"अरुण खोपकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ ८:
 
==ज्याची भुरळ पडेल ते==
ज्याची भुरळ पडेल ते करायचे, असे खोपकरांना वाटे. आठवी-नववीत असतानाच 'सौंदर्य आणि साहित्य'सारखा सौंदर्याशास्त्रावरचा ग्रंथ त्यांचा वाचून झाला होता. त्यांना तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करावासा वाटत होता आणि विज्ञानातही रस होता. ज्यांनी इंग्रजी-मराठी डिक्शनरी लिहिली ते खोपकरांचे इंग्रजीचे शिक्षक एस.व्ही. सोहनी त्यांना मला म्हणाले, ’हे बघ, तू जर साहित्याकडे गेलास तर तुला विज्ञानाचा अभ्यास करता येणार नाही, मात्र तू विज्ञान शिकलास तर कलेचा, तत्त्वज्ञानाचाही अभ्यास करण्यात काही अडचण येणार नाही’ म्हणून अरुण खोपकर बी.एस्‌सी. झाले आणि ते करताकरता त्यांनी कलाशाखेचा अभ्यास सुरू केला. त्यांना मराठी शिकवायला [[रा.ग. जाधव]], [[म.वा. धोंड]], आणि विजया राजाध्यक्ष होत्या. या प्राध्यापकंमुळेप्राध्यापकांमुळे खोपकरांना भाषेची गोडी लागली आणि त्यांचा नाटकाचा छंद कमी झाला. त्याच काळात अरुण खोपकरांची लच्छू महाराजांशी ओळख झाली आण‌ि खोपकरांना नृत्यातही रस वाटू लागला. त्याच सुमारासमध्येच त्यांनी मणी कौलच्या 'आषाढका एक दिन' मध्ये भूमिका केलीकरण्याचीही संधी मिळाली, आणि अरुण खोपकरांचा चित्रपटाकडे प्रवास सुरू झाला...
 
==चित्रपट-कारकीर्द==
फिल्म हा खोपकरांचा खरा ध्यास आणि श्वास. त्यामुळेच पुण्याच्या 'एफटीआयआय'मध्ये फिल्म-दिग्दर्शनाचे रीतसर शिक्षण घेतल्यावर त्यांनी सिनेक्षेत्र हेच कार्यक्षेत्र निवडले आणि तेव्हापासून फिल्म करणे आणि फिल्मवर बोलणे हे जणू त्यांचे जीवनध्येय बनले. सिनेमाचा आस्वाद कसा घ्यायचा, हे तर ते पिढी दरपिढीला शिकवत आहेत. निखिलेश चित्रे, गणेश मतकरी, अभिजित रणदिवे असे अनेक चित्रपटसमीक्षक खोपकरांच्या चित्रपटविषयक मार्गदर्शन आणि गप्पाटप्पांतून घडले. खोपकरांमध्ये चांगला कथाकथक दडलेला आहे. त्यामुळे लिहिणे असो, बोलणे असो किंवा एखाद्या विषयावर फिल्म करणे असो, प्रत्येक कृतीत त्यांचा आश्वासक सूर लागतो. त्यामुळे वाचणारा, ऐकणारा आणि पाहणारा त्यांच्याशी, त्यांच्या कलाकृतीशी सहज जोडला जातो.