विमेन अँड वर्क (पुस्तक)
'विमेन अँड वर्क'[१] हे पदमिनी स्वामिनाथन संपादित पुस्तक ओरिएन्ट ब्लॅकस्वॅन,नवी दिल्ली यांनी २०१२ मध्ये प्रकाशित केले आहे. सदर पुस्तक स्त्रिया आणि काम स्त्रियांचा आर्थिक सहभाग हा कशाप्रकारे कामाचे लिंगभाविकरणाचा परिणाम आहे याचे विश्लेषण करते.
प्रस्तावना
संपादनभारतामध्ये आणि जगातील बऱ्याचशा भागामध्ये पुरुषांच्या तुलनेत खूप कमी स्त्रिया रोजगार मिळवतात.उत्पादनातील पितृसत्ताक रिती आणि भांडवलशाही संबंध यामुळे स्त्रियांना रोजगार मिळवताना कशाप्रकारे दडपशाहीला सामोरे जावे लागते ह्या विषयी प्रस्तावनेत मांडणी केलेली आहे. त्याचबरोबर National income accounts आणि labour force survey यामधून येणारी आकडेवारी कशाप्रकारे स्त्रियांच्या बाजूने प्रतिकूल आहे हे उदाहरणासहित दर्शविते.
ठळक मुद्दे
संपादनसदर पुस्तक चार विभागामध्ये विभागले आहे. निवड झालेले लेख चार विभागामध्ये विभागलेले आहेत.
१. कामाचे संकल्पनीकरण, गुंतागुंत दर्शविणे (Conceptualizing Work, Mapping Complexities) याविषया अंतर्गत पाच लेख आहेत. ज्यामधून स्पष्ट होते की, कशाप्रकारे विकासामुळे कामाच्या स्वरूप, व्याप्ती आणि रचनेमध्ये बदल झाले आहेत आणि त्याचबरोबर कामाच्या विभागणी मध्ये कोणत्याही प्रकारचे सामाजिक आणि राजकीयरित्या बदल झालेले दिसत नाहीत. याविषयक मांडणी झालेली आहे. अग्रवाल (१९८९, १९९२) त्यांच्या अभ्यासातून महत्त्वाचा मुद्दा मांडतात की, गरीब ग्रामीण घरातील स्त्रियांना घराच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न सोडविण्यासाठीच्या जबाबदारीचे ओझे असते पण कधी कधी मर्यादित स्रोत आणि गरिबी इ. लिंगभाव यामुळे त्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यावर मर्यादा येतात. यावरून अग्रवाल विकासा संदर्भातील समज यातील बदल दर्शवितात. पुढे जाऊन त्या म्हणतात की, या बदलांची गणना करणे गरजेचे आहे. हा बदल कल्याणकारीपेक्षा रूपांतर अशा प्रकारचा आहे.
मारिया मिस यांचा नरसापूर येथील लेस बनविणाऱ्या स्त्रियांचा अभ्यास 'विकासाचा' अजून एक पैलू आणि त्यांचा ग्रामीण स्त्रियांवर होणारा परिणाम दर्शविते. या अभ्यासातून मारिया मिस मांडतात की, स्त्रियांची गृहिणी, कामगार नसणे आणि अवलंबित्व या सामाजिक व्याख्येमुळे अशा प्रकारच्या उद्योगांमध्ये स्त्रियांचे अमर्यादित शोषण होते. गृहस्थित घरकामगारांना गृहिणी ठरविले गेल्यामुळे आणि त्यांची विनावेतन आणि वेतनाच्या कामाची गरज नाकारणे यामुळे भांडवलदारांकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक शोषण केले जाते.
अग्रवाल यांच्या लेखातील मुख्य मुद्दा हा आहे की, बऱ्याच तिसऱ्या जगातील देशातील बेकारीचा प्रश्न, गरिबी, निराधारपणा आणि विकासाची धोरणे लिंगभाव निर्धारित आहेत आणि ही परिस्थिती सुधारण्यासाठी गरीब घरातील स्त्रियांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. अग्रवाल यांच्या लेखातून अजून एक महत्त्वाचा मुद्दा पुढे येतो की, ग्रामीण रोजगार योजना आणि उत्पन्न निर्माण करणाऱ्या योजना यासंदर्भात स्त्रियांवर अधिक लक्ष केंद्रित करणे का गरजेचे आहे कारण राज्यांकडून पुरस्कृत गरीब घरादाराच्या संदर्भात ज्या कल्याणकारी योजना आखताना घरादारातील श्रमविभागणी आणि स्त्री पुरुषांचे वेतन किंवा स्त्रियांना स्वतंत्रपणे रोजगारासाठीची गरज किंवा उत्पन्न निर्माण करणाऱ्या संधी याविषयी कमी माहिती असते. हा लेख सध्या सुरू असलेल्या विनावेतन कुटुंबातील कामांवर होणाऱ्या चर्चांवर अधिक भर देतो.
चौधरी यांचा अभ्यास हा हरियाणा येथील स्त्रियांचे कामाचे स्वरूप आणि त्याठिकाणचे एकूण अर्थकारण यांच्यातील संबंध यासंदर्भातील वेगवेगळ्या पैलूंवर आधारित आहे. स्त्रियांच्या कामाच्या संदर्भात दोन मुख्य बाजू आहेत. एक शेती आणि दुसरी शेतीतील प्रक्रिया आणि पशूपालन. चौधरी यांच्या विश्लेषणातून लक्षात येते की, स्त्रियांचे घरातील श्रम वर्ग आणि जातीची विभागणी ओलांडते. तसेच पशुपालन जे या राज्यातील ग्रामीण अर्थकारणातील दूसरे महत्त्वाचे क्षेत्र आहे त्यामध्ये अगदी गहन कामांपासून ते देखरेखीच्या कामांपर्यंत सर्व कामे जात आणि वर्गाचा विचार न करता स्त्रिया करतात. त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण अर्थकारणातील दूसरे महत्त्वाचे सांस्कृतिक वर्चस्व आणि वैचारिक घटक यावर लक्ष वेधते आणि एका पातळीवर हरयाणविंचा वाढता सहभाग दिसतो तर दुसऱ्या पातळीवर दिसून येते की, सांस्कृतिकरित्या ह्या सहभागाचे पुरुषांच्या तुलनेत कमी दर्जाचे, दुय्यम आणि सहाय्यकारी म्हणून अवमूल्यन केले जाते.
२. ‘Imparting Visibility, Interrogating Data System’ या विषया अंतर्गत चार लेख येतात (अ) माहिती व्यवस्थापनेच्या अयोग्य अशा व्याख्येला प्रश्न करणे (ब) काम आणि कामगारांच्या व्यवस्थेसंदर्भातील तंत्रे आणि पद्धतींना प्रश्न विचारणे (क) माहिती संकलनासाठी पर्यायी व्यवस्था सुचविणे याद्वारे स्त्रियांचा आर्थिक सहभाग आणि त्याचबरोबर राष्ट्रीय माहिती व्यवस्थापने वरील मर्यादा यावर भारतीय स्त्रीवादी यावर प्रकाश टाकतात. या भागातील लेख स्त्रियांचे आर्थिक योगदान निदर्शनास आणतात, तसेच कशाप्रकारे फक्त राष्ट्रीय data system हे योगदानाविषयी अपूर्ण मांडणी आणि कमी लेखते तर जेथे मोठ्या प्रमाणावर स्त्रिया त्यांचा वेळ घरादारच्या उदरनिर्वाहासाठीच्या कामांमध्ये घालवतात यांवर संकल्पनेच्या (conceptually) आणि तांत्रिक पातळीवर मांडणी करत नाही आणि त्यांचे हे 'अनुत्पादक' काम data systems ने ठरवून दिलेल्या अद्यावत कामांच्या वर्गवारीमध्ये बसत नाही.
देवकी जैन त्यांच्या ‘Valuing Work: Time as Measure’ लेखामध्ये कामाच्या मूल्यमापनातील मुख्य घटकांविषयी मांडणी करतात. त्या नमूद करतात की, कामाच्या मूल्यमापनासाठी वेळ हा योग्य मापदंड नाही विशेषतः कोणत्याही प्रकारची मालमत्ता नसलेल्या (assetless) स्त्री कामगारांच्या संदर्भात. म्हणून भारतातील स्त्रियांच्या कामातील सहभागाची नोंदणी करण्यासाठी विशिष्ठ अशा प्रकारचा अभ्यास आणि पद्धतीशास्त्राची गरज आहे याविषयक मांडणी या लेखामधून येते.
३.'कामाचे प्रकार, कामाची परिस्थिती' (Forms of Labour, Conditions of work) या विषया संदर्भात पाच लेख आहेत. उत्पादनातील पुरुषसत्ताक संरचना आणि भांडवलशाही संबंध यामुळे स्त्रियांना रोजगार मिळवताना कशाप्रकारे दडपशाहीला सामोरे जावे लागते याविषयी मांडणी यामधून येते. या लेखामधून जातीव्यवस्था आणि पुरुषांची सत्ता टिकवणे यासाठी काळानुसार लिंगाधारित श्रमविभागणीमध्ये ही बदल होतात तसेच सांस्कृतिक आणि धार्मिक घटक ही या श्रमाची विभागणी संरचित करण्यावर परिणाम करतात हे निदर्शनास येते. या भागातील वेगवेगळे लेख भांडवलशाही आणि लिंगभाव यांच्यातील संबंध दर्शवितात. भांडवलशाही उत्पादनाचे स्वरूप, विशिष्ट प्रकारचे gendered नातेसंबध आणि त्याचा परिणाम हा समान धागा या लेखांमध्ये आहे.
दक्षिण गुजरातमधील अभ्यासावर आधारित लेखामध्ये कोठारी ग्रामीण समाजातील परिवर्तनाच्या संदर्भात भूमिहीन घरातील कनिष्ठ वर्गातील बालिका आणि स्त्रियांच्या वेतनासाठीच्या घरकामाविषयी परिक्षण करतात. हा लेख जात, वर्ग, लिंगभाव यावर आधारित कामे आणि वेतन/ विनावेतनाचे काम, घरकाम/ कामगार या वर्गवारी मधील बारकावे दर्शवितो. पार्वती रघुराम यांनी शहरी भागातील वेतनाच्या घरकामाचे जात आणि लिंगभाव यासंदर्भात परिक्षण केले. रघुराम नोंदवतात की, वाल्मिकी समाजातील स्त्री आणि पुरुष (in NOIDA, Delhi) अजूनही जे इतर जातींसाठी अशुद्ध (polluted) मानले जाणारे काम करत आहे. असे जरी असले तरी हे काम ते ग्रामीण भागामध्ये असताना जजमानी नातेसंबंधामध्ये करत होते परंतु आता तेच काम ते शहरी भागामध्ये जजमानी नातेसंबंधामध्ये करत नसल्यामुळे त्यातून त्यांना फायदा होत आहे.
जयरंजन आणि स्वामिनाथन यांच्या लेखातून लक्षात येते की, वेतन मिळवणाऱ्या स्त्रियांना पितृसत्ताक संरचना आणि उत्पादनाचे भांडवलशाही संबंध यांमुळे दडपणूकीला सामोरे जावे लागते. मीना गोपाल दाखवून देतात की, कशाप्रकारे विशिष्ट संघटना जसे बिडी कारखाना (दक्षिण तामिळनाडू मधील) यांनी घरस्थित कामगारांना मुख्यतः गृहिणी अशी ओळख केल्यामुळे त्यांना मुलांचे संगोपन आणि घरकाम याबरोबरच आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठीही काम करावे लागते.
कामासाठी आणि वेतनासाठी स्त्रिया काम करतात या पार्श्वभूमीवर Forum Against Oppression of Women यांनी मुंबई येथील बारबाला यांचा अभ्यास केला. या अभ्यासातून निदर्शनास आलेल्या गोष्टींमधून या कामाविषयी असलेली गृहीतके नाहीशी करण्यास मदत झाली. एक म्हणजे बार मध्ये नाचण्याचे काम करण्याचा निर्णय ही जाणीवपूर्वक निवड असते. दोन, त्यांचे शरीर पुरुषांच्या नजरेसाठी प्रस्तुत केले जाते असे असूनही, स्त्रिया त्यांचे हे कामाचे ठिकाण असुरक्षित मानत नाही. तीन हा लेख एका गोष्टीचा उल्लेख करतो की, येथे काम करणाऱ्या बऱ्याच स्त्रिया या नाच काम आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या समुदायांमधून आलेल्या असतात. हा लेख स्त्रीवाद्याना हे काम स्त्रिया त्यांच्या उदरनिर्वाहासाठी स्वतः जरी निवडत असल्या तरी काही स्त्रियांना जबरदस्तीने या कामामध्ये आणले जाते याकडे लक्ष वेधण्यास सांगतो.
४. ‘Critiquing Policies: Implications and consequences for Work’ या प्रभागातील लेखांमधून हे निदर्शनास आणले गेले आहे की, विकास हा काही समुदायांपर्यंत पोहोचलेला नाही किंवा या समुदायांना बगल देऊन हा विकास पुढे गेलेला दिसतो. राष्ट्रीय पातळीवरील धोरणे 'सामाजिक क्षेत्रा' तील 'कल्याणकारी' धोरणांमध्ये अपयशी ठरलेले आहेत. या भागातील लेख वेगवेगळ्या प्रकारे 'विकास'चा अर्थ फक्त लिंगभाव समानता नाही तर तत्त्वे, संरचना आणि आपल्या सामाजिक कल्याणकारी व्यवस्था आणि धोरणांवरील उद्दिष्टे यांवर भर देणे या गोष्टींचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करतात.
मिरियम शर्मा यांनी त्यांच्या लेखामधून राजस्थान मधील गरीब स्त्रियांना दुभत्या म्हशींच्या खरेदीसाठी राजस्थान सरकारच्या Operation Flood programme अंतर्गत कर्जासाठी अर्थसहाय्य करण्याच्या योजनेचे चिकित्सक विश्लेषण केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत स्त्रियांसाठी शिबीर राबविण्यात आले होते त्या संदर्भात लेखिका नोंदवतात की, शिबीर घेणाऱ्याची ग्रामीण स्त्रियांना प्राण्यांच्या काळजी संदर्भात अज्ञान असते तसेच त्यांना औपचारिक शिक्षणापेक्षा व्यावहारिक अनुभव अधिक असतात. याप्रकारची गृहीतके ग्रामीण स्त्रियांच्या संदर्भात होती. लेखिका नोंदवतात की, या शिबिरामध्ये स्त्रियांचे मुख्य प्रश्न मांडले गेले नाहीत आणि अशाप्रकारच्या कार्यक्रमांचे समाजातल्या मुख्य संरचनांमध्ये बदल न करता कर्ज आणि अर्थसहाय्यच्या माध्यमातून गरिबी हटवण्याचा उद्देश असतो. स्त्रियांचे सक्षमीकरण करण्यासाठी जी धोरणे आखली जातात त्यात विशेषतः त्यांना यशस्वी उद्योजक बनवणे, सक्षमीकरणासाठीचे कार्यक्रम हे त्यांच्या उद्दिष्टामध्ये कशाप्रकारे अपयशी ठरली आहेत हे दर्शवणारे अनेक अभ्यास पुढे आलेले आहेत तरीही ही धोरणे कशाप्रकारे यशस्वी झालेली आहेत हेच कायम दाखवले जाते.
या लेखाचे मुख्य योगदान हे कल्याणकारी धोरणांच्या 'यशाचे' चिकित्सकपणे अन्वयार्थ लावणे हे आहे. अशाप्रकारचे कार्यक्रम काही प्रमाणात स्त्रियांचे सक्षमीकरण आणि गरिबी निर्मुलनामध्ये यशस्वी ठरतात परंतु त्यांचा उद्देश सत्ता संबंध किंवा उतरंड यामध्ये परिवर्तन घडवून आणणे हा नसतो.
थोडक्यात या पुस्तकातील लेख पश्चिम बंगालमधील भात उत्पादक कामगार स्त्रिया, तामिळनाडू मधील बिडी कामगार, आंध्रप्रदेश मधील लेस उत्पादक स्त्री कामगार आणि महाराष्ट्रातील बारबाला या सर्व स्त्रिया खेदजनक परिस्थितीमध्ये राहत आहे आणि काम करत आहे आणि त्यातून त्यांना मिळणारे उत्पन्नही अतिशय कमी आहे याकडे लक्ष केंद्रित करते.
प्रतिसाद किंवा योगदान
संपादनटी. के. राजलक्ष्मी यांनी फ्रंटलाइन या नियतकालिकामध्ये सदर पुस्तकाची समीक्षा केली आहे. त्यांच्या मते सदर पुस्तकामध्ये ज्या पद्धतीने लेखांचे संकलन केले आहे अशा पद्धतीचे अभ्यास होणे गरजेचे आहे की ज्यातून धोरणांची सूक्ष्म आणि दीर्घ चौकट समजण्यास मदत होते आणि वेगवेगळ्या सामाजिक धोरणांचा वरवरचा भपकेपणा लक्षात येतो. पितृसत्ताक संरचना आणि भांडवलशाही उत्पादन प्रक्रिया या संदर्भात काम हे स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी अपरिहार्य आहे का? राष्ट्रीय सर्वेक्षणामधून स्त्रियांचे काम आणि राष्ट्रीय उत्पन्नातील त्यांच्या कामाचे मूल्य यांविषयक माहिती समाधानकारकपणे मिळते का? असे अनेक प्रश्न सदर पुस्तकामध्ये Economic Political Weekly मधून घेण्यात आलेल्या लेखांमधून उपस्थित होतात.
महत्त्वाच्या संकल्पना
संपादनपुरुषसत्ता, भांडवलशाही, National income accounts, labour force survey, लिंगभाव, लिंगाधारित श्रमविभागणी
संदर्भ सूची
संपादन- ^ Swaminathan Padmini, Women and Work, Orient Black Swan, New Delhi, 2012.