"संगीत रत्‍नाकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
संगीत रत्‍नाकर हा महाराष्ट्रामधल्या देवगिरीदेवगिरीच्या राज्यातील रामदेवराजाच्यासिंहणराजाच्या काळातले आयुर्वेदाचार्य आणि संगीतज्ञ शारंगदेव (संस्कृत लेखन - निःशङ्क शार्ङ्गदेव), यांनी १३व्या शतकात रचलेला ग्रंथ आहे.. हा ग्रंथ आजही हिंदुस्तानी संगीताचा प्राण समजला जातो. या ग्रंथाचे लेखन इ. स. १२१० पासून १२४७ पर्यंत म्हणजे ३७ वर्षे चालू असावे असे मानले जाते.

या ’संगीत रत्‍नाकर’ नावाच्या ग्रंथात शारंगदेव याने संगीताच्या सिद्धान्तांचे इतके अद्वितीय, सक्षम, स्पष्ट आणि प्रामाणिक विवेचन केले आहे, की असे करण्याची नुसती कल्पनाही करणे आजच्या घडीला असंभव समजले जाईल.
ओळ ६:

या चार-खंडी ’संगीत रत्‍नाकरा’त एकूण सात प्रकरणे आहेत. संस्कृतमधील संगीतावर लिहिल्या गेलेला हा सर्वात मोठा ग्रंथ आहे. या ग्रंथावर सर्वात जास्त टीका लिहिल्या गेल्या आहेत, आणि आजवर कुठल्याही संगीतावरील ग्रंथाच्या नसतील तेवढ्या आवृत्त्या या ग्रंथाच्या निघाल्या आहेत.

या ग्रंथावर काशीपती कविराज, कलानिधी (इ.स. १४३०), कल्लिनाथ (इ.स. १४३०), गंगाधर, सिंहभूपाल (इ.स. १३३०-1330 ई) वगैरे विद्वानांनी टीका लिहिल्या आहेत. सिंहभूपाल यांनी लिहिलेल्या टीकाग्रंथाचे नाव 'संगीतसुधाकर' असे आहे.

जगांतल्या अनेक भाषांत ’संगीत रत्‍नाकर’ या ग्रंथाचे सर्वाधिक अनुवाद प्रकाशित झाले आहेत.

==ग्रंथाचा परिचय==
ग्रंथात एकूण सात प्रकरणे आहेत. स्वरगताध्याय, रागविवेकाध्याय, प्रकीर्णकाध्याय, प्रबंधाध्याय, तालाध्याय आणि वाद्याध्याय. ही सर्व प्रकरणे त्यांच्या नावाप्रमाणेच कंठसंगीत, वाद्यसंगीत, तंतुवाद्ये आणि तालवाद्ये या विषयांवर आहेत. सातवे ’नर्तनाध्याय’ नावाचे प्रकरण नृत्यासंबंधी आहे.

संगीत रत्‍नाकरात अनेक तालांचा उल्लेख आहे. त्यावरून असे कळते की फार पूर्वापार चालत आलेल्या संगीतपद्धतीत त्या काळात बदल होत चालले होते. दहाव्या शतकाच्या अंतापर्यंत असलेल्या संगीतपद्धतीला प्रबंध म्हटले जाई. हे प्रबंध दोन प्रकारचे होते, निबद्द प्रबंध आणि अनिबद्ध प्रबंध. निबद्द प्रबंधा तालांच्या मर्यादेत राहून गायला जाई, तर अनिबद्ध प्रबंध मुक्त रूपात गायला जाई.

==प्रबंध==
प्रबंध ही गेय रचना असून तो संगीतातील एक पारिभाषिक शब्द आहे.

;;;;;;;;;;;;;चतुभिर्धातुभिः षड्‌भिश्चाङ्‌गैर्यस्मात्‌ प्रबध्यते ।

;;;;;;;;;;;;;तस्मात्‌ प्रबन्धः कथितो गीतलक्षणकोविदैः ॥ ---- संगीतरत्‍नाकर

१२व्या शतकात झालेल्या कवी जयदेव याने आपले गीतगोविंद हे काव्य प्रबंध रूपात रचले आहे. ते प्रबंध असे आहेत.

१ला प्रबंध : राग मालव, ताल रूपक

२रा प्रबंध : राग गुर्जरी, ताल प्रतिमठ

३रा, १४वा आणि २०वा प्रबंध : राग वसंत, ताल यति

४था प्रबंध : राग रामकली, ताल रूपक

५वा प्रबंध : राग गुर्जरी, ताल रूपक

६वा प्रबंध : राग मालवगौड, ताल एकताल

७वा, ११वा आणि १५वा प्रबंध : राग गुर्जरी, ताल एकताल

८वा प्रबंध : राग कामदा, ताल एकताल

९वा प्रबंध : राग देस, ताल एकताल

१०वा, १६वा आणि २२वा प्रबंध : राग वराडी, ताल रूपक

१२वा प्रबंध : राग गुणकली, ताल रूपक

१३वा प्रबंध : राग मालव, ताल यति

१७वा प्रबंध :राग भैरव, ताल रूपक

१८वा प्रबंध : राग गुर्जरी, ताल यति

१९वा प्रबंध : राग वराडी, ताल अष्टताल

२१वा प्रबंध : राग वराडी, ताल आडव

२३वा प्रबंध : राग विभास, ताल एकताल आणि,

२४वा प्रबंध : राग रामकली ताल यति

(अपूर्ण)

==मराठी भाषांतर==
* संगीतरत्‍नाकर या संस्कृत ग्रंथाचे, त्यावरील ’कलानिधि’ टीकेसह मराठी भाषांतर, गणेश हरी तार्लेकर (जन्म : १९१४) यांनी केले, आणि ते [[महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळ|महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने]] इ.स. १९७५मध्ये प्रकाशित केले.
* महाराष्ट्र शासनाच्या हिंदी अकादमीने ’संगीत रत्नाकर - एक अध्यतन’ या श्रीराजेश्वर मिश्र यांनी मूळ बंगालीत लिहिलेल्या ग्रंथाचा मदनलाल व्यास यांनी केलेला हिंदी अनुवाद प्रकाशित केला आहे.

[[वर्ग:प्राचीन साहित्य]]