"मराठीतील कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ७:
दुसरा कोश लेफ्टनंट कर्नल व्हान्स केनेडी या लष्करी अधिकार्याने मुंबई येथे इ. स. १८२४ मध्ये प्रसिद्ध केला. या कोशाचे दोन भाग असून पहिल्या भागात मराठी शब्दांना इंग्लिश प्रतिशब्द देऊन दुसऱ्या भागात इंग्लिश शब्दांचे मराठी अर्थ दिलेले आहेत. कोशातील शब्दसंख्या आठ हजारपर्यंत आहे.
वरील कोशांपेक्षा खूप मोठा आणि आजही पुनर्मुद्रणे होत असल्याने सहज उपलब्ध असलेला शब्दकोश म्हणजे मोल्सवर्थ-कँडी यांनी संपादित केलेली मराठी अॅन्ड इंग्लिश डिक्शनरी. हा कोष इ.स. १९५७मध्ये प्रकाशित झाला. या कोशात ..... शब्द आहेत. अरबी-फार्सी-तुर्कीमधून आलेले शब्द देवनागरीबरोबर उर्दू लिपीतही लिहून दाखवले आहेत. हा चमत्कार यानंतर करायला कुणाही धजले नाही. या कोशाच्या ३०-पानी प्रस्तावनेत मराठी शब्दांच्या बनावटीबद्दल विद्वत्तापूर्ण भाष्य आहे. कोकणी, राजापुरी, वाडी जिल्ह्यातले शब्द, उत्तर महाराष्ट्रातले शब्द, पोर्तुगीज, अरबी, फारसी, तुर्की आणि हिंदुस्तानी शब्द वगैरे देताना हे शब्द कुठून आले ते सांगितले आहे. काही खास शब्दांबाबत त्यांचा वाक्यांतला आणि वाक्प्रचार-म्हणीतला वापर स्पष्ट केला आहे. या कोशात डेमी आकारातली ९२० पाने आहेत. शब्दांची जंत्री तीन स्तंभात असूनन कोठे जागा वाया घालवलेली नाही. टंकाचा आकारही खूप लहान घेतला आहे
मराठी-इंग्रजी डिक्षनरीबरोबरच मोल्सवर्थने अर्धवट लिहून ठेवलेला इंग्रजी-मराठी कोशही कँडीने पूर्ण केला. या कोशात .... शब्द आहेत.
शब्दकोशांची विभागणी एकभाषिक, द्विभाषिक आणि बहुभाषिक अशी करता येते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने उर्दू-मराठी (श्रीपाद जोशी, एन.एस. गोरेकर), कन्नड-मराठी (पुंडलिकजी कातगडे), गुजराती-मराठी (भाऊ धर्माधिकारी), पाली-मराठी (बाबा भारती), मराठी-कन्नड (गुरुनाथ दिवेकर), मराठी-गुजराती (भाऊ धर्माधिकारी), मराठी-सिंधी (लछमन हर्दवाणी), तमीळ-मराठी (रमाबाई जोशी, पु. दि. जोशी), यांसारखे कोश प्रकाशित केले आहेत.
|