"यशवंत मनोहर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ३५:
डॉ. यशवंत मनोहर यांचे बालपण [[नागपूर]] जिल्ह्यातील [[येरला]] या छोट्याशा खेड्यात गेले.
मोलमजुरी करून जमेल तसे पोटाच्या आगीला समजावणाऱ्या गरीब आईवडिलांचे ते पुत्र होते. त्यांनी खूप हाल‍अपेष्टात राहून आपले शिक्षण केले. औरंगाबादला शिकताना त्यांना खूपदा उपाशीही राहावे लागले. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांनी स्थापन केलेल्या औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयातून १९६५ साली ते प्रथम श्रेणीत बी.ए. ऑनर्स उत्तीर्ण झाले. [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ]]ातूनच एम.ए. ला ते प्रथम श्रेणीत तिसरे आले. १९८४ साली ते [[नागपूर विद्यापीठ]]ातून पीएच.डी. झाले. नागपूर विद्यापीठाच्या स्नातकोत्तर मराठी विभागातून २००३ साली ते [[प्राध्यापक]] म्हणून निवृत्त झाले.
 
यशवंत मनोहर यांच्या कविता इंग्रजी, हिंदी, उर्दू, गुजराती, बंगाली, कन्नड आदी भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
 
==परिचय==