विद्याभाऊ सदावर्ते (१९३८ - २५ मार्च, २०१८) हे मराठवाड्यातील पत्रकार होते. []

त्यांनी अजिंठा, लोकमत, देवगिरी, तरुण भारत, गावकरीसांजवार्ता, एकमत या वर्तमानपत्रांमध्ये विविध पदांवर काम केले. मराठवाड्याचे पहिले दैनिक अजिंठा या नांदेडहून प्रकाशित होणाऱ्या वर्तमानपत्राचे ते संपादक होते. सदावर्ते यांचे इंग्रजी, हिंदी आणि उर्दू भाषेवर प्रभुत्व होेते. जागतिक राजकारणाचा त्यांचा सखोल अभ्यासही होता. अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा दुधगावकर पुरस्कार, दर्पण पत्रकारिता, विश्वसंवाद संस्थेचा नारद पुरस्कार, तसेच अरविंद आ. वैद्य पुरस्कार आदी पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कारसुद्धा त्यांना मिळाला होता. अनेक इंग्रजी पुस्तकांचा त्यांनी अनुवाद केलेला आहे.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "मराठी पत्रकार विद्याभाऊ सदावर्ते का निधन". 25 मे 2020 रोजी पाहिले.
  2. ^ "ज्येष्ठ पत्रकार आणि भाषांतरकार विद्याभाऊ सदावर्ते यांचे निधन". Divya Marathi. 25 मे 2020 रोजी पाहिले.