आयुर्वेदानुसार परस्परविरोधी गुणांचे खाद्यपदार्थ खाणे यास विरुद्धाशन म्हणतात. अशन म्हणजे खाद्यपदार्थ किंवा जेवण; त्यामुळे विरुद्ध + अशन, अर्थात परस्परविरोधी गुणाचे अन्न खाणे, अशा अर्थाची ही संज्ञा आहे. उदाहरणार्थ, दही व मासे, ताक व गूळ, तेल व तूप, तूप व मध समप्रमाणात खाणे, फणसाचे गरे खाऊन त्यावर विडयाचे पान खाणे, दूध व फळे एकत्र खाणे, इत्यादी जोड्या विरुद्धाशनात गणल्या जातात. विरुद्धाशन केल्यास पचनसंस्था बिघडू शकते.

त्रुटी

संपादन

यावर कुठल्याही प्रकारचे संशोधन झालेले नाही. तसेच विरुद्धाशन म्हणजे नेमके काय याची ठोस व्याख्या नाही.

अधिक वाचन

संपादन
  • हिंदुस्थानचा वैद्यराज-(परिभाषा प्रकरण)-ले.(कै. आयुर्वेदमहोपाध्य शंकर दाजीशास्त्री पदे)
  • अष्टांग ह्रदय-वाग्भट-(सातवा-अन्नरक्षाध्याय-श्लोक-२९ ते ४४)
  • सार्थ वाग्भट(टीकेसहीत)-कै.डॉ.गणेश कृष्ण गर्दे

बाह्य दुवे

संपादन
  • "विरुद्धाशनाविषयी लेख". 2009-08-03 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2009-10-02 रोजी पाहिले.