विलास बाळकृष्ण मनोहर (जन्म : पुणे, १५ जून १९४४) हे एक मराठी लेखक होते. इ.स. १९९२मध्ये त्यांना मृण्मयी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

विलास मनोहर हे गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात हेमलकसा-भामरागड येथे आदिवासींसाठी काम करणाऱ्या डॉ. प्रकाश आमटे यांचे सहकारी होते. डॉ. प्रकाश आमटे यांच्याबरोबर काम करण्यासाठी ते १९७५ साली हेमलकशाला दाखल झाले. प्रकल्प सुरू होऊन वर्ष झाले होते. दारिद्‌ऱ्य, अज्ञान यांमुळे त्या भागात वन्यप्राण्यांची भरपूर शिकार होत असे. प्रकल्पावरच्या दवाखान्यात येणारे आदिवासी प्राणी मारल्यावर त्यांची पिल्ले प्रकाश आमट्यांना आणून देत. दोघांनी मिळून अनेक जंगली जनावरांना आश्रय दिला होता.

विलास मनोहर यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • एका नक्षलवाद्याचा जन्म
  • नेगल भाग १ (बाळगलेल्या वन्य प्राण्यांची कहाणी)
  • नेगल भाग २ : हेमलकशाचे सांगाती
  • नारीभक्षक (कादंबरी)
  • मला (न) कळलेले बाबा (आमटे)