"पतंगराव कदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ६:
==राजकीय वाटचाल==
पतंगराव कदम हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जात. ते १९९० मध्ये प्रथम राज्याचे शिक्षणमंत्री बनले. पुढे सुधाकरराव नाईक, शरद पवार, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण या सर्व मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळाचे पतंगराव अविभाज्य घटक होते. १९९९ ते २००४ या काळात त्यांनी उद्योग, वाणिज्य, संसदीय कामकाजमंत्री म्हणून पदभार सांभाळला. नोव्हेंबर २००४मध्ये ते सहकार, मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री बनले. मार्च २००९ मध्ये अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ते वनमंत्री झाले. १९ नोव्हेंबर २०१० रोजी त्यांच्याकडे वन, मदत आणि पुनर्वसन खात्याची धुरा आली. सांगलीतील वांगी-भिलवडी विधानसभा मतदारसंघातून एखादा अपवाद वगळता ते सातत्याने भरीव मताधिक्याने विजयी होत. डॉ. कदम महाराष्ट्र विधानसभेवर चार वेळा निवडून आले. दिल्लीतील वरिष्ठांशीही अत्यंत घनिष्ठ संबंध होते. अघळपघळ, आणि स्पष्टपणे मनातील गोष्ट बोलून दाखविणे, हा त्यांचा स्वभावविशेष होता.
==लोकप्रिय नेता==
पतंगराव कदम राजकीय वर्तुळात दिलदार, पण स्पष्टवक्ते म्हणून प्रसिद्ध होते. त्यांच्याकडे गेलेल्या व्यक्तीला शक्य ती मदत करण्यास ते अजिबात मागेपुढे पाहत नसत. मात्र, रोखठोकपणामुळे काही वेळा अडचणीतही येत. मदत आणि पुनर्वसन खात्यामार्फत त्यांनी सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागाला मोठी मदत केली. म्हैसाळ योजनेचे वीजबिल मदत आणि पुनर्वसन विभागाच्या योजनांतून भागवीत. त्यांचा मतदारसंघही दुष्काळी भागात मोडत असे. तेथे साखळी बंधाऱ्यांची योजना राबवून कदम यांनी तेथील पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. म्हैसाळ, टेंभू आणि ताकारी योजना मार्गी लागाव्यात यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. पलूस येथे औद्योगिक वसाहत उभारली. तेथे वाइन प्रकल्प चालवून रोजगारनिर्मितीचाही प्रयत्न त्यांनी केला. मुलगा अभिजित याच्या अपघाती मृत्यूमुळे झालेल्या आघातातून सावरत त्यांनी राजकीय काम पुढे सुरूच ठेवले. गटातटाच्या राजकारणामुळे सांगली महापालिकेची सत्ता काँग्रेसच्या हातून निसटली असतानाच २०१६ सालच्या निवडणुकीत त्यांनी पुढाकार घेऊन तेथे काँग्रेसला सत्तेत आणले. काँग्रेसशी ते अखेरपर्यंत निष्ठावंत होते.
==कार्य==
|