"गणपत पाटील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३१:
==जीवन==
गणपत पाटील यांचा जन्म [[कोल्हापूर|कोल्हापुरात]] एका गरीब कुटुंबात झाला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या [[रामायण|रामायणाच्या]] खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा [[सीता|सीतेची]] भूमिका वठवली.<br/>
दरम्यान [[राजा गोसावी]] यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा [[मास्टर विनायक|मास्टर विनायकांच्या]] शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा सहायकाचीसाहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते [[मुंबई|मुंबईतून]] कोल्हापुरास परतले.<br/>
त्यासुमारास पाटलांना [[राजा परांजपे|राजा परांजप्यांच्या]] ’बलिदान’ व [[राम गबाले|राम गबाल्यांच्या]] ’वन्दे’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी [[भालजी पेंढारकर|भालजी पेंढारकरांच्या]] ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.<br/>
चित्रपटांबरोबरीनेच पाटील [[नाटक|नाटकांतही]] अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची - म्हणजेच ’नाच्या’ची - आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.
 
ओळ १८५:
* आता लग्नाला चला
* आल्या नाचत मेनका रंभा
 
==पुरस्कार==
 
* २०१३ सालचा विशेष [[दीनानाथ मंगेशकर]] स्मृती पुरस्कार गणपत पाटील यांना जाहीर झाला आहे.
 
==बाह्य दुवे==