"रावसाहेब शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
==स्वातंत्र्य चळवळीत सहभाग==
रावसाहेब शिंदे हे कॉलेजात असतानाच भारतीय स्वातंत्र्य चळवळ जोरात सुरू होती. ‘करेंगे या मरेंगे’ आंदोलनात त्यांनी भाग घेतला. १९४२ च्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या काळात व नाशिकला राष्ट्रसेवा दलात काम करताना गुप्त बैठका आयोजित करणे, बुलेटिन काढणे, प्रभात
==स्वातंत्र्य मिळाल्यानंतर==
ओळ २०:
==संस्थाविषयक कार्य==
विद्यार्थी दशेत शिक्षणानिमित्त संगमनेरला असताना रावसाहेबांनी तेथे शिंदे बोर्डिंगची स्थापना केली. गरीब मुलांना एकत्र करून सहभोजन, सहनिवास व सहशिक्षण असा एकात्म सहजीवनाचा पायंडा निर्माण केला. विद्यार्थ्यांची चळवळ चालवून विद्यार्थ्यांचे छोटे-मोठे प्रश्न सोडविले. पुढे रयत शिक्षण संस्थेत काम करताना याच कार्याचा वारसा होता. ‘रयत’च्या माध्यमातून गरीब मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात मोलाचा वाटा त्यांनी उचलला. ‘कमवा व शिका’ ही कर्मवीरांची स्वावलंबी शिक्षणाची योजना विद्यार्थ्यांमध्ये रुजविली. ‘रयत’साठी अहोरात्र झटणारा कार्यकर्ता व नेता म्हणून त्यांची ख्याती होती. अभ्यासूपणा, प्रश्न मुळापासून समजून घेण्याची हातोटी, श्रमिकांच्या श्रमाचे मोल जाणण्याची वृत्ती व उत्कृष्ट वक्तृत्वाद्वारे नेमकेपणाने प्रश्न मांडण्याचे कसब यामुळे अॅड. शिंदे यांचे नाव महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात पोचले.
कुसुमाग्रज प्रतिष्ठान, विनोबा भावे प्रतिष्ठान, महाराष्ट्र साहित्य परिषद अशा अनेक संस्थांच्या उभारणीत रावसाहेब शिंदे यांचा हातभार लागला होता.
==लेखन==
|