"सुधीर तेलंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सुधीर तेलंग (जन्म: बिकानेर, इ.स. १९६०; मृत्यू : इ.स. २०१६) हे एक मराठी...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सुधीर तेलंग (जन्म: [[बिकानेर]], इ.स. १९६०; मृत्यू : इ.स. २०१६) हे एक मराठी व्यंगचित्रकार होते. त्यांची व्यंगचित्रे विविध वर्तमानपत्रांतून ३५ वर्षे झळकत होती. त्यांच्या व्यंगचित्रांच्या प्रेमात असलेल्या मुलीशीस त्यांचा विवाह झाला होता.
 
लहानपणापासून तेलंग यांना टिनटिन, फॅण्टम, ब्लॉण्डी या व्यक्तिरेखांचे आकर्षण होतेच. त्यातून ते व्यंगचित्रांकडे वळले. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले व्यंगचित्र काढले, तेही [[इंदिरा गांधी|इंदिरा गांधींचे]]. [[लालकृष्ण अडवाणी|लालकृष्ण अडवाणींची]] किमान हजार चित्रे त्यांनी काढली आहेत. तेलंगांच्या व्यंगचितरांतूनव्यंगचित्रांतून जो सुटला त्याची कारकीर्द संपली असे मानले जात असे.
 
तेलंगांचीसुधीर तेलंग यांची व्यंगचित्रे प्रथम ‘राजस्थान पत्रिके’त आली. नंतर १९८२ मध्ये ‘द इलस्ट्रेटेड वीकली’त, मग दिल्लीच्या एका हिंदी पत्रात येऊ लागली. पुढे ‘हिंदुस्तान टाइम्स’, ‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘टाइम्स ऑफ इंडिया’ आणि ‘एशियन एज’ असा त्यांच्या व्यंगचित्रांचा प्रवास होत गेला.
 
==सार्वकालिक व्यंगचित्रे==
सुधीर तेलंग यांची भ्रष्टाचार, गरिबी, निरक्षरता, बेरोजगारी या समस्यांवरची ३० वर्षांपूर्वीची काही व्यंगचित्रे कालसुसंगत राहिली.
 
==झोळीवाला पत्रकार==
[[आर.के. लक्ष्मण]] यांच्या ‘कॉमन मॅन’सारखीच एक व्यक्तिरेखा तेलंग यांनी त्यांच्या व्यंगचित्रात आणली होती. झोळीवाला पत्रकार- गोटीबंद दाढी, खांद्यावर झोळी असे त्याचे रूप होते. हा पत्रकार तटस्थ नजरेने जगाचे निरीक्षण करणारा होता. कालांतराने पत्रकारांच्या खांद्यावरची झोळी गेली व ती व्यक्तिरेखाही त्यांनी बंद केली. व्यंगचित्रेही अधिक तिखट, धारदार होऊ लागली. याबाबत त्यांचे साम्य अबू अब्राहम यांच्याशी होते. स्वतंत्र भारतातील राजकीय व्यंगचित्र-परंपरा शंकर यांच्यापासूनची आहे आणि लक्ष्मण हे राजकीय मतमतांतरांपेक्षा लोकांना महत्त्व देणारे होते. अबू अब्राहम आणि पुढे तेलंग हे शंकर यांच्या परंपरेला पुढे नेणारे व्यंगचित्रकार होत.
 
==प्रदर्शने==
व्यंगचित्रांखेरीज क्वचित ते चित्रेही रंगवत. २०१४ मध्य तेलंगांनी दिल्लीत त्यांच्या चित्रांचे ‘हिअर अ‍ॅण्ड हाऊ – राजीव टू मोदी ’ हे प्रदर्शन भरवले होते, त्याला अनेक राजकीय नेत्यांनी भेट दिली होती.
 
==पुस्तके==
* सुधीर तेलंग यांचे भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावरील व्यंगचित्रांचे ‘नो प्राइम मिनिस्टर’ (२००९) हे पुस्तक प्रसिद्ध आहे.
 
==पुरस्कार==
* २००४ मध्ये सुधीर तेलंग यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.