"सआदत हसन मंटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
या चित्राचे पर्यायी चित्र कॉमन्सवर नाही
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३६:
भारताच्या फाळणीनंतर मंटो जानेवारीमध्ये [[मुंबई]] सोडून [[लाहोर]]ला गेले. मंटोच्या आयुष्याची अंतिम वर्षे त्यांच्यासाठी आर्थिक व आरोग्याच्या दृष्टीने हलाखीची होती, परंतु त्यांचे सर्वोत्कृष्ट लिखाण याच काळात झाले.<ref name="bookrags"/> मंटो यांचा मृत्यू [[जानेवारी १८]], [[इ.स. १९५५|१९५५]] रोजी लाहोर इथे झाला.
 
मंटो या लेखकाचे नाव जितके विचित्र, तितकाच तो माणूसही विचित्र होता. मंटो जेमतेम त्रेचाळीस वर्षे जगला, पण त्याची ही वर्षे एखाद्या निखार्‍यासारखी होती. कमालीचे संवेदनशील मन, उपजत प्रतिभा आणि लिखाणावर मेहनत करण्याची तयारी असा त्रिवेणी संगम घडून आला की लेखन बावनकशी होणारच. मंटोच्या साहित्यात हेच झालेले दिसते. मंटोचा आयुष्यपट बघताना त्याच्या व इतर काही थोर साहित्यिकांच्या जीवनातील काही विस्मयकारक साम्ये डोळ्यांसमोर येतात. साहीरप्रमाणे मंटोचे त्याच्या वडिलांशी कधी पटले नाही. गालिबसारखा तो ’आधा मुसलमान’ होता आणि दारूच्या जबरदस्त आहारी गेलेला होता.
पाकिस्तानी टपाल खात्याने मंटोंच्या सन्मानार्थ [[जानेवारी १८]], [[इ.स. २००५|२००५]] रोजी एक टपाल तिकिट प्रकाशित केले.<ref name="pakpost">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.pakpost.gov.pk/philately/stamps2005/saadat_manto.html |शीर्षक=Saadat Hasan Manto (1912-1955) Men of Letters |प्रकाशक=Pakistan Postal Services}}</ref>
 
मंटोचे घराणे मूळचे काश्मिरवासी. नंतर ते पंजाबमध्ये येऊन स्थायिक झाले. मंटोची भावंडे धार्मिक वृत्तीची, प्रतिष्ठित आणि संयमी स्वभावाची होती. मंटो बाकी पहिल्यापासूनच क्रांतिकारक, बंडखोर, नास्तिक आणि बेफाम प्रवृत्तीचा होता. मंटोला वाचनाची जबरदस्त आवड होती. वाचलेली पुस्तके विकून टाकून त्या पैशांतून तो उंची सिगारेटी ओढायचा. तरुण वयात शिक्षणावरुन लक्ष उडाल्याने तो बेछूटपणे जगत असे. स्वातंत्र्यपूर्व काळात तो कधी सशस्त्र क्रांतीची स्वप्ने बघे तर कधी वैफल्यग्रस्त होऊन स्मशानात जाऊन बसे. तरुण वयातला अस्वस्थपणा दूर करण्यासाठी दारु, चरस, कोकेनसारखी व्यसनॆ केलेल्या मंटोला एकदा लेखन हेच आपले खरे काम याची जाणीव झाल्यावर झपाटल्यासारखा त्याणे तुफानी वेगाने नाटके, निबंध, व्यक्तिचित्रेरं आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कथा लिहिल्या.
 
मंटोने विशेषत: परदेशी साहित्यिकांचे उत्तमोत्त्म साहित्य वाचलेले होते. लिहायला सुरवात केल्यानंतर प्रथम पत्रकारिता, नंतर हिंदी सिनेसृष्टीशी संबंधित लिखाण आणि मग स्वतंत्र नाटके, कथा असा मंटोचा लेखनप्रवास घडला. मंटोच्या मुंबईतील सिनेमाच्या विश्वातील सफरीबद्दल त्याच्या पुस्तकांत फारसे नाही. पण एकंदरीत या मायानगरीला मंटो फारसा पसंत पडला नाही, असेच दिसते. मंटोने त्याच्या मुंबईतील मुक्कामात बकालातले बकाल आयुष्य अनुभवलेले होते. भायखळा आणि नागपाडा भागातल्या अंधार्‍या चाळी, म्हशींचे गोठे, घोड्यांचे तबेले, इराण्यांची हॉटेले आणि वेश्यांची मोठी वस्ती असलेला फोरास रोड हे सगळे त्याने बघितले, अनुभवले. यातूनच त्याने उर्दू भाषेत ’टंटा, मस्तक, मस्का-पॊलिश, मालपानी, दादा, घोटाला, फोकट, कंडम’ अशा अनेक शब्दांची भर घातली. त्यामुळे मंटोची स्वतःची उर्दू लेखनाची एक शैली विकसित झाली असावी असे वाटते.
 
१९४८ साली मंटो पाकिस्तानात निघून गेला आणि पाकिस्तानात गेल्याचा त्याला (साहिरप्रमाणेच) पश्चाताप होत राहिला. त्याने अहमद नदीम कासमी यांना लिहिलेल्या पत्रात लिहिले आहे: ’वास्तविक मी आता अशा अवस्थेला पोहोचलो आहे जिथे नकार आणि विश्वास यात फरकच राहिलेला नाही’. पाकिस्तानात त्याने विपुल लिखाण केले हे खरे, पण वैयक्तिक जीवनात त्याची घसरणच होत राहिली. त्याचे मद्यपान तो मुंबईत असतानाच वाढले होते, पाकिस्तानात गेल्यावर मात्र ’दारूनेच त्याला प्यायला सुरुवात केली’.
 
पाकिस्तानी टपाल खात्याने मंटोंच्या सन्मानार्थ [[जानेवारी १८]], [[इ.स. २००५|२००५]] रोजी एक टपाल तिकिट प्रकाशित केले.<ref name="pakpost">{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.pakpost.gov.pk/philately/stamps2005/saadat_manto.html |शीर्षक=Saadat Hasan Manto (1912-1955) Men of Letters |प्रकाशक=Pakistan Postal Services}}</ref>
 
==सआदत मंटो यांनी लिहिलेली काही पुस्तके==
* मंटोच्या निवडक कथा (मूळ उर्दू, मराठी अनुवाद डॉ. वसुधा सहस्रबुद्धे)
 
==सआदत अली मंटो यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तके==
* सआदत हसन मंटो (मूळ लेखक वारिस अल्वी, मराठी अनुवाद - [[विश्वास वसेकर]])
 
== बाह्य दुवे ==
*[http://rachanakar.blogspot.com/2009/02/blog-post_7822.html सआदत हसन मंटो यांची कथा ''खोल दो'']
*[http://gadyakosh.org/gk/index.php?title=%E0%A4%B8%E0%A4%86%E0%A4%A6%E0%A4%A4_%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8B सआदत हसन मंटो यांचे लिखाण]
*[http://mr.upakram.org/node/3217माझ्या संग्रहातील पुस्तके]
 
 
*{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.bbc.co.uk/hindi/entertainment/story/2005/05/050510_manto_writing.shtml |शीर्षक=मैं क्यों लिखता हूं? -सआदत हसन मंटो |प्रकाशक=बीबीसी हिंदी}}
*{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.pakpost.gov.pk/philately/stamps2005/saadat_manto.html |शीर्षक=Saadat Hasan Manto (1912-1955) Men of Letters |प्रकाशक=पाकिस्तानी टपाल खाते}}