"विनायक दामोदर सावरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले |
Sureshkhole (चर्चा)यांची आवृत्ती 1584386 परतवली. खूणपताका: उलटविले |
||
ओळ २५:
| तळटिपा = स्वतंत्र भारत सृजनशिल भारत
}}
'''विनायक दामोदर सावरकर''' ([[मे २८|२८ मे]], [[इ.स. १८८३]]:[[भगूर]] - [[फेब्रुवारी २६|२६ फेब्रुवारी]], [[इ.स. १९६६]]) हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक, [[मराठी भाषा|मराठी]] कवी व [[लेखक]] होते. [[भारतीय स्वातंत्र्यलढा|भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील]] एका [[क्रांतिकारक]] चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर [[भारत|भारतीय]] राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी, [[हिंदू धर्म|हिंदुसंघटक]] व [[हिंदू धर्म|हिंदुत्वाचे]] एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, [[विज्ञान|विज्ञानाचा]] पुरस्कार व [[जातिभेद|जातिभेदाला]] तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, [[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|भाषाशुद्धी]] व [[मराठी भाषेचा इतिहास#भाषाशुद्धी चळवळ|लिपिशुद्धी]] ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत [[साहित्यिक]] आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते.
सावरकरांना '''स्वातंत्र्यवीर''' ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार [[प्रल्हाद केशव अत्रे]] यांनी दिलेली आहे. सावरकरांनी [[१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध|१८५७]] चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की १८५७ हे बंड नसून हा एक स्वातंत्रसंग्राम होता
== चरित्र ==
{{जाणकार}}
सावरकरांचा जन्म [[नाशिक जिल्हा|नाशिक जिल्ह्यातील]] [[भगूर]] ह्या गावी झाला. त्यांचे वडील दामोदरपंत सावरकरांच्या तीन अपत्यांपैकी हे दुसरे होते. वि.दा. सावरकरांना [[गणेश दामोदर सावरकर|बाबाराव]] हे मोठे आणि [[नारायणराव सावरकर|नारायणराव]] हे धाकटे भाऊ होते. सावरकरांची आई, ते नऊ वर्षांचे असताना वारली. थोरल्या बंधूंच्या पत्नी येसूवहिनी यांनी त्यांचा सांभाळ केला. सावरकरांचे वडील [[इ.स. १८९९]]च्या प्लेगला बळी पडले.
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते. [[वक्तृत्व]], [[जयोऽस्तुते श्री महन्मंगले|काव्यरचना]] ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते. जिव्हा आणि लेखणी ते सारख्याच ताकदीने चालवत. त्यांनी वयाच्या तेराव्या वर्षी लिहिलेला [[स्वदेशीचा फटका]], [[जयोऽस्तुते श्री महन्मंगले|स्वतंत्रतेचे स्तोत्र]] ह्या रचना त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. [[चाफेकरबंधूं|चाफेकरबंधूंना]] फाशी दिल्याचे वृत्त समजताच लहानग्या सावरकरांनी आपली [[कुलदेवता]] भगवती हिच्यापुढे "देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन" अशी शपथ घेतली.
[[मार्च]], [[इ.स. १९०१]] मध्ये विनायकराव [[यमुनाबाई सावरकर|यमुनाबाई]] यांच्याशी विवाहबद्ध झाले. लग्नानंतर [[इ.स. १९०२]] साली [[फर्गसन महाविद्यालय|फर्ग्युसन महाविद्यालयात]] प्रवेश घेतला व [[इ.स. १९०६]] साली उच्च शिक्षणासाठी [[लंडन]]ला गेले.
राष्ट्रभक्तसमूह ही गुप्त संघटना सावरकरांनी पागे आणि म्हसकर ह्या आपल्या साथीदारांच्या साहाय्याने स्थापन केली. मित्रमेळा ही संघटना ह्या गुप्त संस्थेची प्रकट शाखा होती. ह्याच संघटनेचे पुढे [[अभिनव भारत]] ह्या संघटनेत रूपांतर झाले. [[इटली|इटालियन]] क्रांतिकारक आणि विचारवंत [[जोसेफ मॅझिनी]] ह्याच्या यंग इटली ह्या संस्थेच्या धर्तीवर हे नाव दिले गेले होते. सावरकरांनी पुण्यामध्ये इ.स. १९०५ साली विदेशी कापडाची होळी केली . [[श्यामजी कृष्ण वर्मा]] ह्यांनी ठेवलेली [[शिवाजी शिष्यवृत्ती]] मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर [[लंडन]]<nowiki/>ला गेले. ही शिष्यवृत्ती त्यांना देण्यात यावी अशी सुचवण स्वतः [[लोकमान्य टिळक|लोकमान्य टिळकांनी]] केली होती. लंडनमधील इंडिया-हाऊसमध्ये राहात असताना सावरकरांनी जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. ह्या भाषांतराला जोडलेल्या प्रस्तावनेत सावकरांनी सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञान विषद केले होते. त्या काळातील अनेक युवकांना ही प्रस्तावना मुखोद्गत होती. लंडनमध्ये ‘इंडिया हाउस’ मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल धिंग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते तंत्रज्ञान व २२ ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या १६ वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारताच्या ३ सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो [[गणेश दामोदर सावरकर|बाबाराव सावरकर]] (स्वातंत्र्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता, म्हणूनच क्रांतिकारकांनी जॅक्सनला यमसदनास पाठवले.
इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.
राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू [[गणेश दामोदर सावरकर|बाबाराव सावरकर]] यांना [[ब्रिटिश]] शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये [[मदनलाल धिंग्रा]] ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे [[अनंत कान्हेरे]] ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).[[मॉर्सेलिस]] येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.
▲इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांविरुद्ध भारतात झालेल्या उठावाचा साधार इतिहास सावरकरांनी लिहिला. 'अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्यसमर' हा तो ग्रंथ होय. हा उठाव म्हणजे केवळ एक बंड होय हा इंग्रज इतिहासकारांचा निष्कर्ष सावरकरांनी साधार खोडून काढला. ब्रिटिश शासनाने हा ग्रंथ प्रकाशनापूर्वीच जप्त केला. पण सावरकरांच्या साथीदारांनी तो इंग्लंडच्या बाहेरून प्रसिद्ध करण्यात यश मिळवले. ही ह्या ग्रंथाची इंग्रजी आवृत्ती होती. मूळ मराठी ग्रंथाचे हस्तलिखित सावरकरांचे मित्र कुटिन्हो ह्यांनी जपून ठेवले होते. ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रसिद्ध झाले.{{संदर्भ हवा}}
▲राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याचा आरोप ठेऊन सावरकरांचे थोरले बंधू [[गणेश दामोदर सावरकर|बाबाराव सावरकर]] यांना [[ब्रिटिश]] शासनाने जन्मठेपेची शिक्षा देऊन काळ्या पाण्यावर धाडले. ह्या घटनेचा प्रतिशोध म्हणून लंडनमध्ये [[मदनलाल धिंग्रा]] ह्यांनी कर्झन वायलीला गोळ्या घातल्या तर नाशिक येथे [[अनंत कान्हेरे]] ह्यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन ह्याला गोळ्या घालून ठार केले. नाशिकच्या ह्या प्रकरणात वापरण्यात आलेली ब्राउनिंग जातीची पिस्तुले सावरकरांनी चतुर्भुज अमीन ह्याच्याकरवी धाडली होती. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तात्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रांन्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली(इ.स. १९१०). ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनाऱ्यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे ५० वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली (इ.स. १९११).[[मॉर्सेलिस]] येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण तसे घडले नाही.{{संदर्भ हवा}}
स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खड्या बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रत काम दिले. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंत्र्य! तब्बल ११ वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते. बाभळीच्या काट्यांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लीम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. [[विठ्ठलभाई पटेल]], [[रंगस्वामी अय्यंगार]] यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.
अंदमानाहून सुटकेच्या आधीचे जीवन व सुटकेनंतरचे त्यांचे जीवन, असे सावरकरांच्या जीवनाचे दोन महत्त्वाचे भाग पडतात. पहिल्या भागात आक्रमक, क्रांतिकारी सावरकर, क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान सावरकर, धगधगते लेखन करणारे सावरकर - असे त्यांचे रूप दिसते. तर त्यांच्या जीवनाच्या दुसऱ्या भागात समाजक्रांतिकारक सावरकर, हिंदू संघटक सावरकर, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक सावरकर, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते सावरकर, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत सावरकर - अशा अनेक स्वरूपांत ते समाजासमोर आलेले दिसतात.
==सावरकरांचे जात्युच्छेदन==
{{कामचालू}}
[[अंदमान (काळे पाणी)|अंदमाना]]<nowiki/>तून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले (१९२४ जाने.६<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.savarkarsmarak.com/chronology_m.php|title=:: Swatantra veer Savarakar Smarak ::|website=www.savarkarsmarak.com|access-date=2018-
त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या. जवळपास ५०० मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली. त्यांनंतर सर्वांसाठी 'पतित पावन मंदिर' सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालयही सुरू केले.
जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचा धडाका उडवून दिला. [[रत्नागिरी]] येथे त्यांनी [[पतितपावन मंदिर]] स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला. सुमारे १५ [[आंतरजातीय विवाह]]ही त्यांनी लावून दिले.<ref name="vishesh.maayboli.com"/><ref>{{
==गाय हा एक उपयुक्त पशू आहे.. सावरकर==
वीर सावरकरांचे या बाबतीत झणझणीत विचार आहेत. ते लिहितात.. ‘मायासृष्टीत जोवर मनुष्य आहे आणि गाय व बैल हे पशू आहेत, तोवर माणसाने त्याच्याहून सर्व गुणांत हीन असलेल्या पशूस देव मानणे म्हणजे मनुष्यास पशूहून नीच मानण्यासारखे आहे. गाढवाने पाहिजे तर त्याहून श्रेष्ठ पशू असलेल्या गाईस देव मानावे; मनुष्याने तसे मानण्याचा गाढवपणा करू नये. ..कोणत्याही गोष्टीत ती धर्म आहे असे पोथीत सांगितले आहे, म्हणूनच तसे डोळे मिटून मानण्याची पोथीनिष्ठ आंधळी भावना आता झपाट्याने मावळत आहे आणि ती मावळत जावी हेच आता मनुष्याच्या प्रगतीस अत्यंत आवश्यक आहे.
एक वेळ राष्ट्रात थोडी गोहत्या झाली तरी चालेल, पण उभ्या राष्ट्राची बुद्धिहत्या होता कामा नये. यास्तव गाय वा बैल हे पशू आपल्या कृषिप्रधान देशात मनुष्यहितास अत्यंत उपकारक आहेत इतकेच सिद्ध करून, आणि त्या पशूचा उपयोग राष्ट्रास ज्या प्रमाणात, नि ज्या प्रकारे होईल, त्या प्रमाणात नि त्या प्रकारे पशू म्हणूनच जोपासना करू म्हणाल, तरच ते राष्ट्राच्या निभ्रेळ हिताचे होईल. पण त्या हेतूने गाय ही देव आहे कारण पोथीत तिची पूजा करणे हा धर्म आहे, इत्यादी थापा माराल, तर त्यावर जरी राष्ट्राने यापुढेही विश्वास ठेवला नि गोरक्षण थोडेसे अधिक झाले, तरीही त्या पोथीजात प्रवृत्तीला उत्तेजन देण्याचे जे अपकार्य त्यायोगे करावे लागते त्याचे परिणाम राष्ट्राची शतपटीने अधिक हानी करील.’
===एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन===
सावरकरांनी चालवलेल्या जात्युच्छेदन चलवळीने अस्वस्थ झालेल्या ब्राह्मणांनी लोणी येथे झालेल्या सनातनी परिषदेत सावरकरांना 'धर्मद्रोही' ठरवून 'त्यांना पेशवाई असती तर हत्तीच्या पायाखाली दिले गेले असते' असा ठराव मांडला.<ref>[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=71293:2010-05-20-14-49-53&catid=32:2009-07-09-02-02-48&Itemid=10 महाराष्ट्रीय मानसिकता आणि सुवर्णमहोत्सव-दत्तप्रसाद दाभोलकर, शुक्रवार, २१ मे २०१० दैनिक लोकसत्तातील लेख]{{मृत दुवा}} दिनांक २८/७/२०१२ रोजी जसा पाहिला</ref><ref name="ReferenceA">http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना - लेखक चिन्या १९८५ ( डॉ.चिन्मय कुलकर्णी) ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली</ref> त्यावर ३००० ब्राह्मणांनी सह्या केल्या.<ref name="ReferenceA"/><ref>http://raigad.wordpress.com/स्वातंत्र्यवीर-सावरकर-का/जर-आज-पेशवाई-असती-तर/ “सावरकर एक अभिनव दर्शन” या पुस्तकातील लेखावरून घेतल्याचा उल्लेख वेबसाईट २९/७/२०१२ला जशी पाहिली</ref> सावरकरांनी त्यावर 'शिवशाहीत अथवा, पहिल्या बाजीरावाच्या पेशवाईत आमच्यासारख्या हिंदू संघटकांना हत्तीच्या पाठीवरील अंबारीत मिरवले जाण्याचाच संभव अधिक होता' असे सडेतोड उत्तर दिले. मायबोली २००८च्या हितगुज दिवाळी अंकात डॉ. चिन्मय यांच्या मांडणीप्रमाणे, 'भटशाही' संपवण्यासाठी पूजा, पाठ, गौरी, गणपती, सोयरसुतक, संक्रांत, दिवाळी, दसरा, द्वादशी या धार्मिक कार्यक्रमांना भटांना बोलावणे बंद करून 'भटशाही' संपवावी असे मत मांडले. "त्यासोबतच काशीतील ब्राह्मण महासंमेलनाची तुलना त्यांनी माकडांशी केली. त्यात 'काशीत दोन महासंमेलने भरली - एक माकड महासंमेलन आणि दुसरे भाकड महासंमेलन. माकडे परिवर्तनीय तरी आहेत. पण सनातनी तर काळ, वेळ, परिस्थिती या गोष्टीच बघत नाहीत. अशा वागण्यामुळे निदान काशीच्या भाकड महासंमेलनातील पंडित हे तरी माकडांची विकसित श्रेणी नसून तेथील माकडेच त्या पंडितांची विकसित श्रेणी आहे हे म्हणणे क्रमप्राप्त आहे' असे लिहीत सावरकरांनी त्यांची विकेट घेतली.
===सात बेड्या===
सावरकरांनी अतिशय स्पष्ट शब्दात जातिव्यवस्थेवर हल्ला केला. अनुवंशात जातीचे मूळ आहे. त्या मुळावरच सावरकरांनी हल्ला चढवत अनुवंश हा आचरटपणा आहे, जर ब्राह्मणाच्या घरी 'ढ' जन्मला तर त्याला 'ढ'च म्हटले पाहिजे आणि जर शूद्रांत 'ज्ञ' निघाला तर त्याला 'ज्ञ'च म्हटले पाहिजे, मग त्याचा बाप, आजा अथवा पणजा 'ढ' असो की 'ज्ञ' असो. सावरकरांनी हल्ला करताना 'आपले हिंदुत्वाचे समर्थक दुखावतील' वगैरे फाजील भीती न बाळगता त्यांचे प्रबोधन केले. सावरकर म्हणतात की 'आज आमच्या हिंदू समाजात पोथीत तसे लिहिले आहे ते सोडून इतर कोणत्याही लक्षणाने सहज विभिन्नत्व विविध जातींमध्ये दिसून येत नाही. जात मानणे ही मूळ चूक! त्यात महादेवाच्या जटेपासून ही जात निघाली आणि ब्रह्मदेवाच्या बेंबीपासून अमुक जात निघाली इत्यादी उपरत्या अक्षरशः खर्या मानून त्या त्या जातींच्या अंगी ते ते गुण उपजतच आहेत हे मानणे ही घोडचूक!! अन् तो गुण त्या जातीच्या संतानात प्रकट झाला नसला तरी तो आहेच समजून तशी उच्च-नीचता त्या संतानास भोगावयास लावणे ही पहाड चूक.
जातिव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात हे सांगितले. त्या लेखात ते म्हणतात, पोथीजात जातिभेद हा मनाचा रोग आहे. मनाने तो मानला नाही की झटकन बरा होतो. त्यानंतर त्या सात बेड्या म्हणजे १) वेदोक्तबंदी {स्वतःच्या क्षत्रियादिक धर्मबंधूंनासुद्धा वेदोक्ताचा अधिकार नाही असे म्हणणारी भटबाजी यापुढे चालणार नाही.-सावरकर} २) व्यवसायबंदी ३) स्पर्शबंदी ४) सिंधूबंदी ५) शुद्धीबंदी ६) रोटीबंदी ७) बेटीबंदी. आपल्याकडे अजूनही बेटीबंदी मोठ्या प्रमाणात आहे. सावरकरांनी आंतरजातीय विवाहांना समर्थनच दिले नाही तर स्वतः आंतरजातीय विवाह लावले.<ref>http://vishesh.maayboli.com/node/55 मायबोली हितगुज दिवाळी अंक २००८ जात्युच्छेदन आणि हिंदुत्व : सावरकर, संघ आणि शिवसेना. -लेखक चिन्या १९८५ ही वेबसाईट २६ जुलै २०१२ रोजी जशी पाहिली</ref><ref>[http://www.savarkarsmarak.com/activityimages/Jatyucchedak%20Nibandha%20-II.pdf जात्युच्छेदक निबंध भाग दोन सावरकरस्मारक डॉट कॉम वेबसाईट २९/०७/२०१२ रात्री दहा वाजता पाहिल्याप्रमाणे]{{मृत दुवा}}</ref>
==हिंदू महासभेचे कार्य==
रत्नागिरीत सावरकर सुमारे १३ वर्षे स्थानबद्धतेत होते. इ.स. १९३७ पासून सुमारे सात वर्षे, सावरकरांनी हिंदू महासभेचे अध्यक्षपद भूषविले. झंझावाती दौरे, मोठ्यामोठ्या सभा, हिंदूंची सैन्यभरती, रॉयल क्लब्सची स्थापना अशा अनेक मार्गांनी त्यांनी हिंदू महासभेचे कार्य केले. त्यांनी आधुनिक विचारधारेप्रमाणे बुद्धिवाद व विज्ञाननिष्ठा यांची कास धरून हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी लढा दिला.
एक क्रांतिकारक, ज्वलंत साहित्यिक (महाकवी), समाजसुधारक, हिंदू संघटक या पैलूंसह स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारतीय समाज ढवळून काढला, स्वातंत्र्यलढ्यात अभूतपूर्व योगदान दिले. फाळणीला व तत्कालीन काँग्रेसच्या धोरणांना त्यांनी प्रखर विरोध केला. स्वातंत्र्यानंतरही त्यांनी सीमांची सुरक्षा, सैनिकांची संख्या वाढवणे, शस्त्रसज्जता अशा अनेक विषयांचा आग्रह त्यांनी धरला.
सुमारे ६० वर्षे त्यांनी स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. इ.स. १९६६ मध्ये वयाच्या ८३ व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला.१ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांनी अन्न, पाणी आणि औषधाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले.
==सावरकरांची खोली आणि स्मारके==
Line ८७ ⟶ ८३:
* गोसावीवाडा (भगूर) येथील स्मारक
* स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क (मुंबई)
* स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह, शिवाजी पार्क (मुंबई)
Line १०२ ⟶ ९८:
* स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ (निगडी-पुणे जिल्हा)
* स्वातंत्र्यवीर [[सावरकर साहित्य अभ्यास मंडळ]] (डोंबिवली-ठाणे जिल्हा)
* स्वातंत्र्यवीर [[सावरकर साहित्य अभ्यास मंडळ]] (मुंबई). ही संस्था [[सावरकर साहित्य संमेलन|सावरकर साहित्य संमेलने]] भरविते.
== सावरकर साहित्य ==
Line ११३ ⟶ १०९:
सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट्र , टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तीवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.
वि.दा. सावरकर हे मुंबई येथे इ.स. १९३८ साली भरलेल्या [[साहित्य संमेलने|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] अध्यक्ष होते.
==सावरकरांचे विज्ञानवादी विचार==
सावरकरांचा विशेष गुण हा की ते केवळ विचार मांडून थांबले नाहीत तर त्यांनी ते विचार आयुष्यभर प्रत्यक्ष कृतीत उतरविले. या संदर्भात त्यांचे मृत्युपत्र फार वाचण्यासारखे आहे. ते लिहितात:
‘माझे प्रेत शक्यतो विद्युत-चितेवरच जाळण्यात यावे. जुन्या पद्धतीप्रमाणे ते शक्यतो माणसांनी खांद्यावरून नेऊ नये किंवा कोणत्याही प्राण्याच्या गाडीमधून नेऊ नये, तर ते यांत्रिक शववाहिकेतूनच विद्युत – स्मशानात नेले जावे.. माझ्या मृत्यूनिमित्त कोणीही आपली दुकाने किंवा व्यवसाय बंद ठेवू नयेत. कारण त्याने समाजाला फार त्रास होतो. घरोघरीच्या संसारासाठी दैनिक आवश्यकतेच्या वस्तू न मिळाल्याने अडथळा होतो. माझ्या निधनानिमित्त कोणीही सुतक, विटाळ किंवा ज्यायोगे कुटुंबीयांना किंवा समाजाला निष्कारण त्रास होतो अशा कोणत्याही जुन्या रूढी पाळू नयेत किंवा पिंडप्रदान, त्या पिंडांना काकस्पर्श होईतो वाट पाहत बसणे इत्यादी कालबाह्य गोष्टी पाळू नयेत.’ वगैरे.
== ग्रंथ आणि पुस्तके ==
वीर सावरकरांनी १०,००० पेक्षा जास्त पाने मराठी भाषेत तर १५०० हून जास्त पाने इंग्रजी भाषेत लिहिली आहेत. फारच थोड्या मराठी लेखकांनी इतके मौलिक लिखाण केले असेल. त्यांच्या "सागरा प्राण तळमळला", "हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा", "जयोस्तुते", "तानाजीचा पोवाडा" ह्या कविता प्रचंड लोकप्रिय आहेत.
=== इतिहास ===
Line १७२ ⟶ १६८:
* [[सावरकरांच्या कविता]]
===कवितांच्या काही ओळी===
सावरकरांच्याच '''कमला''' या काव्यसंग्रहातील खालील ओळी त्यांचा कडवा राष्ट्रवाद दर्शवितात -
:: अनेक फुले फुलती फुलोनिया सुकून जाती
:: त्याची महती गणती कोणी ठेवली असेल का?
:: परी गजेंद्र शुंडे उपटीले, श्रीहरिसाठी नेले,
:: फूल ते अमर ठेले मोक्षदाते पावन.
:: अमर ती वंशवेला निर्वंश जिचा देशाकरिता,
:: दिगंती पसरेल सुगंधिता, लोकहीत परिमलाची.
;चाफेकरांचा फटका:
Line १७८ ⟶ १८२:
भक्ष्य रँड बहुमस्त देखता ‘सिंह’ धावले बग्गीकडे
गोळी सुटली, गडबड मिटली, दुष्ट नराधम चीत पडे॥
ही कविता लिहिली त्यावेळी सावरकरांचे वय १५ वर्षे होते.
==पुरस्कार==
Line १८५ ⟶ १९१:
* दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने दरवर्षी दिले जाणारे *स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार, विज्ञान पुरस्कार, समाजसेवा पुरस्कार आणि शौर्य पुरस्कार
* वीर सावरकर फाउंडेशनचा वीर सावरकर पुरस्कार
* टिळकनगर (डोंबिवली) शिक्षण प्रसारक मंडळाच्या सावरकर अभ्यास मंडळाचे वीर सावरकर सेवा पुरस्कार
==स्वातंत्र्यवीर सावरकरांवर लिहिलेली पुस्तके आणि त्याचे लेखक/प्रकाशक==
Line २८१ ⟶ २८७:
* १९७२, सावरकर आत्मचरित्र (भगूर) | मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
* १९७८, स्वातंत्र्यवीर सावरकर विषयक वक्ते नि लेखक यांची सूची | स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य अभ्यास मंडळ, मुंबई
* वीर सावरकर जयंती निबंध स्पर्धेतील चार यशस्वी निबंध । अखंड हिंदुस्थान प्रकाशन, मुंबई
==सावरकरांवरील चित्रपट, नाटके, कार्यक्रम==
Line २८७ ⟶ २९३:
* मी विनायक दामोदर सावरकर (एकपात्री, सादरकर्ते : योगेश सोमण)
* यशोयुतां वंदे (संकल्पन/दिग्दर्शन- सारंग कुलकर्णी. संहिता - दीपा सातव सपकाळ)
* स्वातंत्र्यवीर सावरकर (चित्रपट, निर्माते [[सुधीर फडके]])
==सावरकरांवरील संकेतस्थळ==
Line २९३ ⟶ २९९:
==मराठी पारिभाषिक शब्दांसाठीचे सावरकरांचे योगदान==
भाषाशुद्धीचा आग्रह धरून सावरकरांनी मराठी भाषेला खूप शब्द दिले आहेत.<ref>
* अर्थसंकल्प (बजेट)
* उपस्थित (हजर)
* क्रमांक (नंबर)
* क्रीडांगण (ग्राउंड)
* गणसंख्या (कोरम)
* गतिमान
* चित्रपट (सिनेमा)
* झरणी (फाऊन्टनपेन)
* टपाल (पोस्ट)
* तारण (मॉटर्गेज)
* त्वर्य/त्वरित (अर्जंट)
* दिग्दर्शक (डायरेक्टर)
* दिनांक (तारीख)
* दूरदर्शन (टेलिव्हिजन)
* दूरध्वनी (टेलिफोन)
* ध्वनिक्षेपक (लाऊड स्पीकर)
* नगरपालिका (म्युनिसिपालिटी)
* नभोवाणी (रेडिओ)
* निर्बंध (कायदा)
* नेतृत्व (लीडरशिप)
* नेपथ्य
* परीक्षक (एक्झॅमिनर)
* पर्यवेक्षक (सुपरवायझर)
* प्रतिवृत्त (रिपोर्ट)
* प्राचार्य (प्रिन्सिपॉल)
* प्राध्यापक (प्रोफेसर)
* बोलपट (टॉकी)
* मध्यांतर (इन्टर्व्हल)
* महापालिका (म्युुनिसिपल कॉर्पोरेशन)
* महापौर (मेयर)
* मुख्याध्यापक (हेड मास्टर)
* मूल्य (किंमत)
* विधिमंडळ (लेजिस्लेटिव्ह असेम्ब्ली)
* विशेषांक (खास अंक)
* विश्वस्त (ट्रस्टी)
* वेतन (पगार)
* वेशभूषा (कॉश्च्यूूम)
* शस्त्रसंधी (सीझ फायर)
* शिरगणती (खानेसुमारी)
* शुल्क (फी)
* संचलन (परेड)
* सार्वमत (प्लेबिसाइट)
* सेवानिवृत्त (रिटायर)
* स्तंभ (कॉलम)
* हुतात्मा (शहीद)
हे शब्द आता इतके रूढ झाले आहेत, की हे नव्हते तेव्हा आपली भाषा किती अशुद्ध होती याची केवळ कल्पनाच करावी लागते.
== अधिक वाचन ==
* [[ज्वालामुखीचे अग्निनृत्य - वि. श्री. जोशी]]
|