"तुकडोजी महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो कोणत्याही चर्चेविना लावलेला साचा काढला using AWB
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ७:
| जन्म_दिनांक = [[एप्रिल २७]], [[इ.स. १९०९|१९०९]]
| जन्म_स्थान = यावली, जि. [[अमरावती]]
| मृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर ११३१]], [[इ.स. १९६८|१९६८]]
| मृत्यू_स्थान =
| गुरू = आडकोजी महाराज
ओळ ३२:
| चित्र_शीर्षक = राष्ट्रसंत तुकडोजी महाराज - भारतीय टपाल तिकीट
}}
'''तुकडोजी महाराज''' (Tukdoji Maharaj) (१९०९-१९६८) यांना ''राष्ट्रसंत'' म्हणून ओळखले जाते. [[अंधश्रद्धा निर्मूलन]], जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. आत्मसंयमनाचे विचार त्यांनी [[ग्रामगीता]] या काव्यातून मांडले. त्यांनी [[मराठी भाषा|मराठी]] व [[हिंदी भाषा|हिंदी]] भाषांमध्ये काव्यरचना केली आहे. तुकडोजी महाराजांनी [[इ.स. १९३५|१९३५]] साली [[मोझरी]] येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या प्रबोधनाचे वैशिष्ट्य होते.
 
तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते. आडकोजी महाराज हे त्यांचे गुरू. विदर्भात त्यांचा विशेष संचार असला तरी महाराष्ट्राभरच नव्हे तर देशभर हिंडून ते आध्यात्मिक, सामाजिक व राष्ट्रीय एकात्मतेचे प्रबोधन करीत होते. एवढेच नव्हे तर [[जपान|जपानसारख्या]] देशात जाऊन त्यांनी सर्वांना विश्वबंधुत्वाचा संदेश दिला. सन १९४२ च्या [[भारत छोडो]] आंदोलनादरम्यान काही काळ त्यांना अटक झाली होती. "आते है नाथ हमारे" हे त्यांनी रचलेले पद या काळात स्वातंत्र्यलढ्यासाठी स्फूर्तिगान ठरले होते.
ओळ ५१:
 
ऐहिक व पारलौकिक यांचा सुंदर समन्वय तुकडोजी महाराजांच्या साहित्यात झाला आहे. त्यांनी मराठीप्रमाणेच हिंदी भाषेतही विपुल लेखन केले. आजही त्यांचे हे साहित्य आपल्याला मार्गदर्शन करीत आहे, यावरून त्यांच्या साहित्यात अक्षर वाङमयाची मूल्ये कशी दडली आहेत, याची सहज कल्पना येईल. राष्ट्रपतिभवनात झालेले त्यांचे खंजिरी भजन ऐकून राष्ट्रपती [[राजेंद्रप्रसाद]] यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत म्हणून संबोधिले होते.
 
तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण आश्विन कृष्ण पंचमी शके १८९० (३१ ऑक्टोबर, १९६८) रोजी झाले.
 
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांच्या प्रसिद्धीचे काम [[अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ]]ा द्वारे केले जाते.