"मधुसूदन विष्णू कौंडिण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो मधुसूदन विष्णू कौण्डीण्यपान मधुसूदन विष्णू कौंडिण्य कडे J स्थानांतरीत |
No edit summary |
||
ओळ १:
'''मधुसूदन विष्णू कौंडिण्य उर्फ मामा कौंडिण्य''' (मार्च १७, १९३३ - जानेवारी २८, २०१३) ह्यांचा जन्म नशिराबाद, जळगाव (खानदेश) येथे झाला होता. अर्थशास्त्रात एम.ए. झाल्यावर ते १९५८मध्ये अहमदनगर महाविद्यालयात लेक्चरर म्हणून रुजू झाले. साने गुरुजींचा त्यांना प्रत्यक्ष सहवास व प्रेम लाभला होता आणि त्यामुळे ते आयुष्यभर मुलांच्या शिक्षणासाठी झटले.
म.वि. कौंडिण्यांच्याच पुढाकाराने संगमनेर महाविद्यालयाची [http://sangamnercollege.org/] १९६१ साली स्थापना झाल्यावर ते त्या कॉलेजचे प्राचार्य झाले, आणि सलग ३२ वर्षांनंतर १९९३साली निवृत्त झाले. या काळात त्यांनी अनेक शैक्षणिक व समाजोपयोगी उपक्रम राबवले. वंचितांच्या शिक्षणासाठी आणि समाजोन्नतीसाठी त्यांनी विविध असे १५ प्रकल्प राबविले.
१९९९साली पुण्यात आल्यावर, पुण्याजवळील सूस व आसपासच्या दोन गावांमध्ये कौंडिण्य यांनी त्यांनी समाजकार्य सुरू केले. कचरा गोळा करणाऱ्या महिलांना संघटित करून त्यांनी सरकारकडून त्यांना जागा मिळवून दिली, त्या जागेवर घरकुले उभे करून त्यांना हक्काची घरे दिली व त्यांच्या मुलांसाठी प्राथमिक शाळा काढली.
१९९३ साली, कौंडिण्य यांना, त्यांच्या शिक्षणविषयक योगदानाबद्दल चतुरंग प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला.
;मधूसूदन विष्णू कौंडिण्य यांची कारकीर्द:
* १९५८-१९६१ - अहमदनगर महाविद्यालयात अर्थशास्त्राचे व्याख्याते.
* १९६१-९३ - संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य
* १९६३-६६ - शालान्त परीक्षा मंडळाचे सभासद.
* १९६८-७२ - पुणे विद्यापीठाच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य.
* १९७६-७९ - पुणे विद्यापीठाच्या समाजशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता.
* १९८० - "दर्शन' या आर्थिक सामाजिक संदर्भ ग्रंथाचे संपादन.
* १९९० - प्राचार्य कोगेकर अमृतमहोत्सव ट्रस्टतर्फे "आदर्श शिक्षक' पुरस्कार.
* १९९१ - पु. ल. देशपांडे प्रतिष्ठानतर्फे कार्यासाठी बारा लाख रुपयांचे अनुदान. जी. डी. पारीख ॲवॉर्ड.
* १९९२ - एस. व्ही. कोगेकर ॲवॉर्ड.
* १९९३ - "चतुरंग'तर्फे शैक्षणिक कार्यासाठी जीवनगौरव [[पुरस्कार]]
* १९९४ - साक्षरता कार्यासाठी इंडियन मर्चंट्स चेंबर्स ॲवॉर्ड. (एक लाख रुपये)
* १९९५ - ऐतिहासिक संग्रहालय ॲवॉर्ड
* २००६ - ज्ञान-विज्ञान [[पुरस्कार]]
==कौंडिण्य यांची सामाजिक कार्ये==
* प्रवर्तक - मुक्तांगण स्वायत्त विद्यापीठ
* प्रवर्तक - धनंजयराव गाडगीळ प्रतिष्ठान
* प्रवर्तक - अथश्री ग्रामीण विकास केंद्र
* निर्मिती - आदिवासी, विडी कामगार, लहान शेतकरी, रामोशी, पारधी आदींसाठी १५ विविध ग्रामीण विकास प्रकल्प.
* सदस्य - नियोजन मंडळ, उच्च शिक्षण अभ्यास गटाचे सदस्य (नवी दिल्ली)
* विश्वस्त - कुसुमाग्रज प्रतिष्ठान (दहा वर्षे)
* विश्वस्त - भास्करराव दुर्वे प्रतिष्ठान (पाच वर्षे)
{{विस्तार}}
|