांडीम अशी काही शिखरेही नजरेस पडतात.
===मार्तम===
पेलिंगपासून गंगटोकला जाताना वाटेत मार्तम हे छोटेसे गाव लागते. युनेस्कोने हे गाव दत्तक घेतले आहे. डोंगराळ भागामुळे उंच-सखल जमिनीवर टेरेस फार्मिंगची प्रथा आहे. गाईड आपल्याला संध्याकाळच्या वेळेस गावात फेरफटका मारण्यासाठी घेऊन जातात. येथे काही ठरावीक घरांमध्ये हेरिटेज म्हणून अजूनही पूर्वीचीच मांडणी असल्याचे दिसून येते. बटाटा, विविध प्रकारचे बांबू आणि आल्याच्या शेतीतून फिरताना बऱ्र्याच औषधी वनस्पतींचीही लागवड केलेली दिसते. गाीड आपल्याला त्याबद्दल माहिती करून देतात. वेलदोड्याच्या लागवडीसाठी सिक्कीम फार प्रसिद्ध आहे. <br/>
पुढे उत्तरेकडे चुंगथान येथे रस्त्याचे दोन फाटे फुटतात. एक लाचेन येथे तर दुसरा लाचुंगला जातो. लाचेन येथूनच तिस्ता नदीचा उगम होतो.
==दोंगमार आणि लातुंग==
लाचेन येथे गुरू दोंगमार हे सरोवर आहे. कडक थंडीतही सरोवराचा विशिष्ट भाग मुळीच गोठत नाही. १२००० फूट उंचीवर हिमशिखरांनी वेढलेले आणि रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या रंगीबेरंगी र्होडोडेंड्रान व पांढरे मॅग्नोलिया (कवठी चाफा) यामुळे लातुंग हे नेहमीच नटलेले असते. तेथूनच पुढे युमथान, ‘व्हॅली ऑफ फ्लॉवर्स’ येथे जाता येते.<br/>
सिक्कीमच्या भौगोलिक स्थानामुळे उंचावर पांडा, जंगली मांजर, याक असे प्राणी, तर रॉबिन, फ्लाय कॅचर, सँडपायपर असे पक्षी दिसतात. झाडांच्या बाबत पाईन, जुनिपर, फर, सायप्रस वगैरे झाडे आढळतात. र्होडोडेंड्रान हा ‘राज्यवृक्ष’ मानला जातो.
==वनस्पती==
कॉटन ट्री, वेलची, विविध बांबू, बटाटे आलं यांच्या लागवडीबरोबर रंगीबेरंगी ऑर्किस्, गुलाब, झेंडू, हिरव्यागार भाज्यांचे मळे इथे पाहायला मिळतात.
येथील तपमान २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त किंवा शून्य अंश सेल्सिअसच्या खाली उतरत नसल्याने हवा नेहमीच छान, त्यामुळे फळफळावळ, फुलांना तोटा नाही. दरवर्षी गंगटोक येथे ऑर्किडच्या फुलांचे प्रदर्शन भरते. परदेशाप्रमाणे आपल्याकडेही एवढ्या प्रकाराची ऑर्किड असतात याची सामान्यलोकांना कल्पना नसते. फळा-फुलांप्रमाणेच इथले लोक तब्येतीने चांगले दिसतात.
तिस्ता नदी म्हणजे सिक्कीमची जीवनवाहिनी मानली जाते. डोंगराळ भागातल्या लहान लहान उपनद्या मिळून ‘रंगीत’ नदी बनते व तिस्तामध्ये सामावते.
==सण==
सिक्कीममध्ये दसरा, दिवाळीसारखे हिंदू सण, तर तिबेटियन लोसार, लुसांग शिवाय फेब्रुवारीत येणारे नवीन वर्ष जोमाने साजरे केले जाते. त्यादिवशी तिबेटी लोक रंगीत पोषाखात ‘ताशी डिलेक’ अशी आरोळी देत याक डान्स करतात. कांचनगंगाचीही पूजा केली जाते. जसे वेगवेगळे सण तसेच वेगवेगळ्या खाद्यपदार्थासाठीदेखील सिक्कीम प्रसिद्ध आहे. तेथे मोमो, थेंटुक, ठुपकाशिवाय विविध लोणची, मासे यांची वेगळी चव असते. खास त्या भागातील जंगलात मिळणारे विशिष्ट प्रकारच्या फर्नचे कोवळे कोंब ‘फिड्ल हेडेड फर्न’ची याकचे चीज घालून केलेली भाजी अतिशय चवदार असते.
==क्रीडा==
सिक्कीममध्ये रिव्हर राफ्टिंग, ट्रेकिंग, रॅपलिंग अशा वेगवेगळ्या क्रीडाप्रकारांचा अनुभव घेता येतो.
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|Sikkim|सिक्कीम}}
*[http://www.sikkim.gov.in/ अधिकृत संकेतस्थळ]
{{भारतीय राज्ये}}
[[वर्ग:सिक्कीम| ]]
[[वर्ग:भारतीय राज्ये]]
[[वर्ग:ईशान्य भारत]]
|