"गोंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Pushkar Pande (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
'''{{लेखनाव}}''' ही [[भारत|भारतातील]] प्रमुख [[आदिवासी]] जमात आहे. ही आदिवासी जमात
आर्य येण्याआधी गोंड जमातीचे अस्तित्व होते. रामायण, महाभारत काळात गोंड हे वैभवी अस्तित्वाचे धनी होते. गोंडांची अतिप्राचीन व समृद्ध भाषा होती. आजही ती आहे. ‘गोंड की कोईतूर’ असा एक सूर गोंड समूहात अलीकडे जोर धरू लागला आहे. परंतु ‘कोईतूर’ हाच मूळ व अचूक शब्द होय. ‘कोईतूर’चा अर्थ होतो माणूस. प्राचीन ग्रंथ ‘ऋग्वेदा’तदेखील ‘गोंड’ असा शब्दप्रयोग नसून ‘कुयवा’ म्हणजे ‘कोया’ असा शब्द आढळतो. ‘गोंड हे नाव त्यांना इतरांनी दिले आहे’, असे कै. डॉ. [[इरावती कर्वे]] यांनी त्यांच्या ‘मराठी लोकांची संस्कृती’ या ग्रंथात म्हटले आहे.
==गोंडी लिपी==
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगण या राज्यांमध्ये गोंडी भाषा बोलणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता ही केवळ ‘बोली’ राहिली नसून ‘भाषा’ झाली आहे, कारण तिची लिपी उपलब्ध आहे. व्यंकटेश आत्राम, मोतीरावण कंगाली, विठ्ठलसिंग धुर्वे आणि इतरही अभ्यासकांनी गोंडी लिपी आपापल्या ग्रंथांमध्ये प्रसिद्ध केली आहे. गोंडी भाषेचा शब्दकोश व तिचे व्याकरण यांवरही विपुल साहित्य उपलब्ध आहे. काही सन्मान्य अपवाद वगळता या भाषेच्या भाषाशास्त्राकडे किंवा सौंदर्यशास्त्राकडे फारसे लक्ष दिले गेले नाही. लिंग, वचन, काळ, विभक्ती यातही गोंडी स्वयंपूर्ण आहे.
==गोंडी भाषेतील काही अपरिचित शब्द==
अनेक अपरिचित, अर्थवाही व इतर भाषांमध्ये न आढळणारे शेकडो शब्द गोंडी भाषेत आहेत. उदा० अद (तो/ती), इद (हा/ही), एटी (बकरा), उंदी (एक), ओडी (टोपली), कयता (कडू), कर्सना (खेळणे), कस्कना (धावणे), किस (आग), केंजा (ऐका), ढुंगाल (उंच), नत्तुरी (लाल), नन (मी), नय (कुत्रा), नल्लानेट (सोमवार), नावा (माझा), नेटी (दिवस), नेंड (आज), पदोमान (जानेवारी), पन्ने (बेडूक), पाटा (गाणे), पुंगार (फूल), बोरोंदा (कमळ), भूम (पृथ्वी), मरका (आंबा), मावा (आमचा/आमचे), येर (पाणी), वतूर (पावसाळा), सटार (विळा), सियाना (देणे), हिनाल (पातळ/बारका) इत्यादी.
{{विस्तार}}
|