"मराठी साहित्य महामंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १:
१९६०साली [[महाराष्ट्र|महाराष्ट्र राज्याची]] स्थापना झाली. १९६१ मध्ये [[महाराष्ट्र साहित्य परिषद]] पुणे, [[मुंबई मराठी साहित्य संघ]] मुंबई, [[मराठवाडा साहित्य परिषद]] औरंगाबाद आणि [[विदर्भ साहित्य संघ]] नागपूर ह्या त्या त्या प्रदेशात काम करणाऱ्या प्रातिनिधिक चार संस्था एकत्र आल्या आणि त्यांनी मराठी भाषेचे, मराठी वाङमयाचे व मराठी संस्कृतीचे काही समान प्रश्न सोडवण्यासाठी एक शिखर संस्था निर्माण करावी असे ठरवले. ती संस्था म्हणजेच '''अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ''' होय.
वर सांगितलेल्या या महामंडळाच्या चार संस्थापक संस्था असून त्या कायम घटक संस्था मानण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र सोडून इतर कोणत्याही राज्यातील, संपूर्ण प्रदेशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था, तसेच बाहेरील देशांमध्ये त्या संपूर्ण देशाकरिता काम करणाऱ्या नोंदणीकृत साहित्य संस्था ह्यांना महामंडळात समाविष्ट करून घेता येते. सध्या महामंडळातील अशा संस्था मराठी साहित्य परिषद (हैदराबाद), मराठी साहित्य सेवा मंडळ (गोवा), कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद (गुलबर्गा), छत्तीसगढ मराठी साहित्य परिषद (बिलासपूर) या आहेत. याशिवाय संपूर्ण राज्याचे प्रतिनिधित्व न करणाऱ्या साहित्य संस्थेला संलग्न संस्था म्हणून मान्यता मिळते. मराठी वाङमय परिषद (बडोदे) ही अशी संलग्न संस्था आहे. महामंडळावर घटक संस्थेचे प्रत्येकी तीन प्रतिनिधी, समाविष्ट संस्थांचा प्रत्येकी एक प्रतिनिधी आणि सर्व संलग्न संस्थांचे मिळून जास्तीत जास्त तीन प्रतिनिधी सभासद असतात.
==दर तीन वर्षांनी बदलणारे कार्यालय==
मराठी साहित्य महामंडळाचे व्यवस्थापकीय कार्यालय प्रत्येक घटक संस्थेकडे तीन वर्षांच्या मुदतीसाठी असते. पुढील क्रमानुसार ते फिरते: १. मुंबई मराठी साहित्य संघ. २. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. ३. विदर्भ साहित्य संघ, नागपूर. ४. मराठवाडा साहित्य परिषद, औरंगाबाद. महामंडळाचे कार्यालय मुंबई मराठी साहित्य संघाकडे १९८६, १९९८, आणि २०१० या साली तीन तीन वर्षांकरिता आले होते. २०१३साली ते पुण्याच्या [[महाराष्ट्र साहित्य परिषद|महाराष्ट्र साहित्य परिषदेकडे]] आले आहे.
==इतिहास==
सर्व मराठी भाषिक मुलुख एका राज्य छ्त्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला होता. त्या विचाराला बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य ह्या संदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसकट वेगवेगळ्या मराठी साहित्य संस्थांना एकत्र आणण्याचे आणि सर्वांची मिळून एक प्रातिनिधिक संस्था स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले. त्या प्रयत्नांची परिणती १९५१ मध्ये सर्व साहित्य संस्थांच्या प्रतिनिधींची [[मिरज]] येथे बैठक होण्यात झाली. [[अनिल|कविवर्य अनिल]] उपाख्य आत्माराम रावजी देशपांडे यांचा त्यात पुढाकार होता. मिरजेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानीही अनिलच होते. या बैठकीत सर्व संस्था मिळून तयार होणाऱ्या संघ-संस्थेच्या घटनेचा मसुदा तयार करण्यात आला. संकल्पित संस्थेला 'मराठी साहित्य महामंडळ' असे नाव द्यावे अशी अनिलांनीच सूचना केली <ref>Google's cache of http://www.sahityasagarsangli.com/index.php?option=com_content&task=view&id=17&Itemid=63. It is a snapshot of the page as it appeared on 2 Jul 2009 16:36:02 GMT</ref>
|