पुण्याचा संदर्भ बिंदू (Zero milestone) हा पुण्यातील कॅम्प भागात असलेल्या जनरल पोस्ट ऑफिसच्या इमारतीबाहेर आहे. पुणे शहर हे सह्याद्री पर्वतरांगाच्या पूर्वेस, समुद्रसपाटीपासून ५६० मीटर (१,८३७ फूट) उंचीवर आहे. [[भीमा नदी]]च्या उपनद्या मुळा व मुठा यांच्या संगमावर हे शहर वसले आहे. [[पवना नदी|पवना]] व [[इंद्रायणी नदी|इंद्रायणी]] या नद्यादेखील पुणे शहराच्या वायव्येच्या भागांतून वाहतात. शहराचा सर्वोच्च बिंदु [[वेताळ टेकडी]] समुद्रसपाटीपासून ८०० मीटरवर आहे तर शहराच्या जवळ असलेल्या सिंहगड किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १३०० मीटर आहे.
पुणे शहर हे कोयना भूकंपप्रवण क्षेत्रात येते. कोयना गाव पुण्याच्या दक्षिणेस १०० किलोमीटरवर आहे. पुण्याला मध्यम व लहान भूकंप झालेले आहेत. कात्रज येथे [[मे १७]], [[इ.स. २००४|२००४]] रोजी ३.२ रिश्टर स्केल चा भूकंप झाला होता.
==पुण्यातील देवळे==
पुण्यात चित्रविचित्र नावाची अनेक देवळे आहेत. ती त्या खास नावानेच ओळखली जातात. त्यांतली काही अशी :-
* उंटाडे मारुती
* उपाशी विठोबा
* कसबा गणपती
* जिलब्या मारुती
* तळ्यातला गणपती
* तांबडी जोगेश्वरी
* पत्र्या मारुती
* पावट्या मारुती
* पिवळी जोगेश्वरी
* पोटशुळ्या मारुती आणि शनी
* बटाट्या मारुती
* भांग्या मारुती
* खुन्या मुरलीधर
==बगीचे आणि पोहण्याचे तलाव==
पुणे शहरात ८९ बगीचे आणि जवळजवळ तितकेच पोहण्याचे तलाव आहेत. त्यांपैकी काहींची नावे खाली दिली आहेत.
* आघारकर संशोधन संस्तेचे उद्यान
* आयुर्वेद महाविद्यालयाचे उद्यान
* बुरूड आळी
* बोहरी आळी
* भट आळी
* भाऊ महाराजांचा बोळ
* मुंजाबाचा बोळ
;परदेशी वृक्ष:
अगस्ता (हादगा), अनंत (केप जॅस्मिन), ट्री अँटिगोनान, रोज ॲपलअॅपल (जाम), स्टार ॲपलअॅपल, अंब्रेला ट्री, खोटा अशोक (पानाचा अशोक, मास्ट ट्री), आँकोबा, ऑर्किड ट्री (बटरफ्लाय फ्लॉवर), हाँगकाँग ऑर्किड ट्री, ब्राझिलियन आयर्नवुड, ऑलिव्ह, मोगली एरंड (जट्रोफा), सिल्व्हर ओक, ऊर्वशी (ॲमहर्स्टियाअॅमहर्स्टिया नोबिलिस), कँडल ट्री, कण्हेर, पिवळा कण्हेर (बिट्टी), कँपेची ट्री (लॉगवुड), कमरक (करंबोला), कॅशियाच्या अनेक जाती, गुलाबी कॅशिया, रेड कॅशिया, काशीद (सयामी कॅशिया), कॉपर पॉड ट्री, इंडियन कॉर्क ट्री, स्कार्लेट कॉर्डिया, कॉलव्हिल्स ग्लोरी, काशीद (सयामी कॅशिया), कैलासपती (कॅननबॉल ट्री), कनांगा (यांग यांग), क्रेप मिर्टल, क्लुसिया (फॅट पोर्क ट्री), ख्रिसमस ट्री (ऑराकरिया), गमग्वायकम (लिग्नम व्हिटी), गिरिपुष्प (ग्लिरिसिडिया), गुजबेरी ट्री, गोल्डन बेल (पिवळा टॅबुबिया), पांढरा चाफा (डेडमॅन्स प्लॉवर, टेंपल ट्री), कवठी चाफा, तांबडा चाफा (रेड फ्लँगिपनी), गोरखचिंच (बाओबाब), विलायती चिंच (इमली), चेंडूफळ (पार्किया), सिंगापूर चेरी, ऑस्ट्रेलियन चेस्टनट, जॅक्विनिया, जाम, टॅबुबियाच्या अनेक जाती, टॅबुबिया ॲव्हेलेनेडीअॅव्हेलेनेडी, पिवळा टॅबुबिया (गोल्डन बेल), टिकोमा, आफ्रिकन ट्युलिप ट्री (स्पॅथोडिया), रोझी ट्रंपेट ट्री, ट्रॅव्हेलर्स ट्री, डाँबेया (वेडिंग प्लँट), डेडमॅन्स फ्लॉवर (टेंपल ट्री, पांढरा चाफा), ड्रासिना, तुती (मलबेरी), तुमा (मिलेशिया), जेरुसलेम थॉर्न, दिवी दिवी, निलगिरी (युकॅलिप्टस), पर्जन्य वृक्ष (रेन ट्री), ब्लॅक पर्ल, पामच्या अनेक जाती, अरेका पाम, चायनीज फॅन पाम, रॉयल पाम (बॉटल पाम), पावडरपफ, नीरफणस (ब्रेड फ्रूट ट्री), फिडल लीफ फ़िग, फिडल वुड ट्री, फ्लॉस सिल्क ट्री, बूच, तेल्पा माड (ऑइल पाम), गुलमोहर (फ्लँबॉयंट ट्री), नीलमोहर (जॅकारंडा), पीतमोहर (पेल्ट्रोफोरम), बटर फ्रूट ट्री (ॲव्होकॅडोअॅव्होकॅडो), खोटा बदाम, बरसेरा (अत्तराचे झाड-लव्हेंडर ट्री), बिलिंबी, बिट्टी (पिवळा कण्हेर), बेगर्स बाऊल, बॉटल ब्रश, ऑस्ट्रेलियन बाभूळ, ब्रह्मदंड (सॉसेज ट्री), ब्लडवुड ट्री, ब्राउनिया, भद्राक्ष (गाउझुमा), मलबेरी (तुती), पेपर मलबेरी, महोगनी, आफ्रिकन महोगनी, मारखामिया, मोरपंखी (थूजा), रायआवळा, चेंजेबल रोज ट्री, लक्ष्मीतरू (सायमारुबा), शंबुकोश (सांबुकस), शेर (मिल्क बुश), संकासुर (शंखासुर, पीकॉक फ्लॉवर ट्री)), मोठी सातवीण, गुलाबी सावर (शेविंग ब्रश ट्री), दिल्ली सावर, पांढरी सावर (कपोक), सॉसेज ट्री (ब्रह्मदंड), सुरू (कॅश्युरिना, खडसावर), सुबाभूळ (हॉर्स टॅमेरिंड, लुकेना), हुरा (सँडबॉक्स ट्री), स्पॅथोडिया (आफ्रिकन ट्युलिप ट्री), वगैरे.
== अर्थकारण ==
|