"जिग्नेश मेवाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३९:
 
== सुरुवातीचे जीवन ==
जिग्नेश यांचा जन्म ११ डिसेंबर १९८२ साली गुजरातच्या [[अहमदाबाद]] शहरात झाला. [[मेहसानामेहसाणा]] जिल्ह्यातील मेव हे त्यांच्या परिवाराचे मूळ गाव आहे. त्यांचे शालेय शिक्षण अहमदाबाद मधीलअहमदाबादमधील स्वस्तिक विद्यालय व विश्व विद्यालय माध्यमिक शालाशाळा येथे झाले. त्यांनी २००३ साली एच.के. आर्ट्स कॉलेज, अहमदाबाद येथून इंग्रजी साहित्य या विषयात कला शाखेची पदवी मिळवली. २००४ साली त्यांनी पत्रकारिता व जनसंचार या विषयात डिप्लोमा प्राप्त केला. २००४ ते २००७ या काळात त्यांनी ''अभियान'' या गुजराती साप्ताहिकात वार्ताहर म्हणून काम केले. २०१३ साली त्यांनी डी.टी. लॉ कॉलेज, अहमदाबाद येथून कायदे शाखेची पदवी मिळवली. गुजरात विधानसभा निवडणूक, २०१७ मध्ये ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे होते.
 
== चळवळ ==
२०१६ साली गुजरातच्या [[सौराष्ट्र]] भागातील उना गावात स्वतःला गौरक्षकगोरक्षक म्हणवणार्‍या एका गटाकडून काही दलित पुरुषांवर हल्ला झाला होता व ह्या घटनेची चित्रफीत काढून समाजमाध्यमांद्वारे प्रसारित करण्यात आली होती. ह्या घटनेचा गुजरातमध्ये तीव्र निषेध झाला. ह्याचाच एक भाग म्हणून अहमदाबाद ते उना या मार्गावरून ''दलित अस्मिता यात्रा'' काढण्यात आली. या यात्रेचे नेतृत्व जिग्नेश मेवाणी यांनी केले. १५ ऑगस्ट २०१६ रोजी यात्रेचा समारोप झाला. या कार्यक्रमात जवळपास २०,००० दलित लोक सहभागी झाले, ज्यामध्ये दलित महिलांचाही समावेश होता. सहभागी दलित जनतेने मेलेल्या गाई व ढोरे ओढून नेण्याचे त्यांचे पारंपरिक काम सोडून देण्याची प्रतिज्ञा घेतली. जिग्नेश यांनी दलितांच्या उत्थानासाठी त्यांना जमिनी मिळाव्या ही मागणी उचलून धरली.
 
[[हार्दिक पटेल]] व [[अल्पेश ठाकोर]] यांसह जिग्नेश मेवाणी यांना अलीकडच्या काळात गुजरातमधील राजकारणाचे उगवते नेतृत्व म्हणून पाहिले जाते.
 
==२०१७ सालची विधानसभा निवडणूक==
२०१७ सालच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत जिग्नेश मेवाणी यांनी वडनगर मतदारसंघातील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजय चक्रवर्ती यांचा १९,६९६ मतांनी पराभव केला आणि ते निवडून आले.
 
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}