"रु आणि रू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
V.narsikar (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
मराठीत दोन रु आहेत हेच अनेकांना माहीत नसते, किंवा असले तरी कोणता रु कधी वापरायचा हे माहीत नसते.
’र’ हे अक्षर अत्यंत सडपातळ आहे, त्यामुळे त्याच्यावरची शिरोरेषाही अतिशय आखुड असते. त्यामुळ नेहमीच्या पद्धतीने(ु आणि ू)उकार लावताना, शिरोरेषा लांबवावी लागते. त्यासाठी देवनागरीच्या निर्मात्यांनी ’र’च्या बेचक्यात उकार लावायची पद्धत सुरू केली असली पाहिजे. दोन उकारांपैकी ऱ्हस्व उकार म्हणजे एक छोटी खालच्या दिशेला वळलेली आकडी (हूक), आणि दीर्घ म्हणजे ’र’पासून दूर
==रु असलेले शब्द==
ओळ ७:
हे शब्द मराठीतही असेच लिहिले जातात. ’अकारान्त शब्दांतील उपान्त्य अक्षर दीर्घ’हा नियम या शब्दांना लागू नाही.
;<big>'रु'</big> चे(र्हस्व) शब्द:
अरुण(अरुणोदय), करुण(करुणामय, कारुण्य), गरुड, तरुण(तरुणी, तारुण्य), दारुण, पुरुष(पुरुषत्व, पुरुषसूक्त, पौरुष), मारुति(मराठीत मारुती), रुग्ण, रुग्णालय, रुची(अरुची, रुचकर, वररुची, सुरुची), रुपे(रुपया-दोन्ही शब्द मराठी), वरुण, वारुणी,
;<big>रू</big>चे(दीर्घ) शब्द:
ओळ १३:
;संस्कृतमध्ये ऱ्हस्व ’रु, पण मराठीत दीर्घ:
गुरू (पण गुरुकृपा, गुरुवर्य, गुरुभक्ती), चारू (पण चारुदत्त, चारुशीला), जरत्कारू, तरू (पण तरुवर), मेरू (पण मेरुदंड),
;संस्कृतमध्ये दीर्घ पण मराठीत ऱ्हस्व:
रूक्ष (अर्थ : कोरडा, अरसिक)हा मूळ दीर्घ रू असलेला संस्कृत शब्द मराठीत रुक्ष असे लिहिण्याचा प्रघात आहे.
==मराठी शब्द==
;मराठी अकारान्त शब्दांतल्या उपान्त्य अक्षराचा इकार-उकार दीर्घ असतो, म्हणून --:
आवरून, उरून, करून, करवून, घरून, चोरून, जागरूक (जागरूकता), धरून, पुरून, भरून, भारून, बुरूज (पण बुरुजावर), मारून, सवरून, स्मरून वगैरे पूर्वकालवाचक आणि अन्य शब्दांतला उपान्त्य रू दीर्घ.
;धातूंना पररूप संधीने ऊ आख्यात लागलेले शब्द:
करू, भरू, मारू,
;मराठीत अन्त्य अक्षराचा इकार-उकार नेहमीच दीर्घ म्हणून,:
इच्छाधरू, गबरू, गेरू, घारू, जोरू,
;
चुरुचुरु, तुरुतुरु,
;अनुस्वार असलेली अक्षरे बहुधा ऱ्हस्व म्हणून:
अरुंद, अरुंधती, उरुंडी, कुरुंद, कुरुंदकर, कुरुंदी, जामरुंग(बोरघाटातले एक रेल्वे स्टेशन), तुरुंग, निरुंद, बुरुंडी, रुंगठा, रुंजी, रुंद (रुंदी), लांबरुंद, सुरुंग,
;परकीय शब्द:
उरुग्वे, पेरुमल, बरुआ, फारुकी, रुक्साना, रुमानिया, रुमाल(हातरुमाल),
==ऋ असलेले शब्द==
हे सर्व शब्द संस्कृतच असतात. संस्कृतमध्ये ऱ्हस्वान्त असले तरी मराठीत दीर्घान्त लिहितात.
ऋकार, ऋग्वेद(ऋग्वेदी), ऋचा, ऋजू, ऋण(ऋणी),ऋतू(पण ऋतुपर्ण), ऋषभ, ऋषी(पण ऋषितुल्य), नैर्ऋत्य,
|