"मराठी नावे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: वार्तांकनशैली ?
ओळ २८:
==नुसतेच व्यक्तिनाव==
नाट्यचित्रपट सृष्टीतले कलावंत अनेकदा फक्त व्यक्तिनावाचेच ओळखले जातात. अभिनेत्री गौरी, सीमा, सुलोचना ही त्यांतली काही उदाहरणे. अभिनेते धुमाळ हे फक्त आडनावाचे ओळखले जात.
यशवंत यांच्यासारखे काही कवीही फक्त व्यक्तिनावाने प्रसिद्ध आहेत. कवी कालिदास, गणिती भास्कराचार्य, मास्टर विनायक ही आणखी काही उदाहरणे. काही वर्षांपूर्वी ईव्ह्‌ज वीकली या स्त्रियांच्या नियतकालिकांनी स्त्रियांना त्यांचे व्यक्तिमत्त्व असावे, त्यासाठी त्यांनी आपल्या नावानंतर वडिलांचे नाव, पतीचे नाव वा आडनाव लिहू नये असा खूप प्रचार केला होता. त्याला त्याकाळी काही बायका बळी पडल्या होत्या. पण त्या पद्धतीतला फोलपणा दिसून आल्यामुळेच बहुधा ती पद्धत निदान महाराष्ट्रात तरी चालली नाही. दक्षिणी भारतीयांना आडनाव नसते, त्यामुळे नावांवरून त्यांची जात ओळखता येत नाही, म्हणून ती आदर्श पद्धत आहे, असे काहीजण समजतात. आडनावावरून जात किंवा गाव समजू नये म्हणून काहीजण आपले जुन्या काळापासून चालत आलेले आडनाव बदलतात.
 
==टोपण नाव==
ओळ ३९:
==नाव आणि आडनाव==
 
हीहीही एक इतिहासकालीन पद्धत असून ती मराठी समाजात अजूनही प्रचलित आहे. तानाजी मालुसरे, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, राजा गोसावी, राजा परांजपे, माधव वझे, शांता शेळके, हरी नरके, लता मंगेशकर, दुर्गा भागवत वगैरे अनेक जणांचे नाव या पद्धतीचे आहे.
 
==दुहेरी आडनावे==
 
काही विवाहित स्त्रियांच्या नाव आणि आडनाव अशा पद्धतीने लिहिलेल्या नावांत आधी माहेरचे आडनाव आणि नंतर सासरचे आडनाव लिहिलेले आढळते. उदा० लीला मस्तकार रेळे, अलका कुबल आठल्ये, भक्ती बर्वे इनामदार, सई परांजपे जोगळेकर वगैरे. कधी काळी व्यवसायाने पाटील वा कुलकर्णी असणाऱ्या व्यक्ती आपल्या नावात दोन आडनावांचा समावेश करतात. विखे पाटील, बुट्टे पाटील, रेडे कुलकर्णी आदी. महाराष्ट्रातील काही कुटुंबांची आडनावे मुळातच दुहेरी आडनावे असतात. पाठकपुजारी, प्रभुदेसाई, ठाकुरदेसाई, प्रभुचिमुलकर, नाईकनवरे, कदमबांडे, पंतवैद्य, रावराणे, रावकवी, मानेशिर्के, राजेशिर्के, मानेशिंदे, पैधुंगट ही तसली काही उदाहरणे. सेनगुप्ता, दासगुप्ता, रायचौधरी, रायभौमिक ही बंगाली जोड‌आडनावे प्रसिद्ध आहेत.
 
==बदललेली आडनावे==
ओळ ५१:
==नावांची आद्याक्षरे आणि आडनाव==
 
ही पुरुषांचे नाव कागदोपत्री लिहिण्याची रूढ पद्धत आहे. प्र.के अत्रे, ग,त्र्यं. माडखोलकर, वगैरे. यांत एक उपप्रकार म्हणजे स्वत:चे नाव आणि आणि आडनाव पूर्ण लिहून मधल्या वडिलांच्या किंवा पतीच्या नावाचे आद्याक्षर लिहिणे. राम कृ, जोशी, बाळ ज.पंडित, दिनकर द. पाटील वगैरे नावे या प्रकारातली. पुरुषोत्तम शिवराम रेगे आपले नाव एक तर पु.शि. रेगे असे लिहीत किंवा पुरु.शिव.रेगे असे. आणखी तिसरा उपप्रकार म्हणजे स्वत:च्या नावाचे आद्याक्षर लिहून, वडिलांचे नाव आणि आडनाव पूर्ण लिहिणे. उदा० के. नारायण काळे. काहीजण स्वत:च्या नावातली एकदोन अक्षरे लिहून नंतर आडनाव लिहितात. दत्ता वाळवेकर, विजू खोटे ही काही उदाहरणे. आडनावाचे इंग्रजी आद्याक्षर लिहून आधी किंवा नंतर स्वत:चे नाव लिहिणारी मराठी माणसे अनेक आहेत.उदा० व्ही.शांताराम, पी.बाळू(क्रिकेटखेळाडू), सी. रामचंद्र, जयश्री टी., मीना टी. वगैरे.
 
==नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव ==