"नेत्रा साठे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
नेत्रा सदाशिव साठे (जन्म : इ.स.३१ मे १९३७; मृत्यू : कल्याण, २३ ऑगस्ट २०१४) या एक मराठी चित्रकार आणि शिल्पकार होत्या. त्यांनी १९५५मध्ये मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्टमधून DTC आणि १९५९मध्ये Painting Advance हे अभ्यासक्रम पुरे केले होते.
 
नेत्रा साठे यांचे वडील कृष्णराव केतकर हे स्मारक-शिल्पे बनवीत. शिल्पाकृतींची सरकारी कामे मिळविण्यासाठी त्यांना दिल्लीत राहणे गरजेचे होते. त्यांचा स्टुडिओ कल्याणमध्ये व फाउंडरी डोंबिवलीत होती.
 
नेत्राच्या आईने कन्येला संगीत, नृत्य, नाट्य, काव्य, साहित्य या सगळ्यांचीच गोडी लावली. लग्नाअगोदर मुंबईत असताना नेत्रा संस्कृत नाटकांतून अभिनय करीत असत. [[अभिज्ञान शाकुंतल]] आणि [[मृच्छकटिकम्‌]] या नाटकांतून त्यांनी [[दाजी भाटवडेकर]] यांच्या दिग्दर्शनाखाली अनुक्रमे प्रियंवदा व मदनिकेच्या भूमिका केल्या होत्या. त्याच्या रूपाची, भूमिकेची आणि अभिनयकौशल्याची तत्कालीन वृत्तपत्रांतून दखल घेतली गेली होती.
ओळ १६:
 
कल्याणात असताना नेत्रा साठे यांनी ’कांचनमृग’ या नावाच्या नृत्यनाटिकेचे आणि ’राणी रुसली राजावर’ व लग्नाला चला तुम्ही’ या वगांचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली. कल्याणमध्ये झालेल्या अंधायुग या नाटकातील गांधारीच्या भूमिकेसाठी त्यांना पारितोषिक मिळाले.
 
==Cold Ceramics==
नेत्रा साठे यांनी १९७२ साली लावलेल्या Cold Ceramicsच्या शोधाने त्यांना जागतिक कीर्ती मिळाली. पेंटिंगसाठी पॉलिएस्टर रेझिनचा उपयोग करून पारदर्शक रंगचित्रे काढणार्‍या त्या पहिल्या कलावंत ठरल्या. एरवी शिल्पात करावयाच्या या माध्यमाचा उपयोग चित्रांत केल्यामुळे नेत्रा साठे यांची चित्रे जणू जिवंत झाली, आणि त्यांना त्रिमितीचा गुण लाभला..
 
==लेखन आणि इतर==
Line २१ ⟶ २४:
* कांचनमृग, वसुंधरा या नृत्यनाटिकांचे लेखन, संगीत दिग्दर्शन, दिग्दर्शन आणि सादरीकरण. यांतली वसुंधरा ही नृत्यनाटिका बालकवींच्या पृथ्वीचे गीत या कवितेवर आधारित होती. नृत्यांगना मीना नेरूरकर यांनी या नाटिकेचे अमेरिकेत व भारतात अनेक प्रयोग केले. चतुरंग या संस्थेने ही नृत्यनाटिका हिंदीतही बसवली. वसुंधराचे १००हून अधिक प्रयोग झाले.
* वर्तमानपत्रांतून कथा, ललित लेख, कविता आणि स्फुट लेखन. त्यांतील इंग्रजी लेखांचा संग्रह Palet या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशित झाला आहे.
* [[श्रीराम लागू]] यांच्या ’विष्णुगुप चाणक्य’ या नाटकातीला पात्रांची वेशभूषा संकल्पित केली.
* नेत्रा साठे यांचा [[सई परांजपे]] यांच्या ाबरोबर दिल्ल्ली दूरदर्शनवरील अनेक कार्यक्रमात सहभाग असे.
* दिल्लीच्या शाळेत कलाशिक्षकाचे काम केले.
* घरी पेंटिगचे वर्ग घेतले.
* मुंबई (ताज आर्ट गॅलरी, नेहरू सेंटर), दिल्ली (अशोका हॉटेल, श्रीधरानी कलादालन), चेन्नाई, मॉस्को, लंडन, न्यूयोर्क, वॉशिंग्टन, बाल्टिमोर, ब्रुसेल्स, डेट्रॉइट, हॉलंड, अॅटलांटा, ह्यूस्टन, बोस्टन आदी आदी अनेक ठिकाणी स्वतःच्या वित्रांची प्रदर्शने भरवली.
 
==पुरस्कार==