"महाराष्ट्रामधील धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) शिख धर्म हा विभाग योग्य असल्याने पूर्ववत केला |
|||
ओळ ६३:
== ज्यू धर्म ==
महाराष्ट्रामध्ये ज्यू धर्मीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. ज्यूंच्या धर्माला इंग्रजीत ज्युडाइझम आणि हा धर्म पाळणाऱ्या लोकांना ज्युइश म्हणतात.
महाराष्ट्रातील ज्यूंना 'बेने इस्रायली' किंवा 'शनवार तेली' म्हणतात.
मराठ्यांचे राज्य खालसा झाल्यानंतर ब्रिटिश राजवटीत बेने इस्रायली समाज महाराष्ट्रातील इतर भागातही स्थायिक होऊ लागला. १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर बेने इस्रायली सैनिकांची कुटुंबे पुण्याच्या रास्ता पेठेत, विशेषत: लकेऱ्या मारुतीच्या समोरील रस्त्याच्या दुतर्फा स्थायिक झाली होती. त्याला ‘इस्रायली आळी’ असे नाव होते. त्यातील कित्येकांना खान बहाद्दुर, खानसाहेब अशा पदव्या मिळाल्या होत्या. ब्रिटिशकाळात सैन्यात नोकरी करणाऱ्या बेने इस्रायलींप्रमाणेच सरकारी नोकरीत काम करणारे बेने इस्रायलीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. सरकारी खात्यांपैकी रेल्वे, कस्टम, पोस्ट आणि टेलिग्राफ खात्यात अनेक बेने इस्रायली काम करत. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्रातील इतर भागांत व भारतातील इतर शहरांत वास्तव्य केले होते.
1961 व 1971च्या जनगणनेनुसार [[पुणे]], [[इगतपुरी]], [[भोर]], [[सातारा]], [[मुंबई]], [[ठाणे]] यांप्रमाणेच [[नाशिक]], [[सोलापूर]], [[सातारा]], [[नागपूर]], [[धुळे]], [[जळगाव]], [[अहमदनगर]], [[औरंगाबाद]], [[भंडारा]], [[वर्धा]], [[नांदेड]] येथेही कमी प्रमाणात का होईना; पण ज्यूंची नोंद झाली आहे.
== हेही पहा ==
|