'''हायड्रेटेड पोटॅशियम अॅल्युमिनियम सल्फेट''' (K<sub>2</sub>SO<sub>4</sub>.Al<sub>2</sub><sub></sub>(SO<sub>4</sub>)<sub>3</sub>.24H<sub>2</sub>O)या संयुगाला [[मराठी]]मध्ये '''तुरटी''' असे म्हणतात. तुरटीचे सर्वसामान्य रासायनिक सूत्र X2SO4X<sub>2</sub>SO<sub>4</sub>. Y2Y<sub>2</sub>(SO4SO<sub>4</sub>)<sub>3</sub>. 24H2O24H<sub>2</sub>O असे आहे. बॉक्साइट तसेच अॅल्युनाइटवर प्रक्रिया करून तुरटी मिळवली जाते. तुरटीचे [[स्फटिक]] समकोन अष्टकोनाकृतिअष्टकोनाकृती असतात.{{चित्र हवे}} गढूळ [[पाणी]] स्वच्छ करण्यास तुरटीचा उपयोग होतो. तुरटी पाण्यामध्ये फिरवली असता पाण्यामध्ये असलेल्या बारीक कणांवर असलेला [[विद्युतभार]] नाहीसा होतो. त्यामुळे आधी वेगवेगळे असलेले हे कण एकत्र येतात. [[वस्तुमान]] वाढल्याने ते जड झाले की पाण्यात खाली बसतात. यामुळे पाणी स्वच्छ झालेले दिसते. परंतु हे पाणी र्निजंतुकनिर्जंतुक झालेले नसते. हे पाणी गाळून घेऊन ते उकळले तरच र्निजंतुकनिर्जंतुक होते. [[भाजी|भाज्या]] आणि [[फळे]] यांचा ताजेपणा टिकवण्यासाठी तुरटीचा उपयोग केला जातो. हीतुरटी ज्वलनशील नसल्याने [[कापड]], [[लाकूड]], [[कागद]] अशा ज्वलनशील पदार्थांचा ज्वलनाला विरोध वाढवण्यासाठी तुरटीच्या द्रावाचा उपयोग केला जातो.
==इतिहास==
तुरटी ही मानवाला किमान चार हजार वर्षांपासून माहिती आहे असे पुरावे [[इजिप्त]] येथे आढळले आहेत. तसेच भारतीय गणितज्ञ [[वराहमिहिर]] यांच्या लेखनात रंगबंधक म्हणून तुरटीचा उल्लेख केलेला आहे. प्राचीन कालापासून भारतातील [[सौराष्ट्र]] विभागातप्रदेशात तुरटी तयार केली जातेजात आली आहे.