"पांडुरंग सदाशिव साने" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→साहित्य: {{विकिस्रोत साहित्यिक}} |
|||
ओळ ४५:
==आंतरभारती==
गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे त्यांना वाटू लागल्यामुळे त्यांनी प्रांताप्रांतांतील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधुत्वाचे वातावरण वाढावे, यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीनाऱ्या विद्यार्थ्यांसाठी [[रवींद्रनाथ ठाकूर]] यांच्या [[शांतीनिकेतन|शांतीनिकेतनाप्रमाणे]] काही सोय करावी, ही मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलनामध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती{{संदर्भ हवा}}. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. पण हे कार्य अपुरे असतानाच ११ जून, इ.स. १९५० रोजी त्यांचे निधन झाले.
==माणगावचे साने गुरुजी स्मारक==
साने गुरुजींच्या स्मरणार्थ 'सानेगुरुजी राष्ट्रीय स्मारक' या नावाची संस्था महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातल्या माणगाव नजिकच्या वडघर या निसर्गरम्य गावात आहे. १९९९मध्ये ३६ एकर जागेवर या संस्थेच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे.. यामध्ये विद्यार्थांच्या शिबिरासाठी दोन डॉरमेट्री आणि कॅम्पिंग साइट बांधण्यात आल्या होत्या. साडेतीनशे विद्यार्थी मावतील इतकी या डॉरमेट्रीची क्षमता आहे. युवा श्रमसंस्कार छावणी, मित्रमेळावा, साहित्यसंवाद, भाषा अनुवाद कार्यशाळा असे अनेक उपक्रम या संस्थेत नियमित होत असतात. शाळांच्या अनेक उपक्रमांसाठीही या डॉरमेट्री उपलब्ध करून दिल्या जातात.
या संस्थेने आता (२००९ साली) प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं काम हाती घेतले आहे. या दुसऱ्या टप्प्यात 'सानेगुरुजी भवन' आणि 'आंतरभारती अनुवाद केंद' अशा दोन प्रकल्पांची योजना आखली आहे. सानेगुरुजींच्या कार्याचा आढावा घेणारे कायमस्वरूपी प्रदर्शन 'सानेगुरुजी भवना'मध्ये होणार आहे. सानेगुरुजींचे स्मारक उभारणे हा या भवनामागचा उद्देश आहे. तसेच 'आंतरभारती अनुवाद केंद्र' हे सानेगुरुजींनी पाहिलेल्या स्वप्नांची प्रतिकृती असेल. हे केंद काँप्युटर, इंटरनेट, ऑडियो-व्हिज्युअल रूम अशा सोयीसुविधांनी सज्ज असेल. इथे सुसज्ज लायब्ररीही सुरू करण्याचा संस्थेचा मानस आहे. या लायब्ररीमध्ये लेखक, अभ्यासक, साहित्यिक शांतपणे संशोधन, अभ्यास करू शकतील, अशी संस्थेची योजना आहे.
१९३० मध्ये सानेगुरुजी त्रिचनापल्लीच्या तुरुंगात होते. त्यावेळी दक्षिणेकडच्या अनेक भाषातज्ज्ञांशी त्यांच्या संबंध आला होता. अनेक भाषांचे वैभव आपल्याला अज्ञात असल्याचे त्यांना जाणवले. आपण भारतात राहत असूनही इथल्या वेगवेगळ्या प्रांतांत बोलल्या जाणाऱ्या भाषांची माहिती आपल्याला नसते; या भाषा शिकायच्या असल्यास तशी संस्थाही आपल्याकडे नाही याची खंत नेहमी सानेगुरुजींना वाटायची. यातूनच 'आंतरभारती'ची संकल्पना त्यांना सुचली. ही संकल्पना पूर्णत्वाला नेण्याचे त्यांचे स्वप्न होते. हे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी संस्था झटत आहे.
==आंतरभारती [[साहित्य संवाद संमेलन]]==
२०१२ सालचे आंतरभारती [[साहित्य संवाद संमेलन]] माणगावला याच संस्थेत होणार आहे. आधीची संमेलने मुंबईत झाली होती.
== साहित्य ==
|