विल्यम हेन्री हॅरिसन

विल्यम हेन्री हॅरिसन (इंग्लिश: William Henry Harrison ;) (९ फेब्रुवारी, इ.स. १७७३ - ४ एप्रिल, इ.स. १८४१) हा अमेरिकेचा नववा राष्ट्राध्यक्ष, राजकारणी व सैनिकी अधिकारी होता. तो अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या स्वातंत्र्यपूर्वकाळात जन्मलेला अंतिम, तर अध्यक्षपदावर असताना मरण पावलेला पहिला राष्ट्राध्यक्ष ठरला. ४ मार्च, इ.स. १८४१ साली अध्यक्षपदी बसलेल्या हॅरिसनाचा कार्यकाळ ४ एप्रिल, इ.स. १८४१ रोजी न्युमोनियामुळे मृत्यू ओढवल्यामुळे केवळ ३२ दिवस टिकला.

विल्यम हेन्री हॅरिसन
William Henry Harrison.jpg

सही विल्यम हेन्री हॅरिसनयांची सही

अध्यक्षीय कारकिर्दीआधी त्याने वायव्य प्रदेशाचे प्रादेशिक काँग्रेशीत प्रतिनिधित्व केले होते. तसेच इंडियाना प्रदेशाचा राज्यपाल व पुढे ओहायो संस्थानाचा काँग्रेस-प्रतिनिधी व सिनेटर या पदांवरही त्याने काम केले. त्याआधी अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धाच्या काळात इ.स. १८११ साली अमेरिकन इंडियनांविरुद्ध लढलेल्या टिपेकनूच्या लढाईत व इ.स. १८१२ साली अमेरिकन इंडियन व ब्रिटिश फौजांच्या आघाडीविरुद्ध लढलेल्या थेम्स नदीकाठच्या मॉरेव्हियनाच्या लढाईत त्याने अमेरिकन फौजांचे यशस्वी नेतृत्व केले.

बाह्य दुवेसंपादन करा

  • "विल्यम हेन्री हॅरिसन याचा अल्पपरिचय" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on 2009-02-06. 2011-05-23 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)