"संत तुकाराम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो Pywikibot v.2 |
No edit summary |
||
ओळ २९:
}}
{{हा लेख|वारकरी संत तुकाराम|संत तुकाराम (निसंदग्धीकरण)}}
'''संत तुकाराम''' (ऊर्फ तुकोबा, तुका, तुक्या) हे [[इ.स.चे १७ वे शतक|इ.स.च्या सतराव्या शतकातील]] एक [[वारकरी]] संत होते. [[पंढरपूर]]चा विठ्ठल वा [[विठोबा]] हा तुकारामांचा आराध्यदेव होता. तुकारामांना वारकरी 'जगद्गुरु ' म्हणून ओळखतात. वारकरी संप्रदायातल्या प्रवचन व कीर्तनाच्या शेवटी - ' पुंडलीक वरदे हरी विठ्ठल , श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज की जय , जगदगुरु तुकाराम महाराज की जय' असा जयघोष करतात.
तुकाराम महाराज हे साक्षात्कारी, निर्भीड व एका अर्थाने बंडखोर संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदान्त तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच’ (अभंग तुकयाचा) एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली. संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग, हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहेत. वारकरी, ईश्र्वरभक्त, साहित्यिक, अभ्यासक व सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतात. त्यांचे अभंग खेड्यांतील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठांत आहेत. आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे.
ओळ ७०:
[[संत बहिणाबाई]] ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला स्वप्नात गुरूपदेश दिला होता. तुकाराममहाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिले होते, असे म्हणतात. तुकारामांनी बहिणाबाईला बौद्धांच्या ’वज्रसूची’ या बंडखोर ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते.{{संदर्भ हवा}} यावरून तुकाराम महाराज पाळीत असलेल्या धर्माचे स्वरूप किती उदार होते याची कल्पना यावी.
==तुकारामांनी लिहिलेली पुस्तके==
* गीतगाथा (संपादक प्रभाकर जोगदंड) : संत ज्ञानेश्वरांप्रमाणे संत तुकाराम यांनीही भगवद्गीतेवर टीका केली आहे. तुकारामांच्या भगवद्गीतेवरील भाष्याचा "गीतगाथा" हा ग्रंथ आहे. पोथीच्या आकारातील हा ग्रंथ, भगवद्गीतेचे श्लोक, आणि त्या श्लोकांचा अर्थ सांगणारे जे अभंग तुकारामांनी लिहिले, त्याविषयी आहे. या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रभाकर जोगदंड यांनी स्वत:च्या सुंदर हस्ताक्षरात या ग्रंथाचा शब्दन् शब्द लिहिला आहे. तसेच पुस्तकाची मांडणीही त्यांनी स्वतःच केलेली आहे. हा ग्रंथ, एखादी हस्तलिखित पोथी हाताळत आहोत की काय असे वाटायला लावणारा आहे. गीतेचे ७०० श्लोक आणि तुकारामाचे ७०० अभंग लेखकाने टाकाने लिहिलेले आहेत.
* तुकारामाच्या अभंगांची गाथा महाराष्ट्र सरकारने आणि शिवाय अनेक प्रकाशकांनी पुस्तकरूपाने प्रसिद्ध केली आहे.
* तुकाराम गाथा (संपादक नानामहाराज साखरे)
* तुकाराम गाथा (भालचंद्र नेमाडे)
* दैनंदिन तुकाराम गाथा (संपादक माधव कानिटकर)
* श्री तुकाराम गाथा (संपादक स.के. नेऊरगावकर)
== चित्रपट ==
* इ.स.१९३६ मध्ये [[प्रभात फिल्म कंपनी]]च्या विष्णुपंत दामले आणि फत्तेलाल शेख यांनी मराठीत '[[संत तुकाराम (चित्रपट)|संत तुकाराम]]' या नावाने चित्रपट बनवला. या चित्रपटाला अपूर्व यश प्राप्त झाले. १२ डिसेंबर १९३६ रोजी मुंबईच्या सेंट्रल सिनेमा येथे प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात विष्णुपंत पागनीस यांनी संत तुकाराम यांचे काम केले होते. ५व्या [[Venice Film Festival|व्हेनिस चित्रपट उत्सवामध्ये]] या चित्रपटाला पुरस्कार मिळाला होता. भारतातील अनेक भाषांमध्ये संत तुकाराम यांच्यावर चित्रपट काढण्यात आले. हा चित्रपट एकाच चित्रपटगृहात वर्षभर चालू होता. हा त्या काळचा उच्चांक होता.
* हा चित्रपट येण्याआधी तुकारामांवर तीन चित्रपट बनले होते. पहिला मूकपटांच्या जमान्यात कोहिनूर फिल्म कंपनीने निर्माण केलेला 'संत तुकाराम'. त्यानंतरचे दोन तुकाराम आले ते बोलपटांच्या जमान्यात १९३२ मध्येच. यांपैकी एक तुकाराम निर्माण केला होता 'शारदा फिल्म कंपनी'ने आणि दुसरा 'मास्टर अॅन्ड कंपनी'ने 'संत तुकाराम' अर्थात 'जय विठ्ठल' या नावाने. शुक्ल नावाच्या नटाने यात तुकारामांची भूमिका केली होती. यापलीकडे या चित्रपटाची काहीच माहिती उपलब्ध नाही. हा चित्रपट म्हणजे एका नाटकाचे चित्रण होते. शारदा फिल्म कंपनीचा 'तुकाराम' मात्र चित्रपट म्हणूनच तयार करण्यात आला होता. या 'तुकारामा'चीही काही माहिती आज उपलब्ध नाही.
* १९६५ मध्ये तुकारामांवर हिंदी चित्रपट आला. त्याचे नाव होते 'संत तुकाराम'. राजेश नंदा यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट अशोक फिल्म्सने निर्माण केला होता. शाहू मोडकांनी यात तुकारामाची भूमिका केली होती. तर अनिता गुहा 'आवडी' बनल्या होत्या.
* त्यानंतर १९७४ मध्ये 'महाभक्त तुकाराम' आला. हा मूळ तामिळ चित्रपट होता,आणि मराठीत डब करण्यात आला होता. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे [[श्रीदेवी]] यात बालतारका म्हणून पडद्यावर दिसली होती.
* यानंतर २००२ मध्ये आणखी एक तुकारामांवरचा चित्रपट आला. कृष्णकला फिल्म्सचा 'श्री जगत्गुरू तुकाराम'.
* इ.स. २०१३सालचा 'तुकाराम' हा चित्रपट या सर्व संतपटांपेक्षा वेगळा आणि आधुनिक विचारसणी मांडलेला चित्रपट आहे.
==तुकारामाचे चरित्र, अभंग आणि त्यासंबंधी लेहिली गेलेली पुस्तके==
तुकारामांचे ’संत तुकाराम’ नावाचे पहिले चरित्र कृष्णाजी अर्जुन केळूसकर यांनी इ.स. १८९५ साली लिहिले. २०१५ साली सुरंगाबादच्यस साकेत प्रकाशनाची त्याची नवी आवृत्ती काढली आहे. अन्य पुस्तके -
* आनंदओवरी (कादंबरी - लेखक [[दि.बा. मोकाशी]])
* आनंड डोह (२०१४). नाटक - लेखक : योगेश्वर
* आनंदाचे डोही आनंद तरंग (कादंबरी, लेखिका मृणालिनी जोशी)
* 'तुका झालासे कळस' (१९६४)-दिग्दर्शक राजा नेने. या चित्रपटात तुकारामाची भूमिका कुमार दिघे यांनी केली होती.
* धन्य तुकाराम समर्थ (एकपात्री), लेखक व सादरकर्ते नामदेव तळपे
* तुका आकाशाएवढा : लेखक [[गो.नी. दांडेकर]]
* तुका झाले कळस (व.दि. कुलकर्णी)
* तुका झालासे कळस : लेखक डॉ. प्रभाकर श्रावण चौधरी
* तुका झालासे कळस : लेखक स.कृ. जोशी
* तुका झालासे कळस : लेखक डॉ. [[रामचंद्र देखणे]]
* तुका झालासे कळस: लेखक अर्जुन जयराम परब
* तुका झालासे विठ्ठल : (ढवळे प्रकाशन)
* तुका म्हणे : लेखक डॉ. [[सदानंद मोरे]]
* तुका म्हणे भाग १, २ : लेखक [[डॉ. दिलीप धोंगडे]]
* तुकाराम - अंतर्बाह्य संघर्षाची अनुभवरूपे (म.सु. पाटील)
* तुकाराम दर्शन (डॉ. सदानंद मोरे)
* समग्र तुकाराम दर्शन (किशोर सानप)
* तुकाराम महाराजांची जीवनसूत्रे : लेखक डॉ. यादव अढाऊ
* तुकाराम व्यक्तित्व आणि कवित्व : लेखक किशोर सानप आणि मनोज तायडे
* तुकारामांचा शेतकरी : लेखक डॉ. [[आ.ह. साळुंखे]]
* तुकारामांची अभंगवाणी : लेखक पंडित कृष्णकांत नाईक
* तुकारामाचे निवडक १०० अभंग : लेखक डॉ. [[दिलीप चित्रे]]
* तुकारामाचे निवडक १००० अभंग (व्हीनस प्रकाशन)
* तुकारामाच्या अभंगांची चर्चा (खंड १, २) (वासुदेव पटवर्धन)
* तुका विठू आणि मी : लेखिका यशश्री भवाळकर
* तुकोबा : लेखक शंकर पांडुरंग गुणाजी
* तुकोबाचे वैकुंठगमन [[दिलीप चित्रे]]
* निवडक तुकाराम (वामन देशपांडे)
* पुन्हा तुकाराम : [[दिलीप चित्रे]]
* प्रसादाची वाणी अर्थात तुका म्हणे (डॉ.[[सदानंद मोरे]])
* मुलांसाठी तुकाराम (वामन देशपांडे)
* विद्रोही तुकाराम : लेखक [[आ.ह. साळुंखे]]
* विद्रोही तुकाराम - समीक्षेची समीक्षा : लेखक [[आ.ह. साळुंखे]]
* संत तुकाराम आणि रेव्ह. टिळक : एक भावानुबंध (लेखक :सुभाष पाटील):
* श्री संत तुकाराम चरित्र (अनंत पैठणकर)
* संत तुकाराम (चरित्र) (कृ.अ. केळूसकर, १८९५)
* संत तुकारामांचे अप्रकाशित अभंग ([[वा.सी. बेंद्रे]])
* संतसूर्य तुकाराम (कादंबरी लेखक : आनंद यादव)
* साक्षात्कारी संत तुकाराम (शं.दा. पेंडसे)
* 'Says Tuka (चार खंड): लेखक [[दिलीप चित्रे]]
* ’The poems of Tukārāma’ : translated and re-arranged, with notes and an introduction. लेखक : जे. नेल्सन फ्रेझर आणि के. बी. मराठे.
* ’A complete collection of the poems of Tukáráma, the Poet of Maharashtra (दोन खंड-इ.स.१८६९) भाषांतरकार : विष्णु परशुरामशास्त्री पंडित, शंकर पांडुरंग पंडित आणि जनार्दन सखाराम गाडगीळ
==चित्रकला-शिल्पकला व मुद्राचित्र==
विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकात हॉलंडमध्ये वास्तव्य असलेल्या चित्रकार, शिल्पकार व कवी भास्कर हांडे यांनी तुकारामाच्या गाथेतील अभंगावरून स्फुरलेल्या चित्रांची शिल्पांची व मुद्रा चित्रांची मालिका तयार केली आहे. तिला 'तुझे रूप माझे देणे' असे नाव दिले आहे. त्या चित्रांची कायमस्वरूपी मांडणी वैश्विक कला पर्यावरण औंध(पुणे) येथे केली आहे. लोकांसाठी हे कलादालन उघडे आहे. गाथेतील अभंगांवर चित्र काढण्याचा हा प्रयोग प्रथमच आहे.
==तुका झालासे कळस==
ही ओळ
संतकृपा झाली l इमारत फळां आली l<br />
ज्ञानदेवें रचिला पाया l उभारिलें देवालयां l<br />
|