"भीम जन्मभूमी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎इतिहास: विस्तार
ओळ ३६:
 
आंबेडकरांचे विचार समाजात रुजवण्यासाठी अनुयायांनी देशभर त्यांची स्मारके उभारली. महू येथील अनुयायांनी देखील कष्टाने भीम जन्मभूमीवर स्मारक उभारले आहे. आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर सुद्धा त्यांच्या जन्म झाला त्या निवासस्थानाची माहिती लोकांना नव्हती, केवळ महू या गावी त्यांचा जन्म झाल्याचेच बहुतेकांना माहिती होते. भंडारा जिल्ह्यातील भदंत धर्मशील यांनी महू येथील लष्करी अधिकारी डी.जी. खेवले यांच्यामार्फत भीम जन्मभूमीचा शोध लावला. बाबासाहेबांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांना 'अलॉट' केलेल्या सरकारी निवासस्थानाचा अभिलेख १९७१ दरम्यान त्यांनी शोधून काढला. 'बॉम्बे महार रेजिमेंटच्या रजिस्टर'मध्ये रामजी सकपाळ यांना दिलेल्या निवासस्थानाची माहिती होती. रामजी सकपाळ हे १८८९ पासून ते १८९४ पर्यंत तेथे राहिलेले असल्याचे त्यांना कळाले. तेव्हापासून भदंत धर्मपाल यांनी आंबेडकरांचे स्मारक उभारणीसाठी 'महू' मध्येच ठाण मांडले. त्यांनी १९७२ दरम्यान स्थापलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कमिटीमार्फत लढा दिला. मात्र लष्कराने जमीन देण्यास नकार दिला त्यामुळे भदंत यांनी दिल्लीत २१ मार्च १९७४ रोजी तत्कालीन पंतप्रधान [[इंदिरा गांधी]] यांची भेट घेतली. इंदिरा गांधींनी १९८३ मध्ये स्मारकासाठी जमीन दिल्याची घोषणा केली. पण ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या हत्या झाल्यामुळे पुन्हा अंमलबजावणी रखडली. पुढे [[व्ही.पी. सिंग]] सरकारने २२ हजार चौरस फूट जागा धर्मशील यांच्या ट्रस्टला देऊ केली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष भंते संघशील यांनी २७ मार्च १९९१ रोजी समितीच्या बैठक आयोजित केली, तेथे निश्चित करण्यात आले होते, की स्मारकाचे भूमीपूजन करण्याकरता मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री [[सुंदरलाल पटवा]] यांना आमंत्रित केले जाईल, ज्याची सूचना मुख्यमंत्र्यांना दिली गेली. जन्मभूमीवर स्मारकाच्या बांधणीच्या नकाशे वास्तुशिल्पकार ईडी निमगडे यांनी तयार केले. व जयंती उत्सवाची तयारी सुरु करण्यात आली. बाबासाहेबांचा पवित्र अस्थिकलश आणण्याकरिता भंतेजी मुंबई गेले शासनाकडून दहा हजार रूपये अनुदान घेऊन अस्थिकलश घेतला. मुंबईतील [[पीपल्स एज्युकेशन सोसायटी]]चे घनःश्याम तळवटकर आणि न्यायमूर्ती आर.आर. भोले यांच्याशी भेट घेतली. भंतेजी बाबासाहेबांचा अस्थिकलश घेऊन १२ एप्रिल १९९१ ला महूला आणला. भूमीपूजनाच्या कार्यक्रमांसाठी दोन दिवस शिल्लक होते त्या काळात जिल्हाधिकारी अय्यर आणि एस.पी. माकूल यांनी बदोबस्त केला. १४ एप्रिल १९९१ या बाबासाहेबांच्या १०० वी स्वर्ण जयंतीदिनी मुख्यमंत्री सुंदरलाल पटवा यांनी स्मारकाचे भूमिपूजन केले, त्यांच्याबरोबर [[अटलबिहारी वाजपेयी]] आणि मंत्री भेरूलाल पाटीदार व भन्ते धर्मशील होते.<ref name="patrika">{{स्रोत बातमी|url=https://m.patrika.com/indore-news/madhya-pradesh-former-chief-minister-sunderlal-patwa-passed-away-1474586/|शीर्षक=Indore News in Hindi – आंबेडकर स्मारक की आधारशीला रखने महू आए थे पूर्व मुख्यमंत्री पटवा|work=www.patrika.com|access-date=2018-05-23|language=hi-IN}}</ref> पुढे भव्य भीम जन्मभूमी स्मारक बनवले गेले व १४ एप्रिल २००८ रोजी ११७व्या भीमजयंती दिनी त्याचे लोकार्पण केले गेले.<ref name="लोकार्पण"/>
 
निधीअभावी प्रत्यक्ष काम मात्र १९९४ दरम्यान सुरू झाले. पुढे १९९८ पर्यंत काम सुरू राहिले पण पुन्हा बंद पडले. स्मारकाचे वास्तविक काम २००६ ते २००८ दरम्यान झाले. भदंत धर्मशील यांच्या प्रयत्नांना यश आले आणि १४ एप्रिल २००८ रोजी [[लालकृष्ण अडवाणी]] यांच्या हस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले. महू मध्ये सुमारे दीड लाख लोकसंख्या आहे. पुढे आंबेडकरांच्या सन्मानार्थ 'महू'चे डॉ. आंबेडकर नगर असे नामांतर करण्यात आले. दरवर्षी देशभरातून लक्षावधी लोक या स्मारकास भेटी देतात.
 
==रचना==