"वंचित बहुजन आघाडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३७:
==उमेदवारी==
मार्च २०१९ मध्ये, वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ [[लोकसभा]] उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती, त्यामध्ये उमेदवारांच्या नावासमोर त्यांच्या [[जात|जातीचा]] किंवा [[धर्म|धर्मांचा]] उल्लेख करण्यात आलेला होता. [[धनगर]], [[कुणबी]], [[भिल्ल]], [[बौद्ध]], [[कोळी]], [[वडार]], [[लोहार]], [[वारली]], [[बंजारा]], [[मुसलमान|मुस्लिम]], [[माळी]], [[कैकाडी]], [[धिवर]], [[मांग|मातंग]], [[आगरी]], [[शिंपी]], [[लिंगायत]] आणि [[मराठा]] अशा विविध समाजातील लोकांना उमेदवारी देण्यात आली होती. उमेदवाराच्या नावापुढे जातीचा/धर्माचा उल्लेख करण्याबाबत प्रकाश आंबेडकर म्हटले की, "या आधी [[मराठा|मराठ्यांशिवाय]] इतर कुणाला उमेदवारी दिलीच जायची नाही. म्हणून ते जाहीर करण्याची वेळच येत नसे. हे गृहीतच धरले जायचे की उमेदवार मराठाच आहे परंतु ती नंतर मराठ्यांची सत्ता न राहता कुटुंबाची घराणेशाही झाली." आंबेडकर पुढे म्हणतात, "आज आम्ही जात जाहीर केली कारण ही पद्धत कोणताच पक्ष स्वीकारत नाही. [[शिवसेना]], [[भारतीय जनता पक्ष|भाजप]], [[राष्ट्रवादी काँग्रेस]] ह्या पक्षांत मराठ्यांव्यतिरिक्त कुणालाच उमेदवारी दिली जायची नाही. हीच पद्धत पुढे घराणेशाहीत बदलली." ज्या वंचित समाजातील लोकांना कधीही कुठल्या पक्षाने उमेदवारी दिलेली नाही त्यांना वंचित आघाडीने उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या जातीचा/धर्माचा उल्लेख करणे आंबेडकरांना आवश्यक वाटला.<ref name=":1">{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47583698|शीर्षक=प्रकाश आंबेडकरांच्या बहुजन वंचित आघाडीचे ३७ उमेदवार जाहीर|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.bbc.com/marathi/india-47587553|शीर्षक='लढाई जातीअंतासाठी आहे तर उमेदवारांच्या नावासमोर जात कशासाठी?'|last=कोण्णूर|first=तुषार कुलकर्णी आणि मयुरेश|date=2019-03-15|access-date=2019-03-15|language=en-GB}}</ref> प्रकाश आंबेडकरांनी अकोल्यासह सोलापूर मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली, परंतु ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले. यापूर्वी ते अकोल्यातून दोनवेळा खासदार राहिलेले आहेत.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.lokmat.com/solapur/campaign-against-deprived-bahujan-alliance-kaka-putin-riots/|शीर्षक=वंचित बहुजन आघाडीच्या प्रचारात काका-पुतणे दंग|last=author/lokmat-news-network|दिनांक=2019-04-09|संकेतस्थळ=Lokmat|ॲक्सेसदिनांक=2019-04-20}}</ref> महाराष्ट्रातील २०१९ मधील लोकसभेच्या एकूण ४८ जागांपैकी [[औरंगाबाद (लोकसभा मतदारसंघ)|औरंगाबाद मतदारसंघाच्या]] एका जागेवर एमआयएम तर बाकीच्या ४७ जागांवर वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे उमेदवार उभे होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://hindi.indiatvnews.com/elections/lok-sabha-chunav-2019-maharashtra-asaduddin-owaisi-prakash-ambedkar-bjp-shivsena-632313|शीर्षक=महाराष्ट्र में BJP-शिवसेना के लिए कितनी गंभीर है अंबेडकर-ओवैसी की चुनौती?|last=Khushbu|दिनांक=2019-04-14|संकेतस्थळ=India TV Hindi|भाषा=hindi|अॅक्सेसदिनांक=2019-05-03}}</ref>
 
भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार, २०१९ मध्ये महाराष्ट्रात झालेल्या लोकसभा निवडणूकीत, वंबआ व एआयएमआयएम च्या उमेदवारांना ४१,३२,२४२ (७.६४%) एवढी मते मिळाली होती. वंबआच्या तिकिटावर उभ्या राहिलेल्या ४७ उमेदवारांना ३७,४३,२०० एवढी मते मिळाली, हे महाराष्ट्रातील एकूण मतांच्या ६.९२% व वंबआ ने उमेदवार लढलेल्या ४७ मतदार संघातील (औरंगाबाद वगळून) मतांच्या ७.०८% होते. महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघात ५,४०,५४,२४५ एवढे एकूण मतदान झाले होते, त्यामध्ये औरगांबाद मतदार संघात ११,९८,२२१ मतदान झाले होते. सर्वाधिक मते मिळवण्यात औरंगाबाद या एका लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडी समर्थित एआयएमआयएम पहिल्या स्थानी होती, तर अकोला या एका मतदार संघात वंबआ दुसऱ्या स्थानी होती तसेच ४१ मतदार संघात वंबआ तिसऱ्या स्थानी होती.<ref>https://results.eci.gov.in/pc/en/constituencywise/ConstituencywiseS1319.htm?ac=19</ref>
 
=== उमेदवारांची यादी ===