"रक्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot v.2
(चर्चा | योगदान)
ओळ १३१:
* अति प्रमाणात तांबड्या पेशींची निर्मिती. हा रक्ताच्या कॅन्सरचा प्रकार नाही. रक्तकणिकांची अति निर्मिती हा कॅन्सरपूर्व आजार आहे.
* कधीकधी रक्तपेशीतील कोणत्यातरी पेशींची बेसुमार वाढ होते.
 
रक्तक्लथन (रक्ताच्या गोठण्याचा) विकार-
* रक्तगळ - [[हिमोफिलिया]] हा आनुवंशिक रक्तविकार आहे. रक्तक्लथनातील एक किंवा अनेक घटकांच्या अभावामुळे हा विकार होतो. अशा रुग्णास झालेली क्षुल्लक जखम जीवघेणी असू शकते. हिमोफिलिया मधील एक त्यामानाने कमी तापदायक प्रकार सांध्यांमध्ये रक्त साकळणे हा आहे. हा प्रकार जीवघेणा नसला तरी पंगुत्व येण्यास पुरेसा आहे.
* अप्रभावी किंवा अपुर्‍या रक्तकणिका असल्याने रक्त न गोठण्याचे आजार होतात.
Line १३८ ⟶ १३९:
* रक्तामध्ये अनेक परजीवींचा संसर्ग होतो. एच आयव्ही विषाणूमुळे होणारा एड्‌स, रक्त, शरीरातील द्राव, वीर्य यामधून दुसर्‍या व्यक्तीमध्ये प्रवेशतात. हिपॅटायटिस ( कावीळ) बी आणि सी दोन्ही फक्त रक्तामधून संक्रमित होतात. रक्त संसर्गजन्य आजार घोकादायक असतात.
* जिवाणूजन्य आजार – रक्ताच्या जिवाणूजन्य आजारास सेप्सिस–पूति असे म्हणतात. विषाणूजन्य आजारास व्हायरेमिया म्हणतात. मलेरिया आणि ट्रिपॅनोसोमा हे दोन आदिजीव रक्तातील परजीवी आहेत.
 
कार्बन मोनाक्साइड विषबाधा
* प्राणवायू शिवाय काही घटक हिमोग्लोबिन बरोबर बद्ध होतात. अशामुळे हिमोग्लोबिनमध्ये अपरिवर्तनीय बदल होतो. श्वसनामधून घेतलेला कार्बन मोनाक्साइड फुप्फुसातून रक्तामध्ये गेल्यास गंभीर परिणाम होतात. हिमोग्लोबिनबरोबर कार्बन मोनाक्साइडचे कार्बॉक्सिहिमोग्लोबिनमध्ये रूपांतर होते. कारबॉक्सिहिमोग्लोबिन परत प्राणवायू चे वहन करू ना शकल्याने प्राणवायू वहनास कमी हिमोग्लोबिन उपलब्ध राहते. यामुळे नकळत गुदमरून मृत्यू येतो. कार्बन मोनॉक्साइड्चा चा गंध गोडसर असल्याने घोकयाची जाणीव होत नाही. ज्या खोलीमध्ये वायुवीजनाची नीटशी व्यवस्था नाही अशा ठिकाणी पेटविलेल्या अग्नीमधून अपुर्‍या ज्वलनामुळे कार्बनमोनॉक्साइड तयार होतो. धूम्रपानातील धुरामध्ये काहीं प्रमाणात कार्बन मोनॉक्साइड असतो.
 
वैद्यकीय उपचार –
* रक्त : मानवी रक्तदात्याकडून मिळणारे रक्त रक्तपेढीमध्ये साठविलेले असते. मानवी रक्ताचे रक्तदात्याच्या आणि रक्ताची गरज असणार्‍यासाठी दोन महत्त्वाच्या गोष्टी असतात. एक म्हणजे ए/बी/ओ [[रक्तगट]] आणि दुसरे म्हणजे (RH) र्‍हिसस. दोन्ही गोष्टी अनुरूप असल्यासच एकाचे रक्त दुसर्‍याला देता येते. अनुरूप रक्त न मिळाल्यास शस्त्रक्रिया थांबवावी लागते. रक्त रुग्णास देण्याआधी ते अनुरूप असल्याची खात्री करून घेतल्याशिवाय दिले जात नाही.
* रक्तातील इतर आवश्यक घटक शिरेमधून रक्तप्रवाहात सोडले जातात. त्यामध्ये रक्तकणिका, रक्तरस, आणि प्रक्रिया केलेले रक्तक्लथन घटकांचा समावेश आहे.
 
आंतरशिराआंतरशीर द्रव्यप्रवेश
* अनेक औषधे शिरेतून देण्याचा प्रघात आहे. ती त्वरित उपयोगी पडतात. सरळ उतीपर्यंत जातात. आणि अधिक परिणामकारक ठरतात. प्रतिजैविके आणि कॅन्सर वरील रसायनोपचार (केमोथेरपी) ही काहीं उदाहरणे. अन्न नलिकेमधून ती दिल्यास त्यांचा परिणाम होण्यास वेळ लागतो.
* रक्त मोठ्या प्रमाणात वाहून गेल्यास रक्तरसाचे शरीरातील प्रमाण कमी होते . रक्ताचे आकारमान पूर्ववत होण्यासाठी शिरेमधून शरीराच्या क्षारतेनुसार ‘लवणद्रवण’ सलाइन द्यावे लागते. लवणद्रवणामध्ये आवश्यकतेनुसार सोडियमा क्लोराइड, पोटॅशियम क्लोराइड, कॅल्शियम कार्बोनेट, ग्लूकोज असते. भाजलेल्या रुग्णाना रक्तरस (प्लाझमा) द्यावा लागतो. रक्त देण्याची आवश्यकता असल्यास सलाइन देण्याची आवश्यकता असते. कारण दात्याकडून आलेल्या रक्तपेशींचे कार्य त्वरित चालू होत नाही.
 
रक्तदोहन :
* रक्तपेशी आधिक्य असलेल्या रुग्णाच्या शरीराच्या रक्त वाहिनीमधून बाहेर काढणे हा उपचारांचा भाग आहे. जुन्या वैद्यक शास्त्रामध्ये दूषित जखमेजवळ जळू चिकटवून रक्त काढण्याचे उपचार केले जात होते.
 
==रक्त या विषयावरील मराठी पुस्तके==
* रक्त (अच्युत गोडबोले आणि डॉ. वैदेही लिमये)
* रक्तदान (व.कृ. जोशी)
*
*
*
 
==बाह्य दुवे==
"https://mr.wikipedia.org/wiki/रक्त" पासून हुडकले