विलास जैतापकर
विलास जैतापकर (जन्म : मुंबई, १४ मार्च १९४८; - मुंबई, ३० एप्रिल २००५) यांना नव्या पिढीचे शाहीर म्हणले जाते. शाहिरी परंपरेचा नंदादीप तेवत ठेवण्यामध्ये शाहीर विलास जैतापकर यांचेही मोठे योगदान होते.
विलास जैतापकर यांचे शिक्षण मुंबईत झाले. त्यांना लहानपणापासूनच गाण्याची, संगीताची, शाहिरीची ओढ होती. पुढे त्यांनी ‘शाहीर विलास जैतापकर पार्टी’ काढली व गिरगाव, गिरणगावसह मुंबईबाहेरही शेकडो कार्यक्रम केले. जैतापकरांना मराठी भाषा, मराठी अस्मितेचा प्रचंड अभिमान होता. ‘युवक बिरादरी’ या सांस्कृतिक संघटनेचे ते संस्थापक सदस्य होते.
विलास जैतापकर हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून ते संत गाडगेबाबा अभियानापर्यंतच्या सामाजिक-राजकीय कार्यांत सतत आघाडीवर असत. शाहीर साबळे यांच्या ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमातील ‘पयलं नमन, आम्ही करितो वंदन’ या गीताचे तेच गीतकार होते. गाडगेबाबा अभियानात जैतापकरांनी सादर केलेली ‘स्वच्छतेचा पांडुरंग’ ही कलाकृती महाराष्ट्रात कमालीची गाजली.
जैतापकरांचा गणपतीची गाणी लिहिण्यात तर हातखंडा होता. आजही गणेशोत्सवात जैतापकर यांनी लिहिलेली गाणीच प्राधान्याने ऐकायला मिळतात. त्यांच्या सुमधुर गीतांनी रसिकांना, गणेशभक्तांना अक्षरशः वेड लावले होते. ही गीते गणेशोत्सवातले खास आकर्षण असते.
पछाडलेला या मराठी चित्रपटात जैतापकारांनी रचलेली गीते आहेत. विलास जैतापकरांची गीते असलेले ४०हून अधिक आल्बम आहेत आणि त्यांत त्यांची सुमारे २८० गाणी आहेत. ही गाणी अशोक खरे, विजय सरतापे, विनोद साठे, वैशाली सामंत, शकुंतला जाधव, श्रीकांत नारायण, सुदेश भोसले, सुरेश वाडकर, आदी गायकांनी गायली आहेत.
विलास जैतापकरांची गीते असलेले आल्बम
संपादन- आला रे गोविंद
- आली आली भीमाची जयंती
- आली माझ्या घरी ही दिवाळी
- कान्हा रंगली
- कान्हा वाटेवरी उभा
- कान्हा वेडी राधा
- कोकणातील गणपतीच्या पारंपरिक आरत्या
- ग गणपतीचा
- गणपती टॉप १३ (२००९ आणि २०१० च्या आवृत्त्या)
- गणपति राया पडते मी पायां
- गणपतीच्या लग्नाची आली वरात
- टिटवाळ्याचा महा गणपती
- तांडव
- तू सुखकर्ता तू दुखहर्ता
- देव मोदकवाला पाहिजे
- नवरात्रीचे नवरूप
- मला आई व्हायचंय
- मला कार्ल्याला जायचं आणि एकवीराला पहायचं
- मला डहाणूला जायचं आणि महालक्ष्मीला पहायचं
- महिमा श्रीराम की
- माझा खंड्या मल्हारी
- माझा लाडाचा गणपती
- माहुरीची रेणुका
- मुंबईचा महाराजा
- लाडाचा गणपती
- लालबागचा राजा
- लालबागच्या राजाचा विजय असो
- वणीची सप्तशृंगी
- विठ्ठल भजन
- विठ्ठल राजा पंढरिचा
- विठ्ठलाचा छंद
- विरार गावाला जायचं आणि जीवधनीला पहायचं
- शिर्डीला जायचं साईला पहायचं
- शेगाव गजानन
- साईबाबाची पहाटेची भक्तिगीते
- सारे गाऊ या बाप्पा मोरया
- श्री सिद्धिनिनायक - पहाटेची भक्तिगीते
- सोन्याचा नारल दर्याला
- ह्यो ह्यो फेटेवाला
विलास जैतापकारांची गाजलेली गाणी
संपादन- आई तुझ्या गं लेकरा मिळे चारी निवारा
- आई माझी एकवीरा
- आदि गणाचा तू गणनायक
- आले आले गणपती
- आले आले गणपती आले
- चिक मोत्याची माळ होती गं वीस तोळ्याची
- छान सजवा पालखी
- जय गणेश जय गणेश
- जय जय गजानन राजा
- झाला वरीस बांधवा
- तुझं माझ्याशी नातं हे असं कसं आहे
- तू सुखकर्ता विघ्नहर्ता
- देव मोदकवाला पाहिजे
- नवसाला पावला हाकेला धावला
- पयलं नमन, आम्ही करितो वंदन
- पालखी निघाली राजाची
- बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला
- मंगलमूर्ती बोला बोला
- या हो दर्शन घ्याया
- वाजत गाजत आले
- सनईच्या सुरात ढोलाच्या गजरात